Vrishabha rashi bhavishya 2025: फक्त या चुका करू नका, यंदाचं वर्ष तुमचंच! वृषभ राशीसाठी ज्योतिषांचा महत्त्वाचा सल्ला
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Taurus horoscope 2025: लवकरच नवीन वर्ष 2025 सुरू होणार आहे. हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी कसं असेल? हे जाणून घेऊ.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : नवीन वर्ष चालू होण्यासाठी अगदी काहीच दिवस राहिले आहेत. सरत्या वर्षात काही घटनांमधून सावरत आता नवीन वर्षात आता आपल्या नशिबी काय लिहिलंय? याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. यासाठी अनेकजण आपलं राशीभविष्य पाहात असतात. याचसाठी लोकल18 ने विशेष मालिका सुरू केलीये. कोल्हापूर येथील ज्योतिष शास्त्री राहुल कदम यांनी वृषभ राशीच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय, नातेसंबंध, आरोग्य आणि धर्म अशा सर्वच दृष्टिकोनातून नवीन वर्ष कसं असेल? हे जाणून घेऊ.
advertisement
वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव
राशीचक्रातील दुसऱ्या क्रमांकाची रास म्हणजे वृषभ होय. ही रास शुक्र या ग्रहाची असून पृथ्वी तत्वाची व स्थिर स्वभावाची आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आपल्या आयुष्यात होणारे बदल चटकन स्वीकारता येत नाही. आपले आयुष्य एक मार्गी एकसुरी जगण्यामध्ये यांना आनंद मिळतो. शुक्र हा विलासी व रंगेल ग्रह असला, तरी त्याचे हे गुण या राशीमध्ये आपणास फारसे पाहण्यास मिळत नाहीत.
advertisement
वृषभ ही रास आकाशामध्ये आपणास बैलाच्या आकृतीत असलेली दिसून येते. त्यामुळे राशीचक्रात या राशीचे चिन्ह बैल हे दिलेले आहे. बैलाच्या अंगी असणारे बरेचसे गुण ह्या राशीच्या लोकांमध्ये असलेले आपणास दिसून येतात. बैल हा सातत्याने कष्ट करणारा, आपल्या कुटुंबाची काळजी करणारा व दुसऱ्याच्या उदरनिर्वाहाबद्दल विशेष करून चिंतेत असणारा प्राणी म्हणून ओळखला जातो. त्यानुसारच वृषभ राशीचे लोक सुद्धा आपल्या कुटुंबाच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्याकरिता, सातत्याने कष्ट करीत असलेले दिसून येतात.
advertisement
कष्ट करण्यास नेहमी तयार
कष्ट करण्यासाठी वृषभ रास अजिबात मागे पुढे पाहत नाही. जसं बैलाच्या खांद्यावरती जू असतं. तसंच वृषभ राशीच्या लोकांच्या खांद्यावरती देखील कुटुंबाच्या अपेक्षांचे एक जू असलेलं दिसून येतं. कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याकरता कोणतेही कष्ट करायला यांची तयारी असते. ही स्थिर स्वभावाची राशी असल्याने व्यवसाय व नोकरी यामध्ये एका ठिकाणीच रमायला यांना आवडतं. राशीचे पृथ्वी तत्व हे सृजनाचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे नवनिर्मितीकडे यांचा कल असतो. भूमिशी निगडित राहायला यांना आवडते, जेवायला बसताना देखील जमिनीवर बसून किंवा झोपायला देखील जमिनीवरती झोपायला हे लोक प्राधान्य देतात, असं ज्योतिषी सांगतात.
advertisement
वृषभ राशीच्या लोकांना बांधकाम शेतीकाम करायला मनापासून आवडते. कलेची जाण असते, त्यामुळे कलाक्षेत्रात रमतात. शुक्र हा ग्रह या राशीचा स्वामी ग्रह असल्याकारणाने कलेची अभिरुची जन्मजात यांच्यामध्ये असलेली दिसून येते. त्यामुळे संगीत नाट्य कला व साहित्य यांच्या बद्दल यांना जाण असते. निसर्गातील सौंदर्य पाहायला यांना आवडते, अशा या राशीला येणारे आगामी वर्ष कसे जाईल? हे आपण पाहणार आहोत.
advertisement
ग्रहमान बदलाचा काय परिणाम होईल?
