या काळात देवी दुर्गेची उपासना केल्याने घरात सुख-समृद्धी आणि आनंद टिकून राहतो. ज्योतिषशास्त्रानुसार, चैत्र नवरात्री सुरू होण्यापूर्वी काही शुभ वस्तू घरी आणणे अत्यंत लाभदायक मानले जाते. या वस्तू घरी आणल्याने वास्तू दोष दूर होतात आणि सकारात्मकता टिकून राहते. चैत्र नवरात्रीपूर्वी कोणत्या वस्तू घरी आणाव्यात ते जाणून घेऊया.
कलश - नवरात्रीमध्ये घटस्थापनेला विशेष महत्त्व असते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापना केली जाते. अशा परिस्थितीत चैत्र नवरात्रीपूर्वी पितळ किंवा तांब्याचा कलश नक्कीच घरी घेऊन या. हे दोन्ही प्रकारचे कलश पवित्रता आणि शुभतेचे प्रतीक मानले जातात.
advertisement
मंदीत संधी! 1 एप्रिलपर्यंत राहुच्या नक्षत्रात बुध; या 3 राशीच्या लोकांना जबरदस्त फायदा होणार
मोरपंख - चैत्र नवरात्रीपूर्वी मोरपंख घरी आणणे खूप शुभ मानले जाते. नवरात्री सुरू होण्यापूर्वी मोरपंख घराच्या मंदिरात किंवा मुख्य प्रवेशद्वाराजवळ ठेवावा. असे केल्याने घराचा वास्तू दोष दूर होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
सोने किंवा चांदीचे नाणे - चैत्र नवरात्रीपूर्वी सोने किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. नवरात्रीमध्ये हे नाणे पूजास्थळी ठेवा आणि नंतर तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा. असे केल्याने आर्थिक सुबत्ता येण्यास मदत होते आणि घरात संपन्नता तसेच समृद्धी टिकून राहते.
साडेसाती सुरू असलेल्या मीन राशीत सूर्य-शनिचा संयोग; 4 राशींच्या अडचणी आणखी वाढणार
सोळा शृंगार साहित्य - चैत्र नवरात्रीपूर्वी सोळा शृंगाराच्या वस्तू खरेदी करून ठेवाव्यात. नवरात्रीमध्ये देवी दुर्गाला सोळा शृंगाराचे साहित्य अर्पण केल्याने वैवाहिक जीवनात मधुरता येते आणि पती-पत्नीमधील नाते पूर्वीपेक्षा अधिक चांगले व्हायला त्याने मदत होते.
कमळाचे फूल - नवरात्रीच्या एक दिवस आधी कमळाचे फूल खरेदी करून ठेवा. त्यानंतर ते देवी दुर्गाच्या चरणी अर्पण करा. देवी दुर्गेला कमळाचे फूल अर्पण केल्याने घरात सुख-शांती आणि समृद्धी लाभते. यामुळे घराचा साठा धनधान्याने भरलेला राहतो.
