Pitrudosh: हातून नकळत घडलेल्या या गोष्टींमुळे पूर्वज अतृप्त राहतात; पितृदोष अख्ख्या घराला छळतो
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Pitrudosh: काही कारणांनी पूर्वजांचा आत्मा अतृप्त राहतो, कुटुंबातील लोकांना त्रास देतो. घरात कलह आणि अशांतता निर्माण होते. आपल्याकडून होणाऱ्या काही चुकांमुळेही पितृदोष होतो. पितृदोषाची कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.
मुंबई : हिंदू धर्मात पूर्वजांना देवासारखे मानले जाते. ज्याप्रमाणे देवतांची पूजा केल्याने आशीर्वाद मिळतात, त्याचप्रमाणे पूर्वजांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान करणे आवश्यक मानले जाते. ही कर्मे विधी-नियमांनुसार केली गेली नाहीत तर कुटुंबाला पितृदोषाचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत पूर्वजांचा आत्मा अतृप्त राहतो, कुटुंबातील लोकांना त्रास देतो. घरात कलह आणि अशांतता निर्माण होते. आपल्याकडून होणाऱ्या काही चुकांमुळेही पितृदोष होतो. पितृदोषाची कारणे काय आहेत ते जाणून घेऊया.
पूर्वजांच्या अपूर्ण इच्छा - पूर्वजांच्या इच्छा अपूर्ण राहिल्या आणि वंशज त्या पूर्ण करू शकले नाहीत, तर हे पितृदोषाचे मुख्य कारण बनू शकते. असं अनेकदा अकाली मृत्यूच्या बाबतीत घडते.
पिंडदान किंवा श्राद्ध न करणे - शास्त्रांनुसार, पिंडदान किंवा श्राद्ध न केल्याने पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळत नाही, ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो.
advertisement
पूर्वजांचा अनादर - एखाद्या व्यक्तीने जिवंतपणी आपल्या पूर्वजांचा अनादर केला किंवा आपल्या पालकांप्रती असलेली कर्तव्ये पार पाडली नाहीत तर त्यामुळे पितृदोष होऊ शकतो.
योग्यपणे अंत्यसंस्कार न करणे - शास्त्रांनुसार, जेव्हा एखाद्या व्यक्तीचे अंतिम संस्कार नियमांनुसार केले जात नाहीत तेव्हा त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि कुटुंबावर पितृदोषाचा परिणाम होतो.
advertisement
असहायांची हत्या - एखाद्या व्यक्तीने असहाय किंवा निष्पाप व्यक्तीची हत्या केली तर त्याला पितृदोषाचा सामना करावा लागू शकतो. शास्त्रांनुसार, पिंपळ, वड आणि कडुनिंब यांसारखी पवित्र किंवा पूजनीय झाडे तोडल्याने पितृदोष होतो.
अंत्यसंस्कारात चूक - शास्त्रांनुसार जर एखाद्या व्यक्तीचे अंतिम संस्कार नियमांनुसार केले गेले नाहीत तर त्याच्या आत्म्याला शांती मिळत नाही आणि त्यामुळे पितृदोष होतो. शास्त्रांनुसार, प्राण्यांना छळणाऱ्या किंवा मारणाऱ्यांना पितृदोष लागू शकतो. तसेच, ज्या लोकांच्या मनात कपट आहे, इतरांना फसवतात किंवा मालमत्तेच्या वादात चुकीचा मार्ग स्वीकारतात ते पितृदोषाच्या प्रभावाखाली येऊ शकतात.
advertisement
धार्मिक नियमांचे पालन न करणे - शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की उपवास, सण आणि पितृतिथी या दिवशी मांस आणि मद्य सेवन करणे हे पूर्वजांचा अपमान मानले जाते, ज्यामुळे पितृदोष होऊ शकतो.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2025 3:06 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Pitrudosh: हातून नकळत घडलेल्या या गोष्टींमुळे पूर्वज अतृप्त राहतात; पितृदोष अख्ख्या घराला छळतो