TRENDING:

kanya rashi bhavishya 2025: फक्त बोलण्यावर संयम ठेवा, येणाऱ्या वर्षात नशीब पालटणार, कन्या राशीसाठी ज्योतिषांचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

kanya rashi bhavishya 2025 : आपल्या वर्तमानासोबतच भविष्याची ही चिंता प्रत्येकाला सतावत असते. प्रत्येक जण आपल्या भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलंय याचा विचार करत असतो. लवकरच नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे. हे वर्ष कन्या राशीच्या लोकांसाठी कसं असेल? हे जाणून घेऊ.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

कोल्हापूर : आपल्या वर्तमानासोबतच भविष्याची ही चिंता प्रत्येकाला सतावत असते. प्रत्येक जण आपल्या भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलंय याचा विचार करत असतो. या साठीच लोकल 18 विशेष 12 राशींसाठी येणार नववर्ष कसं असेल ही मालिका घेऊन आलंय. ह्या मालिकेत आपण कन्या राशी बद्दल जाणून घेणार आहोत. राशीचक्रातील ही सहावी रास आहे. या संदर्भात ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

advertisement

काय आहेत कन्या राशीची स्वभाव वैशिष्ट्ये?

राशीचक्रातील ही सहावी राशी असून जन्मकुंडलीमध्ये ही सहा या अंकाने दर्शवली जाते. ही राशी आकाशामध्ये आपणास एका बारा वर्षाच्या कन्येच्या स्वरूपात असलेली दिसून येते. जी कन्या एका नावेमध्ये बसलेली आहे आणि तिच्या एका हातात धान्याचे कणीस आणि एका हातामध्ये अग्नी आहे असे तिचे स्वरूप आहे. ज्या नावेत बसलेली आहे त्या नावेला वल्ली नाहीयेत याचा अर्थ हे नाव वारा जसाच्या दिशेने प्रवास करीत आहे. त्यामुळे तिला कोणतीही दिशा मिळत नाहीये, याचा अर्थ असा घेता येतो की या राशीच्या व्यक्ती आपले कोणतेही एक मत ठामपणे करत नाहीत. ते इतरांच्या मतावरती अवलंबून असतात,. ज्याप्रमाणे लोकांचा प्रवाह असेल त्या पद्धतीने त्या दिशेला ही लोक आपले मत बनवून जातात. या राशीचा स्वामीग्रह बुध हा असून ही राशी द्विस्वभावी आणि पृथ्वी तत्वाची राशी आहे.

advertisement

बुध हा वाणीचा वक्तृत्वाचा कारक असल्यामुळे या राशीचे लोक उत्तम वक्ते असतात. आपल्या बोलण्याने समोरच्या व्यक्तीवरती ते चांगली छाप पाडू शकतात. ही जी स्वभाव राशी असल्याने यांच्यामध्ये धरसोडपणाचा गुण असल्याचे आपणास दिसून येते. कोणतीही गोष्ट हाती घेतलेली चटकन पूर्ण यांच्याकडून होत नाही त्या गोष्टींमध्ये धडसोडपणा राहतो. कोणताही निर्णय पटकन घेता येत नाही त्यामुळे आयुष्यातील बऱ्याच चांगल्या संधी गमावतात. ही राशी थोडी भीती राशी म्हणून ओळखली जाते. कोणत्याही गोष्टी स्वतःहून पुढाकार घेत नाही तसेच कोणतीही जबाबदारी स्वतःच्या अंगावर घेताना फार विचार करतात, असं ज्योतिषी सांगतात.

advertisement

Vrishabha rashi bhavishya 2025: फक्त या चुका करू नका, यंदाचं वर्ष तुमचंच! वृषभ राशीसाठी ज्योतिषांचा महत्त्वाचा सल्ला

