आज सोमवारी तुमची लोकप्रियता वाढलेली असेल. स्वभाव नियंत्रणात ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. कामात तुमच्या कल्पनांना विरोध होईल. संयम ठेवा. नोकरदारांची पदोन्नती होऊ शकते. मोठी सुट्टी मागण्यासाठी चांगला दिवस आहे. जोडीदाराशी असणाऱ्या नात्यात प्रेमाची भावना कमी होत आहे, असे वाटू शकते. घाईघाईनं कोणताही निर्णय घेऊ नका.
Lucky Colour : Brown
Lucky Number : 17
advertisement
मूलांक 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज सोमवारी ऑफिसमध्ये वरिष्ठांकडून तुमचं कौतुक होईल पण, त्यासा थोडा उशीर होऊ शकतो. वादात पडू नका. जमीन किंवा मालमत्ता खरेदीसाठी चांगली संधी येईल. कर्जाची परतफेड कराल. जोडीदार तुमच्याकडे आकर्षित होईल. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला आहे.
Lucky Colour : Green
Lucky Number : 5
मूलांक 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज ऑफिसमध्ये वरिष्ठांकडे प्रलंबित असणारी कामे सहज मार्गी लागतील. आईकडून तुम्हाला मदत मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. ऑफिसमध्ये दबावाखाली काम करताना शांत राहण्याची तुमची क्षमता तुमच्या सहकाऱ्यांना प्रभावित करेल.
Lucky Colour : Red
Lucky Number : 22
मूलांक 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज एखाद्या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हाल. मुलांशी संबंधित वाईट बातमी मिळाल्यानं दिवस खराब जाईल. विरोधकांवर सहज मात कराल. नोकरदारांना पदोन्नती मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. प्रेमाच्या बाबतीत एखाद्या औपचारिक कार्यक्रमात एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते.
Lucky Colour : Pink
Lucky Number : 6
मूलांक 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज आत्मविश्वासानं काम करा. स्वप्न पूर्ण होतील. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा पश्चाताप वाटत असल्यास ती गोष्ट सुधारण्याची संधी मिळेल. जमिनीचं किंवा मालमत्तेचं नुकसान होऊ शकतं. ज्ञान आणि बुद्धीच्या बळावर करिअरमध्ये प्रगती कराल. प्रेमाच्या बाबतीत दिवस चांगला आहे. नातं घट्ट होण्यासाठी एकमेकांचा स्वभाव समजून घेणं फायद्याचं ठरेल.
Lucky Colour : Saffron
Lucky Number :18
मूलांक 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.
आज तुम्ही जे काही काम हाती घ्याल, ते सहज पूर्ण होईल. कुटुंबातील महिलांची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. पैसे किंवा मौल्यवान वस्तू हरवण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांकडून तुमचं कौतुक होईल. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. तुम्हाला आवडणारा छंद जोडीदारासाठी त्रासदायक ठरू शकतो. अशा परिस्थितीत तडजोडीची तयारी ठेवा.
Lucky Colour : White
Lucky Number : 8
मूलांक 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज ऑफिसमध्ये बॉसशी वागताना सावध राहा. ते तुमच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागू शकतात. मुलांशी संबंधित वाईट बातम्या तुमचा दिवस खराब करतील. अपघात होण्याची शक्यता आहे, काळजी घ्या. आर्थिकदृष्ट्या पैसा मिळतील. पण अनावश्यक खर्च करण्यापेक्षा अडचणीच्या काळासाठी बचत करा. जोडीदाराशी असणाऱ्या नातेसंबंधांत वचनबद्धता महत्त्वाची राहील.
Lucky Colour : Blue
Lucky Number : 9
मूलांक 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुमच्या संपर्कात कोणी नवीन व्यक्ती येऊ शकते. अशा व्यक्तींकडून तुम्हाला मौल्यवान माहिती मिळेल. तुमचा मूड चांगला राहील. कार खरेदी करण्यासाठी उत्तम वेळ आहे. व्यवसायात बदल होऊ शकतो. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही योग्य ठिकाणी जोडीदाराचा शोध घेत आहात, याची खात्री करा.
Lucky Colour : Maroon
Lucky Number : 1
मूलांक 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज एखाद्या धार्मिक स्थळाला भेट द्याल, त्यासाठी योग्य वेळ आहे. कामाच गोंधळ असेल. आरोग्याच्या दृष्टिनं मॉर्निंग वॉकला जा, व्यायाम करा, फायद्याचं राहील. मानसिक ऊर्जा चांगली असेल. संवाद कौशल्य दिसून येतील. जोडीदाराशी तुमचं नातं उत्तम राहील.
Lucky Colour : Orange
Lucky Number : 15