28 नोव्हेंबरला शनि मार्गी
शनीचा मार्गी होणे हा एक अत्यंत महत्त्वाचा योग मानला जातो. यावेळी शनि मीन राशीत थेट गतीने भ्रमण करेल. या स्थितीत काही राशींना अपार यश, प्रगती आणि आर्थिक वृद्धीचे संकेत मिळतात. अनेकांच्या आयुष्यात अडकलेली कामे पूर्ण होतात, तर काहींना त्यांच्या मेहनतीचे फल मिळते. यंदाच्या शनी मार्गी योगामुळे तीन राशी विशेष भाग्यवान ठरणार आहेत.
advertisement
कर्क राशी
कर्क राशीच्या लोकांसाठी शनीचे मार्गी होणे अत्यंत शुभ मानले जात आहे. नोकरीत मोठी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. वेतनात लक्षणीय वाढ होईल. पैसे कमावण्याचे नवीन मार्ग खुलतील. जुनी गुंतवणूक अचानक चांगला परतावा देईल. व्यावसायिक जीवनात प्रतिष्ठा, मान-सन्मान आणि गौरव मिळेल. दीर्घकाळ चालू असलेले वाद किंवा तणाव दूर होतील. एकूणच, कर्क राशीसाठी हा काळ आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या उन्नतीचा काळ ठरणार आहे.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीवर शनिदेवांची विशेष कृपा राहील. कामाच्या ठिकाणी अचानक बढती किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते. पैशाची टंचाई संपून आर्थिक स्थिती सुधारेल.प्रलंबित कामे वेगाने पूर्ण होतील.परदेश प्रवासाचे योग तयार होऊ शकतात.
कुंभ राशी
कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल. शनी मार्गी होताच अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कोणतेही अडथळे असलेली कामे सहज पूर्ण होतील. नवीन नोकरी मिळू शकते किंवा सध्याच्या नोकरीत जबरदस्त प्रगती होईल. व्यवसायातील नफा वाढेल आणि परदेशातून संधी मिळतील. घर, वाहन किंवा जमीन खरेदीचे योग तयार होऊ शकतात. एकूणच, कुंभ राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि स्थिरतेकडे नेणारा राहील.
शनीचा चांदीचा पाय, विशेष शुभ योग
ज्योतिषानुसार, जेव्हा चंद्र शनीपासून दुसऱ्या, पाचव्या किंवा नवव्या घरात असतो, तेव्हा त्याला शनीचा चांदीचा पाय असा शुभ योग मानले जाते. अशा स्थितीत व्यक्तीला धनलाभ, प्रतिष्ठा, सुदैव आणि कार्यसिद्धी मिळते.