ही पृथ्वी तत्वाची राशी असल्याकारणाने सृजनात्मक राशी म्हणून ओळखली जाते. कोणत्याही नवीन गोष्टीची सृजन करणे यांना आवडते. त्यामुळे या व्यक्ती कल्पनाशील आणि नवनिर्मिती करण्यामध्ये तरबेज असतात. कलेच्या क्षेत्रात देखील या व्यक्ती असलेल्या आपणास दिसून येतात. त्यांच्यात स्वतःमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असते, मात्र दुसऱ्याचा देखील विश्वास डगमगणे यांना चांगले जमते. असे असले तरी ही राशी मेहनती आणि विश्वासनीय म्हणून ओळखली जाते. या व्यक्ती आपल्या जीवनातील समस्यांवर स्वतःच समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात. वायुतत्वाची बौद्धिक राशी असल्याकारणाने यांची शोधक अशी वृत्ती असते. कोणत्याही समस्येच्या मुळाशी जाऊन त्या समस्येचे समाधान शोधण्याचा प्रयत्न करतात.

advertisement

या राशीत नीटनेटकेपणा, व्यवहारीपणा, व्यवहारकुशलता, हिशोबिपणा कोणत्याही गोष्टीमध्ये चौकसपणा आणि संग्रहाची आवड यांना असते. वस्तूंचा तसेच उत्तमोत्तम व्यक्तींचा संग्रह यांच्याकडे असतो. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये यांचा वावर असतो. दुसऱ्यास मार्गदर्शन करण्याची उत्सुकता यांच्यामध्ये अधिक असते. दुसऱ्याचे पोषण करण्याची कळकळ यांना मनापासून असते. हे यांचे स्वभाववैशिष्ट्य आहे असे समजायला हरकत नाही. एखाद्या गोष्टीच्या बाबतीतला निर्णय यांना विचारावा तो अचूकच असतो. इतका यांचा अभ्यास बऱ्याच गोष्टींमध्ये असतो. असे असले तरी स्वतःच्या आयुष्यातील निर्णय घेताना मात्र चार लोकांचा सल्ला घेऊनच निर्णय घेतात. झटपट कोणतेही निर्णय यांना घेता येत नाहीत, एक चाकोरीबद्ध आयुष्य जगण्याकडे या लोकांचा कल असतो, असं ज्योतिषी सांगतात.

येणाऱ्या ग्रहमान बदलामुळे काय होणार?

आगामी वर्षातील जी सुरुवात आहे ती सुरुवात यांच्यासाठी अतिशय चांगली आहे. हे वर्ष यांना लाभकारक आणि आर्थिकदृष्ट्या सुखकारक जाणारे असे राहील. या वर्षातील सुरुवातीचा जो पहिला बदल आहे तो आहे शनिदेवांचा. 29 मार्चला शनिदेव आपल्या कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये प्रवेश करीत आहेत. हा राशी बदल ताम्रपदाने होत असून त्याचे फळ श्रीप्राप्ती अशी आहे. त्यामुळे हा बदल निश्चितच कन्याराशीसाठी शुभकारक असा होणार आहे. हा शनी बदल आपल्या आयुष्यात नवनवीन संधी उपलब्ध करून देईल. आपल्या व्यवसाय आणि नोकरीमध्ये वृद्धी होईल. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. भागीदारीतील व्यवसायात मात्र काही अंशी वाद निर्माण करणार आहे. आपल्या वैयक्तिक जीवनात जवळच्या नातेवाईकांची लुडबुड देखील वाढू शकते, त्यामुळे आपण आपल्या बोलण्यावरती थोडासा संयम बाळगावा. आगामी वर्षात आपल्यावरील कामाचा ताण हा वाढलेला असेल.

