अनपेक्षित अडचणींमुळे दैनंदिन कामे विस्कळीत होण्याची शक्यता आहे. काहींच्या मुलांशी संबंधित वाईट बातमी मिळाल्यानं दिवस खराब जाईल. आज आरोग्य उत्तम राहील. दिवसभर कामात उत्साह चांगला राहील. लक्ष्मी कृपेनं अपेक्षित पैसा मिळाल्यानं आर्थिक स्थिती चांगली असेल.
Lucky Colour: Grey
Lucky Number: 22
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आज गुरुवारचा दिवस लकी आहे. तुमच्यातील वेगळेपण तुम्हाला वेगळी ओळख निर्माण करून देईल. तुमचा मूड चांगला राहील. दीर्घकाळापासून सुरू असलेला टेन्शनपासून सुटका होईल. आरोग्याच्या दृष्टिनं उत्साही वाटेल. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. विरोधकांचे डाव ओळखून सावध राहा.
Lucky Colour: Orange
Lucky Number: 1
आयुष्यात काहीच नीट मिळत नाही! बेक्कार कुंडली असणाऱ्यांच्या तळहातवर अशा खुणा
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज गुरुवारी जास्तीच्या कामाची तयारी ठेवा. आर्थिकदृष्ट्या काही मदत मिळेल, अशी अपेक्षा करीत असाल किंवा गुंतवणुकीचा प्लॅन तयार करीत असाल, तर तुमची निराशा होऊ शकते. अशा परिस्थितीत या गोष्टी काही काळासाठी पुढं ढकलणं फायद्याचं ठरेल. प्रेमाच्या बाबतीत तुम्ही एखाद्या नवीन व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकता. पण मनातील भावना त्या व्यक्तीसमोर व्यक्त कशा कराव्यात, याबाबत गोंधळ असेल.
Lucky Colour : Black
Lucky Number : 6
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
गुरुवारी अडचणी वाढू शकतात, कामे वेळेत हातावेगळी करण्याला प्राधान्य द्या. सध्या विविध समस्यांचा सामना करीत आहात. तुमच्याकडे इतर व्यक्ती आकर्षित होतील. डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो, विश्रांती घ्या. तुम्ही तुमची उद्दिष्टं सहज साध्य कराल. जोडीदारासोबत आजची सायंकाळ आनंदात जाईल. घरात चांगले वातावरण असेल.
Lucky Colour : Blue
Lucky Number : 17
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज गुरुवारी कामात अनपेक्षितपणे कोणाचा तरी पाठिंबा मिळू शकतो. ज्याचा तुम्हाला फायदा होईल. कला, साहित्य आणि संगीत क्षेत्रात रूची राहील. आज सुरक्षित राहण्याला प्राधान्य द्या. एखाद्या मालमत्तेच्या व्यवहारातून तुम्हाला अनपेक्षित फायदा होऊ शकतो. जोडीदाराचं आरोग्य तुमच्यासाठी चिंतेचे कारण ठरू शकते, काळजी घ्या.
Lucky Colour : Black
Lucky Number : 2
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज गुरुवारी कोणतंही काम आत्मविश्वासानं केल्यानं फायदा होईल. तुमची स्वप्ने प्रत्यक्षात येतील. मुलांच्या शाळेतून चांगली बातमी मिळेल. विरोधकांवर तुम्ही सहज मात कराल. व्यवसायाच नीट प्लॅन करणं तुमच्या करिअरच्या दृष्टिनं उत्तम राहील. जोडीदारावर विश्वास दाखवून नीट काम करा.
Lucky Colour : Brown
Lucky Number : 18
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं चंचलतेचं कारण? प्रगती साधतात पण...
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज गुरुवारी कामात मन लावून कष्ट केल्यास यश मिळेल. तुमचा इतर लोकांवर प्रभाव राहील. आजच्या दिवसाचा शेवट तुम्हाला आनंद देणारा ठरेल. ऑफिसमध्ये बॉसशी मतभेद होऊ शकतात, काळजी घ्या. भविष्याचं नियोजन करण्यासाठी वेळ अनुकूल असून तिचा फायदा घ्या.
Lucky Colour: Red
Lucky Number: 1
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज गुरुवारी आपणास प्रत्येक गोष्टीत यश मिळू शकते, नशिबाची उत्तम साथ आहे. काही चढ-उतार राहतील. घरासाठी वस्तू खरेदी केल्यानं उत्साह वाढेल. मालमत्तेची खरेदी अंतिम करण्यासाठी वेळ चांगली आहे. अथक प्रयत्नांमुळे यशाचा मार्ग खुला होईल. प्रेमाच्या बाबतीत जोडीदाराशी असणारं नातं त्रासदायक ठरू शकते, काळजी घ्या.
Lucky Colour : Turquoise
Lucky Number : 5
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज तुम्हाला समाजात नवीन ओळख मिळेल. त्यामुळं सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या दृष्टिनं किरकोळ समस्या उद्भवू शकते, काळजी घ्या. व्यापारातून मोठा नफा मिळेल. जोडीदाराशी वाद होऊ शकतो. मात्र काळजी करू नका, प्रेमाच्या शब्दांनी हा वाद सहज मिटेल.
Lucky Colour : Lemon
Lucky Number : 3