एकावेळी किती पाणीपुरी खाऊ शकते, अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरनं काय सांगितलं, VIDEO

Last Updated:

anushka pimputkar interview - पाणीपुरी चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का पिंपुटकर आणि प्रतीक्षा जाधव यांच्यासोबत लोकल18 च्या टीमने विशेष संवाद साधला.

+
अभिनेत्री

अभिनेत्री अनुष्का पिंपुटकर

निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई - आयुष्याचा समतोल साधायचा असेल तर दोन परस्परविरुध्द, भिन्न स्वभावाची व्यक्तिमत्त्व एकत्र असणे ही देखील सहजीवनाची गरज असते. अशीच सहजीवनाची ही गंमत उलगडणारा ‘लज्जतदार नात्यांची चटकदार गोष्ट’ सांगणारा पाणीपुरी हा चित्रपट येत्या 15 नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
चित्रपटाच्या निमित्ताने अनुष्का पिंपुटकर आणि प्रतीक्षा जाधव यांच्यासोबत लोकल18 च्या टीमने विशेष संवाद साधला. यावेळी दोघींनी सांगितले की, आमच्या सिनेमाचं शूट फक्त 20 दिवसांचे होते. पण या 20 दिवसांमध्ये देखील आमची खूप छान मैत्री झाली. पाणीपुरीच्या प्रेमाबद्दल सांगताना अनुष्का म्हणाली की "मी एका वेळी 20 पेक्षा जास्त पाणीपुरी खाऊ शकते, तसेच प्रतीक्षा म्हणाली की, प्रत्येक स्त्री असो वा पुरुष पाणीपुरी हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. यावेळी दोघींनी पाणीपुरी या विषयावर भरभरुन गप्पा मारल्या.
advertisement
रमेश चौधरी यांनी या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच एकत्र काम करणाऱ्या या कलाकारांची पडद्यावरील नवी केमिस्ट्री प्रेक्षकांसाठी नक्कीच मनोरंजक ठरेल. ‘पाणीपुरी’ चित्रपटाचा मजेशीर टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे.
नर्म विनोदी, खेळकर पद्धतीने जीवनदर्शन घडवत या जोड्यांच्या प्रेमाची परिणीती, त्यांचा प्रवास भविष्यामध्ये कशाप्रकारे होतो याची गमतीशीर कथा म्हणजे ‘पाणीपुरी’ चित्रपट आहे. कैलास वाघमारे, शिवाली परब, भारत गणेशपुरे, प्राजक्ता हनमघर, ऋषिकेश जोशी, प्रतीक्षा जाधव, सचिन बांगर, अनुष्का पिंपूटकर, मकरंद देशपांडे, सायली संजीव आणि विशाखा सुभेदार अशी तगडी स्टार कास्ट या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
advertisement
चित्रपटाचे छायांकन आणि संकलन सिद्धेश मोरे यांचे आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद संजय नवगिरे यांनी लिहिले आहेत. संगीत अजित परब तर पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. गीतकार मंदार चोळकर यांच्या गीतांना गायक मंदार आपटे, अजित परब यांचे स्वर लाभले आहेत. मनोरंजनाची ही चटकदार ‘पाणीपुरी’ 15 नोव्हेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
एकावेळी किती पाणीपुरी खाऊ शकते, अभिनेत्री अनुष्का पिंपुटकरनं काय सांगितलं, VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement