गणपतीला 'विघ्नहर्ता' किंवा 'विघ्नेश्वर' मानले जाते. याचा अर्थ ते सर्व अडथळे आणि संकटे दूर करणारे आहेत. त्यामुळेच, कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या पूजेने केली जाते. गणपतीला बुद्धीची आणि ज्ञानाची देवता मानले जाते. त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला बुद्धी आणि विवेक प्राप्त होतो. गणपतीची उपासना केल्याने घरात सुख-समृद्धी, शांती आणि सौभाग्य येते अशी धार्मिक श्रद्धा आहे. लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देऊन समाजातील लोकांना एकत्र आणले. त्यामुळे हा उत्सव सामाजिक एकतेचे प्रतीकही बनला आहे.
advertisement
गणपतीच्या 21 नावांचा जप करण्याचे महत्त्व -
गणेशोत्सवात दररोज सकाळ, संध्याकाळी गणरायाच्या 21 नावांचा जप केल्यानं सर्व कामे पूर्ण होतात, देवाचे आशीर्वाद देखील मिळतात. गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, रिद्धी-सिद्धी प्राप्ती आणि कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी गणपतीच्या 21 नावांचा जप करणे शुभफळदायी मानलं जातं. जो व्यक्ती भक्तीने या नावांचा जप करतो त्याच्या जीवनातील अडचणी, त्रास आणि कलंक दूर होतात. 21 दुर्वा आणि 21 लाडू अर्पण करून 21 नावांचा जप केल्यानं श्री गणेश खूप प्रसन्न होतात, असं मानलं जातं.
श्रीगणेशाची 21 नावे -
ॐ सुमुखाय नमः
ॐ गणाधीशाय नमः
ॐ उमापुत्राय नमः
ॐ गजामुखाय नमः
ॐ लम्बोदराय नमः
ॐ हर पुत्राय नमः
ॐ शूर्पकर्णाय नमः
ॐ वक्रतुण्डाय नमः
ॐ गुहाग्रजाय नमः
ॐ एकदंताय नमः
ॐ हेरम्बाय नमः
ॐ चतुर्होंत्रे नमः
ॐ सर्वेश्वराय नमः
ॐ विकटाय नमः
ॐ हेमतुण्डाय नमः
ॐ विनायकायनमः
ॐ कपिलाय नमः
ॐ वटवे नमः
ॐ भालचंद्रय नमः
ॐ सुराग्रजाय नमः
ॐ सिद्धि विनायक नमः
घरात पूजेसाठी गणेश मूर्ती खरेदी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)