चैत्र अमावस्येच्या दिवशी पूर्वजांच्या नावाने तर्पण अर्पण केले जाते, दान- पूजा करतात. या दिवशी राशीनुसार काही वस्तू दान केल्याने पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, घरातील आर्थिक, मानसिक त्रास दूर होतात, असे मानले जाते. अमावस्येला राशीनुसार काय दान करावं, याविषयी ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून जाणून घेऊ.
मेष - पूर्वजांच्या शांतीसाठी अमावस्येला सरबत, पाणी, नारळ पाणी इत्यादी थंडगार वस्तू दान करा.
advertisement
वृषभ - वृषभ राशीच्या माणसांनी खीर, मिठाई, तांदूळ यासारख्या पांढऱ्या वस्तूंचे दान केल्याने घरात सुख-समृद्धी राहील.
मिथुन - मिथुन राशीच्या लोकांनी अमावस्येला उसाचा रस किंवा थंड पाणी दान करावे. यामुळे मनाला शांती मिळते आणि कौटुंबिक वाद कमी होतात.
कर्क -कर्क राशीच्या लोकांनी पांढरे कपडे किंवा रसगुल्ला सारख्या पांढऱ्या मिठाईचे दान केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद कायम राहतील.
सिंह - सिंह राशीच्या लोकांनी गूळ, मध आणि हरभरा दान करणे उत्तम. यामुळे घरातील अडणी हळूहळू संपतील.
कन्या- कन्या राशीच्या लोकांनी मूग डाळीची खिचडी किंवा लाडू, पण शक्यतो हिरव्या रंगाचे पदार्थ दान करावे. यामुळे बुद्धिमत्ता सुधारते.
दुसरं-तिसंर काय नाही, शनी मागे लागल्याचा हा परिणाम; असे त्रास तेव्हाच होतात
तूळ- चैत्र अमावस्येला तूळ राशीच्या लोकांनी ब्राह्मणांना भोजन द्यावे. गरजूंना पांढरे कपडे किंवा तांदूळ दान करावे.
वृश्चिक - वृश्चिक राशीच्या लोकांनी अमावस्येला लाल कपडे, गूळ किंवा लाल मिठाई दान करावी. यामुळे कौटुंबिक आनंद वाढतो.
धनु - धनु राशीच्या लोकांनी अमावस्येला पिवळ्या रंगाची मिठाई, केळी आणि पिवळे कपडे दान करावे. काळे उडीद आणि तीळ यांचे दान देखील शुभ मानले जाते.
मकर - मकर राशीच्या लोकांनी अमावस्येला लोखंडी भांडी, ब्लँकेट आणि तीळ दान केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळते.
कुंभ - कुंभ राशीच्या लोकांनी अमावस्येला पैसे किंवा बूट दान करणे फायदेशीर ठरेल. यामुळे आर्थिक स्थिती चांगली होते.
मीन - मीन राशीच्या लोकांनी अमावस्येला थंड पाणी आणि पिवळ्या रंगाचे पदार्थ दान करावे. यामुळे घरात आनंद आणि शांती राहते.
25 दिवस पैशांचा पाऊस! मेष राशीत बुधाचा अस्त म्हणजे या राशींचा गोल्डन काळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)