Shanidev: दुसरं-तिसंर काय नाही, शनी मागे लागल्याचा हा परिणाम; असे त्रास तेव्हाच होतात, उपाय आहेत
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani Dosh Upay: शनिची साडेसाती, शनिदोष असल्यास आयुष्यात मोठे बदल होतात. शनी जितका छळतो तितकंच चांगले जीवन दाखवतो. ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही विचित्र घटना घडत असतील तर शनी रुष्ट असण्याची शक्यता असते.
मुंबई : वैदिक ज्योतिषशास्त्रात न्यायदेवता मानले जाणारे शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. नऊ ग्रहांपैकी शनि हा सर्वात कठोर आणि भयंकर ग्रह मानला जातो. हिंदू धर्मात शनिवार हा शनिदेवाचा वार मानला जातो. शनिची साडेसाती, शनिदोष असल्यास आयुष्यात मोठे बदल होतात. शनी जितका छळतो तितकंच चांगले जीवन दाखवतो. ज्योतिषी अंशुल त्रिपाठी यांच्या मते, एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात काही विचित्र घटना घडत असतील तर शनी रुष्ट असण्याची शक्यता असते. शनिची अवकृपा होत असल्याचे संकेत जाणून घेऊया.
योग्य मार्गावरून भरकटणे - एखादी व्यक्ती जीवनाच्या योग्य मार्गापासून भरकटू लागते, निर्णय घेताना गोंधळून जाते. चांगले काय आणि वाईट काय यात फरक कळेनासा होतो, तेव्हा ओळखावं शनिची कृपा नसून अवकृपा होत आहे.
चुकीच्या संगतीत - एखादी व्यक्ती वाईट संगतीला लागली, मादक पदार्थांचे व्यसन लागले किंवा धार्मिक कार्यांचा विसर पडला तर हे पापी कर्मांचे परिणाम समजावे, शनीच्या नाराजीचा इशारा आहे.
advertisement
पिंपळ वारंवार वाढणे - तुमच्या घराजवळ किंवा घराच्या आत पिंपळाचे झाड वारंवार वाढत असेल तर, शनिदेव रुष्ट असल्याचा तो संकेत समजावा.
वारंवार जाळी जळमटं - नियमित साफसफाई करूनही घरात कोळी जाळे तयार करत असेल तर, ते शनिदेवाच्या नाराजीचे संकेत असू शकतात.
advertisement
भिंतीला भेगा पडणे - घराच्या भिंतींना वारंवार तडे जात असतील किंवा भेगा पडत असतील तर हे शनिदेव नाराज असल्याचे लक्षण मानले जाते.
उपाय काय करावे - शनिवारी शनि मंदिरात जाऊन पूजा करावी. शनिदेवाला तिळाचे तेल अर्पण करा आणि भुकेल्या आणि गरिबांना अन्न किंवा दान द्या. घर बांधण्याचे काम सुरू असेल तर मजूरांना त्यांचा मोबदला वेळेवर द्या. शनिवारी अनवानी पायाने चाला. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि वक्रदृष्टीपासून मुक्तता मिळते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 25, 2025 10:33 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shanidev: दुसरं-तिसंर काय नाही, शनी मागे लागल्याचा हा परिणाम; असे त्रास तेव्हाच होतात, उपाय आहेत