शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रब्बीतही मिळणार 1 रुपयात पीक विमा, शेवटची तारीख अन् प्रोसेस काय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
crop insurance in rabi - हा विमा नेमका कसा काढला जातो, याचविषयी माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्याशी संवाद साधला.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : राज्य सरकारने 2023 पासून खरीप आणि रब्बी हंगामात एक रुपयात पीक विमा उपलब्ध करून दिल्यानंतर यंदाही रब्बी हंगामातील पिकांसाठी एक रुपयातच विमा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 1 नोव्हेंबरपासून गहू, हरभरा, कांदा व ज्वारीसाठी विमा काढता येणार आहेत. गेल्यावर्षी या योजनेत 71 लाख 41 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून 49 लाख 45 हजार हेक्टरवरील पिकांचा विमा उतरवला होता. मात्र, हा विमा नेमका कसा काढला जातो, याचविषयी आपण जाणून घेऊयात.
advertisement
हा विमा नेमका कसा काढला जातो, याचविषयी माहिती जाणून घेण्यासाठी लोकल18 च्या टीमने राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांच्याशी संवाद साधला.
लोकल18 शी बोलताना ते म्हणाले की, मागील वर्षी पासून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवत असून यंदाच्या रब्बी हंगामातही ती सुरू आहे. 2022-23 मध्ये 7.45 लाख अर्जदारांनी सहभाग हा घेतला होता. तेव्हा 5 लाख हेक्टर क्षेत्र होत ते यंदा 49 लाख म्हणजे जवळपास 10 पटीने वाढले आहे. परतीचा पाऊस पडला असून पाण्याची देखील चांगली उपलब्धता आहे. तर रब्बी हंगामातील क्षेत्र हे 54 लाख इतके आहे.
advertisement
यंदाच्या वर्षी हे 60 लाख हेक्टरच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. यात शेतकरी हिश्श्याची विमा हप्ता रक्कम राज्य सरकार भरणार आहे. यात कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होता येईल, असे ते म्हणाले.
advertisement
रब्बी हंगामात ज्वारी, गहू, हरभरा आणि कांदा प्रमुख पीक असून उन्हाळी भात आणि भुईमूग यामध्ये ते सहभाग घेऊ शकतात. सहभाग घेण्यासाठी केंद्र सरकारचे पोर्टल www.pmfby.gov.in वर जाऊन ते स्वतः देखील आपला अर्ज करू शकतात, असे त्यांनी यावेळी सांगितले.
सोलापूरमधील गहू, हरभरा, ज्वारी पिकासाठी सहभाग घेण्याची तारीख 15 डिसेंबर 2024 तर उन्हाळी भुईमूग आणि भात यासाठी शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या या पिकाचा विमा उतरून जास्तीत जास्त सहभाग हा घ्यावा, असे आवाहनही राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी केले.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 30, 2024 2:59 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रब्बीतही मिळणार 1 रुपयात पीक विमा, शेवटची तारीख अन् प्रोसेस काय?

