BudhAsta: 25 दिवस पैशांचा पाऊस! मेष राशीत बुधाचा अस्त म्हणजे या राशींचा गोल्डन काळ, भाग्योदय
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Budh Asta May 2025 Positive Effects: ग्रहांचा राजकुमार मानला जाणारा बुध ग्रह 7 मे रोजी मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 15 मे रोजी पहाटे 4:44 वाजता अस्त होईल. 8 जून रोजी रात्री 8:12 वाजता तो पुन्हा उदयास येईल, म्हणजे बुध एकूण 25 दिवस अस्त राहील. बुध ग्रहाच्या अस्तामुळे 4 राशींना विशेष लाभ होईल, हा काळ त्यांच्यासाठी सुवर्णकाळ ठरेल.
advertisement
सिंह: सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा अस्त शुभ ठरेल. अध्यात्माच्या जवळ असल्यानं मनातील गोंधळ दूर होईल. तुमचे मन पूर्वीपेक्षा चांगले काम करेल आणि तुमच्या बोलण्याचा प्रभाव वाढेल. या 25 दिवसांत काही नवीन कल्पना येतील, ज्या अंमलात आणल्याने आर्थिक आणि सामाजिक फायदे मिळू शकतात. या काळात तुमचे मन पूजा, ध्यान इत्यादींमध्ये असेल. 15 मे ते 8 जून दरम्यानच्या प्रवासाचा लाभ होऊ शकतो.
advertisement
वृश्चिक: बुध ग्रहाच्या अस्तामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना फायदा होईल. जे लोक बराच काळ आजारी आहेत, त्यांची प्रकृती सुधारेल. प्रलंबित काम पूर्ण होईल. या काळात नवीन मोठं काम हाती मिळण्याची शक्यता आहे, त्यात यश मिळेल. शैक्षणिक स्पर्धांसाठी हा काळ अनुकूल आहे. कठोर परिश्रमावर विश्वास ठेवा आणि एकाग्रतेने काम करा. या काळात तुमच्या व्यक्तिमत्त्वात बदल होईल, लोक तुमच्यामुळे प्रभावित होतील.
advertisement
advertisement
advertisement
मीन: बुध ग्रहाच्या अस्तामुळे मीन राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील. सोशल नेटवर्क चांगले होईल आणि विचार लोकांसमोर चांगल्या प्रकारे मांडू शकाल. व्यवसायासाठी आणि नोकरीसाठी ते फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळतील. विचारपूर्वक गुंतवणूक केली तर नफा होण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवून बिघडणारे बजेट हाताळू शकता.
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)