सर्वप्रथम वर्षाच्या सुरुवातीला जो मोठा ग्रह बदल होणार आहे. तो शनि महाराजांचा असून दिनांक 29 मार्चला शनिदेव आपल्या कुंभ राशी मधून मीन राशीमध्ये प्रवेश करीत आहेत. मीन ही वृषभेला अकरावी रास येते. म्हणजेच शनीचे वृषभ राशीच्या लाभस्थानातून भ्रमण होणार आहे. शनीची तिसरी दृष्टी व्यक्तिमत्त्वावरती, सातवी दृष्टी संतती स्थानावरती व दहावी दृष्टी ही अष्टम स्थानावरती येते. त्यामुळे ही तिन्ही स्थानात शनीच्या अमलाखाली येतात. लाभातील शनी विविध गोष्टींमधून लाभ देणारा जरी असला, तरी लाभाचे प्रमाण कमी करेल.
advertisement
शनीचा होणारा बदल हा सुवर्णपदाने असून, त्याचे फल चिंता असं दिल आहे. त्यामुळे आर्थिक चिंता सतावत राहतील, शनीची दृष्टी पंचम स्थानावरती पडते. पंचम स्थान संततीच स्थान, प्रणय स्थान व उपासना स्थान आहे. त्यामुळे संतती बद्दलच्या चिंता वाढीस लागतील. आरोग्याचा विचार करता अजूनही दुखणे डोकी वर काढतील. कमरेचे दुखणे किंवा गुडघे दुखणे अशा प्रकारचे आजार म्हणजेच जे दीर्घकाळ टिकून राहतील आणि असे आजार उद्भवतील. त्याची वेळीच काळजी घ्यावी, असं ज्योतिषी सांगतात.
धार्मिक यात्रा घडतील
त्यानंतरचा ग्रह गुरु 14 मे पर्यंत वृषभ राशीत पहिला असून तो रोग्य पदाने आलेला आहे. हे देखील शुभ असणार आहे. म्हणजेच 14 मे पर्यंत गुरुची शुभहला तुम्हाला प्राप्त होणार आहे. या शुभकारांमध्ये आर्थिक संपन्नता विविध गोष्टींमधून होणारे लाभ अंतर्भूत होतात. त्यामुळे आर्थिक चिंता फारशी जाणवणार नाही. आपल्या नोकरी किंवा कार्य स्थानावरची दृष्टी टाकते. त्यामुळे नोकरीत होणारे बदल नोकरीत होणारे लाभ दर्शवत आहे. विविध प्रकारच्या धार्मिक यात्रा तुम्हाला आगामी काळात घडण्याची शक्यता आहे.
व्यवसायात नवीन संधी
व्यवसायात नवीन संधी चालून येतील. त्या नवीन संधीचा योग्य पद्धतीने लाभ उठवला तर फायदा निश्चित स्वरूपात होईल. स्थावर मालमत्तेबाबत मात्र थोडीशी काळजी घेण्याची गरज आहे. स्थावर गोष्टींमध्ये फारशी गुंतवणूक करूनही ती गुंतवणूक आपल्या अंगलट येऊ शकते. त्यामुळे गुंतवणूक करत असताना काळजी घ्यावी. गुरुग्रह नंतर 29 मे ला राहू-केतूचे गोचरणी भ्रमण होत असून राहू कुंभ राशी तर केतू सिंह राशीत प्रवेश करतोय. कुंभ हे राहूची मित्र राशी, तर केतूची शत्रू राशी आहे. त्यामुळे व्यवसायातला होणारा फायदा हा दीर्घकाळ टिकणारा नसेल. कौटुंबिक स्वास्थ हरवण्याची शक्यता आहे. कुटुंबांमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद-विववाद होऊ शकतात.
नव्या वर्षात काही काळ आपला नैराश्यात जाईल. त्यावेळी दत्त महाराजांची उपासना व गणपतीची उपासना आपल्या चांगल्या पद्धतीने फलदायी ठरेल. आपल्या वैवाहिक जीवनाचा जर विचार केला तर वैवाहिक जीवन चांगले सुखकारक राहील. ज्या लोकांना संतती बद्दल नियोजन करायचे आहे त्यांनी 14 मे पूर्वी संतती बद्दल नियोजन करावे. 14 महिन्यानंतर गुरुचे म्हणावे तसे आशीर्वाद आपल्या पाठीशी राहणार नाहीत, असंही ज्योतिषी सांगतात.
कोणती उपासना कराल?
शनीच्या कृपादृष्टीसाठी आपण नियमितपणे मारुतीचे दर्शन घ्यावे, मंगळवार, शनिवार, मांसाहार व मद्यपान करणे टाळावे. अन्नदान करा. अन्नदान करत असताना आपलं नाव कुठेही येणार नाही याची काळजी घ्या. तसेच कुलदेवीची उपासना करणे लाभदायी ठरेल. आपली जी कुलदेवी असेल त्या कुलदेवीचे नित्य स्मरण करा. तिचे कुलाचार व कुलधर्म नित्यनेमाने करीत राहा. आपल्या वाचनामध्ये दररोज देवीचे एखादी स्तोत्र श्री सूक्त असेल किंवा देवीचे कोणतेही स्तोत्र सप्तशतीसारखी स्तोत्र असेल तर ते वाचनात ठेवावे. आगामी काळ आपल्यासाठी त्रासदायक न जाता लाभदायक जाईल यात शंका नाही.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 24, 2024 12:37 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Vrishabha rashi bhavishya 2025: फक्त या चुका करू नका, यंदाचं वर्ष तुमचंच! वृषभ राशीसाठी ज्योतिषांचा महत्त्वाचा सल्ला