TRENDING:

Numerology: कधीची काळजी लागलेली! सोमवारी आलेली खुशखबर या मूलांकाची चिंता दूर करेल; अंकशास्त्र

Last Updated:

Numerology: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 01 सप्टेंबर 2025 चा दिवस तुमच्यासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं जाणून घ्या.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
News18
News18
advertisement

सोमवारचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे. कामात तुमची क्रिएटिव्हिटी दिसून येईल. खर्च करताना काळजी घ्या. अनावश्यक खर्च करू नका. तुमचं बजेट आणि प्लॅननुसार निर्णय घ्या. आज तुम्ही तुमच्या गुंतवणुकीचं पुनरावलोकन करणं गरजेचं आहे. आर्थिक धोरणांवर लक्ष केंद्रित करा. आवश्यकतेनुसार त्यामध्ये सुधारणा करा. कोणताही मार्ग निवडताना तुमच्या अंतर्दृष्टीचा वापर करा, फायद्याचं ठरेल.

advertisement

नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आर्थिक बाबतीत सोमवार तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. मोठी खरेदी काही काळासाठी पुढं ढकला, फायद्याचं राहील. योग्य निर्णय घेता येईल. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांचं नियोजन करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमचं आर्थिक भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी ठोस पावले उचलण्याची हीच योग्य वेळ आहे. गुंतवणुकीच्या नवीन संधींचा विचार करा. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. आजचा दिवस सकारात्मक असून तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत खूप फायदेशीर ठरू शकतो. फक्त थोडं सावध राहा.

advertisement

नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सोमवारी आर्थिक बाबी आणि संधींवर लक्ष केंद्रित करा, फायद्याचं ठरेल. आर्थिक स्थितीवर परिणाम करू शकणाऱ्या घडामोडींची जाणीव ठेवा. आज तुम्ही जलद आणि माहितीपूर्ण निर्णय घेणं अपेक्षित आहे. तुम्हाला तुमची आर्थिक उद्दिष्टं पुढं नेता येतील. योग्य वेळी घेतलेले निर्णय लाभदायक ठरू शकतात. तुमचं लक्ष अचूकता आणि कार्यक्षमतेकडे वळवा. तुमचा बदललेला दृष्टिकोन तुम्हाला आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यास मदत करेल.

advertisement

नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज कुटुंबाशी संबंधित खर्च करताना तुमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव ठेवा. घरातील खर्चाचं योग्य मॅनेजमेंट करणे महत्त्वाचं ठरेल.  व्यावहारिकतेनं आर्थिक निर्णय घ्या. आज स्वतःच्या खर्चाच्या सवयी लक्षात घेणं गरजेचं आहे. योग्य नियोजन आणि निर्णय तुमचं आर्थिक आरोग्य सुधारतील. अशा परिस्थितीत विचारपूर्वक निर्णय घ्या. भविष्यासाठी कुटुंबासह एकत्र प्लॅन करा, फायद्याचं ठरेल.

advertisement

नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सोमवारी तुमचं उत्पन्न आणि खर्च यांच्यात योग्य संतुलन राहावे, यासाठी क्रिएटिव्ह पद्धतीनं बजेट तयार करा, फायद्याचं राहील.  कोणत्याही प्रकारचा अवाजवी खर्च टाळा, जेणेकरून तुमचं बजेट संतुलित राहील. तुमच्या आर्थिक योजना काळजीपूर्वक तयार करा. आवश्यकतेनुसार खर्च करण्याची सवय ठेवा. नवीन आर्थिक संधींचा शोध घ्या. व्यवसायात गुंतवणूक किंवा नवीन प्रयोग करण्यासाठी ही चांगली वेळ आहे. आज येणाऱ्या संधींचा पुरेपूर फायदा घ्या. आज तुम्ही योग्य निर्णय घेऊनच तुमची आर्थिक स्थिती मजबूत करू शकता.

पितृपक्षाच्या सुरुवातीलाच नशिबाचं दार उघडणार! 5 राशीच्या लोकांसाठी पंधरवडा वरदान

नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज सोमवारी व्यावहारिक दृष्टिकोन ठेवून आर्थिक नियोजन करा, फायद्याचं राहील. अनावश्यक खर्चापासून सावध राहा. खरेदी करताना शक्य तितका संयम ठेवा. छोटछोट्या आर्थिक गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे फायदेशीर ठरेल. तुमच्या आर्थिक नियोजनात आवश्यक ते बदल करण्याची आज तुम्हाला संधी मिळेल. अशी संधी स्वीकारल्यानं तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. कारण तुमचा विश्लेषणात्मक दृष्टिकोन आणि पद्धतशीर नियोजन तुम्हाला चांगले परिणाम देईल. तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या नवीन संधी येऊ शकतात, त्या स्वीकारा. आर्थिक निर्णय काळजीपूर्वक घ्या.

नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आजचा दिवस तुमच्या आर्थिक स्थितीसाठी महत्त्वाचा आहे. तुमच्या आर्थिक योजनांवर लक्ष केंद्रित करा. तुमची आर्थिक स्थिरता सुनिश्चित करणाऱ्या दीर्घकालीन योजनांचा विचार करा. आज खर्च करताना स्वतःवर नियंत्रण ठेवा. अनावश्यक किंवा लक्झरी वस्तूंवर होणारा आवेगपूर्ण खर्च टाळा. आज विचारपूर्वक निर्णय घेतल्यानं तुमची आर्थिक उद्दिष्टं सहज साध्य होतील. तुमच्या बजेटचा विचार करणे तुमच्यासाठी आज फायदेशीर ठरेल.

नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

आज आर्थिक बाबतीत सावध राहा. तुमच्या आर्थिक स्रोतांवर लक्ष केंद्रित करा, फायद्याचं ठरेल. तुमच्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांचं पुनरावलोकन करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. आज कोणतीही अनावश्यक जोखीम घेणं टाळा. गुंतवणूक किंवा खरेदीच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू नका. आज विचारपूर्वक केलेलं काम तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.

हातून नकळत घडलेल्या या गोष्टींमुळे पूर्वज अतृप्त राहतात; पितृदोष कुटुंबाला छळतो

नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)

सोमवारचा दिवस तुमच्यासाठी आर्थिक बाबतीत सकारात्मक राहील. आज तुम्ही कोणतीही जोखीम घेताना सावध राहा. ती तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांशी सुसंगत आहे का, याची खात्री करा. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सध्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घ्या. गुंतवणुकीच्या बाबतीत हुशारीनं निर्णय घ्या. तुमच्या बजेटला प्राधान्य द्या, फायद्याचं ठरेल.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: कधीची काळजी लागलेली! सोमवारी आलेली खुशखबर या मूलांकाची चिंता दूर करेल; अंकशास्त्र
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल