छत्रपती संभाजीनगर : दिवाळीला सुरुवात झाली आहे. दिवाळी म्हटल्यावर सर्वांच्याच आयुष्यामध्ये सुख, समृद्धी, शांती यावी अशी सगळ्यांची इच्छा असते. त्यामुळे यावर्षी दिवाळी कुठल्या राशीसाठी चांगली असणार आहे, त्यासोबतच कोणी कोणती निर्णय घ्यावेत, काय काळजी घ्यावी, याविषयी गुरूजी श्रीरामजी धानोरकर यांनी महत्त्वाची माहिती दिली. जाणून घेऊयात, ते काय म्हणाले.
यावर्षीची दिवाळी ही सर्वच राशींसाठी चांगली आहे. यावर्षी दिवाळीमध्ये सर्वांनी सकाळी उठल्यानंतर अभ्यंग स्नान करावे. त्यानंतर आपल्या कुलदैवताचे दर्शन घ्यावे आणि आपल्या घरातील वडीलधाऱ्या सर्व व्यक्तींचा आशीर्वाद घ्यावा हे प्रत्येक राज्यातील व्यक्तींनी या दिवाळीमध्ये करायला हवे. त्यासोबतच मेष, कर्क, वृश्चिक या राशीच्या लोकांना कुठलाही महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल किंवा काही निर्णय घ्यायचा असेल तर त्यांनी तो निर्णय अतिशय शांततेत घ्यावा. यासाठी कुठलाही गोंधळ किंवा क्लेश करू नये.
advertisement
वृषभ, कन्या आणि धनु राशीच्या लोकांनी आपल्या जोडीदाराच्या सल्ल्यानेच कुठलाही निर्णय किंवा व्यवहार करावा जेणेकरून त्यांना तो फलदायी ठरणार आहे. मिथुन, तूळ आणि कुंभ राशीच्या लोकांनी एखादी वस्तू जपून ठेवली असेल किंवा एखादी गुंतवणूक त्याने करून ठेवली असेल आणि जर त्यांनी ती आता काढली तर त्यांचा त्यांना खूप फायदा होणार आहे किंवा या राशीच्या लोकांनी आता जर कुठली गुंतवणूक केली तर त्याचा त्यांना भविष्यामध्ये फायदा होणार आहे.
एकावेळी किती पाणीपुरी खाऊ शकते, अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरनं काय सांगितलं, VIDEO
सिंह, मकर आणि मीन राशीच्या लोकांना ही दिवाळी विशेष लाभदायी असणार आहे. या राशीच्या लोकांना कुठलाही व्यवहार करायचा असेल तर त्यांनी सगळ्यात पहिले आपल्या कुलदेवतेचा स्मरण करावे, त्यांच्या पाया पडाव्या आणि त्याच्यानंतर हा व्यवहार करावा. त्यामुळे त्यांना खूप फायदा होणार आहे, असे यावेळी गुरुजींनी सांगितले आहे. तर एकंदरीत सर्व राशींसाठी ही दिवाळी अतिशय चांगली जाणार आहे. त्यामुळे सर्वांनी आपली दिवाळी छान साजरी करावी, असेही ते म्हणाले.
सूचना - ही माहिती धर्म आणि शास्त्राच्या आधारे आचार्यांशी बोलून लिहिली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. याब