TRENDING:

Numerology: शनिदेव मेहरबान! नशिबाची साथ मिळत असल्याची प्रचिती आज या 3 मूलांकाना येणार; कर्मफळ

Last Updated:

Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 13 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

नशिबाची साथ मिळत असल्याची आज प्रचिती येईल. वेळात वेळ काढून नवीन ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न कराल. पुस्तकांचं वाचन करण्यास अनुकूल वेळ आहे. पोटाची समस्या जाणवू शकते, काळजी घ्या. महत्त्वाचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी चांगली वेळ आहे. जोडीदारावर संशय घेतल्यानं प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला जाणार नाही.

Lucky Colour : Rosy Brown

Lucky Number : 18

advertisement

नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज शनिवारी मित्र आणि नातेवाईक यांची आज गरजेच्या वेळी मदत मिळाल्यानं छान वाटेल. तुमचे काम पाहून इतर लोक भारावून जातील. नवीन घर खरेदी करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. आर्थिकबाबतीत टॅक्सबाबत आज समस्या उद्भवू शकते, सावध राहा. जोडीदाराच्या आरोग्य समस्येमुळे चिंता वाढेल.

advertisement

Lucky Colour : Indigo

Lucky Number : 22

नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

कामाचा दिवस आहे, कारण आज शनिवारी तुम्ही जे काम कराल, त्यामध्ये तुम्हाला यश मिळेल. दिवसभर कामामध्ये व्यग्र राहिल्यामुळे थकवा जाणवू शकतो, काळजी घ्या. मालमत्तेचा वाद उद्भवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत तो सामंजस्यानं सोडवा. चैनीच्या वस्तूंवर खर्च करू नका. जोडीदाराशी नातं चांगलं राहील.

advertisement

Lucky Colour : Lemon

Lucky Number : 7

चंद्रग्रहणानंतर आता सूर्य ग्रहणाचा नंबर! भारतात दिसणार का, सूतक काळ लागणार?

नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सुख-दु:ख आयुष्याचा भाग आहेत, त्यामुळे आज गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नसल्या तरी हार मानू नका. प्रयत्नामध्ये सात्यत ठेवा. आज शनिवारचा दिवस तुमच्यासाठी आनंदी क्षण घेऊन येणारा आहे. विरोधकांपासून सावध राहा. तुमच्या जवळच्या व्यक्तीदेखील तुमचे विरोधक असू शकतात, काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या उत्पन्न वाढल्यानं चांगली जीवनशैली जगण्यास मदत होईल. जोडीदाराशी असणारं प्रेमाचं नातं आणखी दृढ करण्याची ही वेळ आहे. जोडीदारासोबत वीकेंडला फिरायला जाण्याचा प्लॅन करू शकता.

advertisement

Lucky Colour : Red

Lucky Number : 18

नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज शनिवारी कामात वरिष्ठांकडून तुम्हाला मदत मिळेल. आज तुम्हाला फिरायला जाण्याचा मोह होऊ शकतो. अशा परिस्थितीत तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी प्रवासाला जा, त्यासाठी योग्य वेळ आहे. नवीन घर किंवा कार घेण्यासाठी वेळ अनुकूल आहे. गुंतवणूक करताना सावध राहा. जोडीदार तुमची काळजी घेत असल्यानं नातं अधिक दृढ होईल.

Lucky Colour : Sky Blue

Lucky Number : 22

नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

शनिवारचा दिवस तुमच्यासाठी अतिशय उत्तम असून त्याचा पुरेपूर फायदा घ्या. दिवस आनंदात व समाधानात जाईल. महत्त्वाच्या कामांसाठी चर्चा करणं फायद्याचं ठरेल. डोळ्यांची काळजी घ्या. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी प्रयत्न करण्याची ही चांगली वेळ आहे. आज तुमच्या मनातील गोष्ट तुमचा जोडीदार ओळखू शकेल, अशी अपेक्षा अजिबात करू नका. काय असेल ते बोललं पाहिजे.

Lucky Colour : Royal Blue

Lucky Number : 6

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

शनिवारचा दिवस आनंदात जाईल. तुमचा उत्साह दिवसभर टिकून राहील. मालमत्तेमधून मिळणारा तुमचा नफा कमी होऊ शकतो; पण तुम्ही जे काम हाती घ्याल, त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी बिघडलेलं नातं सुधारण्याची अनुकूल वेळ आहे. त्यासाठी जोडीदाराला वेळ द्या.

Lucky Colour : Violet

Lucky Number : 4

चांदीच्या पायांनी चालणार शनिदेव! पुढचे 720 दिवस 5 राशींना सोन्याहून पिवळे

नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज तुमचे कार्य नावाजले जाईल. आज काही वेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता, त्यासाठी योग्य वेळ आहे. वाचन, लेखन यांना प्राधान्य द्या. कोणताही निर्णय घेताना स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. एखादी गोष्ट तुम्ही गमावत तर नाही ना, याची खात्री करा. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्लॅन करणे फायदेशीर ठरेल. जोडीदाराकडून तुमच्या यशाचं कौतुक होईल.

Lucky Colour : Lavender

Lucky Number : 11

नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा शनिवारचा दिवस तुमची मानसिक आणि शारीरिक परीक्षा घेणारा आहे, काळजी घ्या. तेलकट, मसालेदार पदार्थ खाऊ नका. आर्थिकदृष्ट्या विविध स्रोतांकडून पैसा मिळेल. जोडीदाराच्या मताशी तुम्ही सहमत नसलात तरी त्याला समजून घ्या. आज प्रेमाच्या नात्यात तडजोड करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

Lucky Colour : Violet

Lucky Number : 6

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: शनिदेव मेहरबान! नशिबाची साथ मिळत असल्याची प्रचिती आज या 3 मूलांकाना येणार; कर्मफळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल