वृषभ - वृषभ राशीवाल्यांसाठी हा आठवडा प्रेमाच्या बाबतीत एकदम 'फर्स्ट क्लास' आहे. जर कुणावर प्रेम असेल, तर हीच ती वेळ आहे मनातील गोष्ट सांगण्याची. तुमच्यातील प्रामाणिकपणा नातं अधिक घट्ट करेल. जे सिंगल आहेत, त्यांच्या आयुष्यात कुणीतरी खास व्यक्ती येऊ शकते. मैत्रीचं रूपांतर प्रेमात व्हायला वेळ लागणार नाही. जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा काळ मस्त आहे.
advertisement
मिथुन - तुमच्यासाठी हा आठवडा खूपच भारी असेल. तुमची बोलण्याची पद्धत आणि स्टाईल समोरच्याला वेड लावेल. कुणी आवडत असेल तर बिनधास्त पुढे व्हा. नात्यात ताजेपणा राहिल्यामुळे तुमचं बाँडिंग वाढेल. जे आधीपासून नात्यात आहेत, त्यांनी जोडीदाराला एखादं मस्त सरप्राईज द्यावं किंवा कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन करावा. यामुळे प्रेमातली गोडी वाढेल.
कर्क - प्रेमाच्या बाबतीत हा आठवडा थोडा 'डेन्जर' वाटतोय. मनात थोडी घालमेल राहील. पार्टनरसोबत किरकोळ कारणावरून वाद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना जरा जपून. आपल्या भावना मनात दाबून न ठेवता स्पष्टपणे सांगा. जे सिंगल आहेत, त्यांनी नवीन नातं सुरू करताना घाई करू नका. आधी समोरच्याला नीट ओळखा आणि मगच निर्णय घ्या.
24 तासात नशीब पालटणार! कुंभ राशीत मंगळादित्य योग, 3 राशींना अनपेक्षित गुडन्यूज
सिंह - या आठवड्यात प्रेमजीवनात थोडी अस्वस्थता जाणवेल. मनावर ताबा ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही नात्यात असाल, तर जोडीदाराशी मनमोकळेपणाने बोला. तुमच्या मनात नेमकी काय गडबड सुरू आहे, हे त्याला किंवा तिला समजू द्या. उगाच मनातल्या मनात चिडचिड करून नातं खराब करू नका. तुमचं खरं बोलणं आणि प्रामाणिकपणाच या आठवड्यात तुमची साथ देईल.
कन्या - प्रेमासाठी हा आठवडा एकदम 'सुपर' आहे. तुमची नाती अधिक गोड आणि जवळची होतील. कुणाकडे आकर्षित असाल तर ती गोष्ट बोलून दाखवण्यासाठी हा काळ एकदम परफेक्ट आहे. तुमचं बोलणं समोरच्याच्या काळजाला भिडेल. पार्टनरसोबत छान वेळ घालवल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. एखादा रोमँटिक डिनर प्लॅन करा, नात्यातली एक्साईटमेंट वाढेल.
तूळ - तूळ राशीच्या लोकांसाठी प्रेमाचा एक नवीन आणि सुंदर अध्याय सुरू होणार आहे. तुमच्या भावना खूप प्रामाणिक असतील, ज्याचा जोडीदारावर चांगला प्रभाव पडेल. जे सिंगल आहेत, त्यांच्यासाठी नवीन प्रेमाची चाहूल लागण्याचे संकेत आहेत. जर जुन्या काही गोष्टींवरून मनात अढी असेल, तर ती काढून टाकण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. सगळीकडे प्रेमाचं वातावरण राहील.
वृश्चिक - या आठवड्यात तुम्हाला नात्यात थोडी असुरक्षितता किंवा भीती वाटू शकते. जोडीदाराबद्दल संशय किंवा चिंता मनात येईल. पण अशा वेळी मनात काहीही न ठेवता स्पष्टपणे बोलणं गरजेचं आहे. गैरसमज वाढण्यापेक्षा ते संवादातून संपवणं कधीही चांगलं. खरं प्रेम संकटातच जास्त वाढतं, हे लक्षात ठेवा. थोडा धीर धरा, परिस्थिती नक्कीच सुधारेल.
माणसाला नरकाच्या दाराशी नेणाऱ्या 3 गोष्टी; श्रीकृष्णाने भगवद् गीतेत सांगितलंय..
धनु - तुमच्या प्रेमजीवनात या आठवड्यात खूप काही 'थ्रिलिंग' घडणार आहे. उत्साहाने भरलेला हा आठवडा असेल. जोडीदारासोबत फिरायला जाणं किंवा काहीतरी ॲडव्हेंचरस करणं तुम्हाला आनंद देईल. तुमचं पॉझिटिव्ह वागणं जोडीदाराला खूप आवडेल. एकंदरीत, नात्यातली गोडी आणि जवळीक वाढवण्यासाठी हा आठवडा खूपच फायदेशीर ठरेल.
मकर - प्रेमजीवनात या आठवड्यात थोडी गुंतागुंत होऊ शकते. छोट्या गोष्टींचा डोंगर होईल, त्यामुळे तणाव वाढेल. जोडीदाराच्या म्हणण्याचा भलताच अर्थ काढू नका, नाहीतर कन्फ्युजन वाढेल. प्रेमाला थोडा वेळ द्यावा लागतो, हे समजून घ्या. नात्यातला तोचतोचपणा घालवण्यासाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा. घाईघाईत कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नका.
कुंभ - कुंभ राशीवाल्यांसाठी हा आठवडा प्रेमाच्या दृष्टीने एकदम 'लकी' आहे. जोडीदाराशी तुमचं ट्युनिंग खूप चांगलं राहील. मनात कुणाबद्दल प्रेम असेल तर हीच वेळ आहे ते व्यक्त करण्याची. प्रामाणिकपणे वागाल तर नशीब तुमची साथ देईल. नवीन नाती जुळण्याची दाट शक्यता आहे. तुमचं प्रेम तुम्हाला शोधत येईल, फक्त मनाची कवाडं उघडी ठेवा.
मीन - या आठवड्यात प्रेमजीवनात थोडी अनिश्चितता किंवा शंका वाटू शकते. जोडीदाराशी मनातल्या गोष्टी शेअर करा, म्हणजे मनावरचा भार कमी होईल. गप्पा मारल्यामुळे तुमच्यातील दुरावा नक्कीच कमी होईल. जे सिंगल आहेत, त्यांना एखादी व्यक्ती भेटू शकते, पण पहिल्या भेटीतच लगेच डोळे मिटून विश्वास ठेवू नका. जरा सावधगिरी बाळगा आणि समोरच्याला नीट पारखून घ्या.