शनि देवानंतर जो ग्रह बदल होणार आहे तो आहे गुरुचा. गुरु 14 मे रोजी वृषभ राशीतून मिथुन राशीमध्ये प्रवेश करीत आहे आणि तो कन्या राशीला दहावा येत आहे. 14 मे पर्यंत नवा असणारा गुरु हा आपल्या राशीसाठी अतिशय शुभकारक आणि लाभदायक असा आहे. मात्र दहावा गुरु आपल्यामध्ये थोडेसे चिंतेचे वातावरण तयार करतोय. स्थावर मालमत्ता आणि वाहन यांच्यासाठी आपला खर्च वाढेल, सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये अधिक खर्च करावा लागेल. तसेच घरातील सदस्यांबरोबर आपले मतभेद निर्माण होतील. गुरुची 14 मे नंतरची जरी ही नकारात्मक बाजू असली तरी आपल्या नोकरीत आपणास मानाचे स्थान प्राप्त होईल. खर्चाचे प्रमाण वाढणारे असले तरी आवक देखील तशीच राहील त्यामुळे खर्चाचा फारसा ताण पडणार नाही, असं ज्योतिषी सांगतात.

Leo Horoscope : 2025 वर्ष अचानक खर्च वाढवणारं, आजारपण येऊ शकतं, सिंह राशीच्या व्यक्तींनी जरा संयमानं घ्यावं!

आपण आपल्या जोडीदारासमवेत या काळात सलोख्याचे संबंध ठेवावेत अकारण वादविवाद करू नयेत. या वर्षात मनाला चटका लावणारी एखादी घटना घडण्याची शक्यता आहे. जे लोक विवाहासाठी प्रयत्न करीत आहेत किंवा संतती प्राप्तीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांनी 14 मे पूर्वी प्रयत्न करावेत ते त्यांना लाभदायक ठरतील. 14 मे नंतर मात्र गुरु बदल हा फारसा विवाह आणि संतती या दृष्टीने लाभदायक ठरणार नाही.  विद्यार्थी वर्गाला 14 मे नंतरचा येणारा काळ हा अभ्यासामध्ये ताण वाढवणारा असेल. स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्तीच्या परीक्षा, विविध प्रवेश परीक्षा यामध्ये अभ्यासात हेळसांड करू नये. आपले अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, हे आपले शैक्षणिक नुकसान करू शकेल. त्यामुळे अभ्यासाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे व होणाऱ्या नुकसानीस टाळण्याचा प्रयत्न करावा.

29 मे रोजी राहू आणि केतू यांचा स्थान बदल आणि राशी बदल होत असून, हा बदल आपल्या जीवनात गुप्त शत्रूंचा त्रास वाढवणारा ठरेल. तसेच संक्रमणामुळे होणारे विविध आजार उत्पन्न होतील. हाताखालील लोक फसवणूक करणारे भेटतील. त्यामुळे आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागेल, वर्षाच्या मध्यंतरानंतरचा काळ हा धार्मिक यात्रा घडवून आणणारा, एकांत मिळवून देणारा तसेच बाहेरील बाधा होणारा काळ म्हणून त्रासदायक ठरू शकतो, असं ज्योतिषी सांगतात.

कोणती उपासना कराल?

आगामी येणाऱ्या वर्षात काही काळ आनंदी तर काही काळ दुःखाचा आहे. ग्रहांची अशुभले त्यांची तीव्रता कमी करावीत म्हणून काही उपासना करणे आवश्यक आहे, त्याकरिता नित्यनेमाने आपले कुलधर्म कुलाचार करावेत. आपल्या कुलदेवतेचे स्मरण रोज सकाळी करावे, तसेच दर मंगळवारी गणपतीचे दर्शन घ्यावे आणि रोज सकाळी गणपतीचे कोणतेही स्तोत्र पठण करावे. तसेच विष्णुसहस्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र वाचावे. बुधवारी विष्णूचे दर्शन घ्यावे. मंगळवार, शनिवार मद्यपान आणि मांसाहार टाळावा. तसेच सोबत एखादी हिरव्या रंगाची छटा असलेले कापड बाळगले, तर ते तुम्हाला आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरू शकते, असं देखील ज्योतिषी कदम यांनी सांगितलं.

सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.

मराठी बातम्या/राशीभविष्य/
kanya rashi bhavishya 2025: फक्त बोलण्यावर संयम ठेवा, येणाऱ्या वर्षात नशीब पालटणार, कन्या राशीसाठी ज्योतिषांचा महत्त्वाचा सल्ला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल