नवरा गेला, पदरात 3 वर्षांचा मुलगा, 16 वर्षांपूर्वी दादांच्या सहीने बदललं आयुष्य, बारामतीची माऊली ढसाढसा रडली
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोशल मीडियावर एका विधवा महिलेचा देखील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती महिला अजित पवारांनी केलेल्या मदतीची आठवण सांगत आहे.
Ajit Pawar Plane Crash: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला आज सात दिवस पूर्ण झाले आहेत. मात्र, सात दिवस उलटूनही अजितदादा आता आपल्यात नाहीत, या सत्यावर अद्याप कोणाचाही विश्वास बसत नाहीये. अजित पवारांच्या अचानक जाण्याने केवळ पवार कुटुंबच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आता अजित पवारांच्या आठवणी सांगणारे अनेक व्हिडीओज, फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अजित पवारांनी आपल्या हयातीत ज्यांना ज्यांना मदत केली होती, अशी अनेक लोक समोर येऊन प्रतिक्रिया देत आहेत.
अशात सोशल मीडियावर एका विधवा महिलेचा देखील व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात ती महिला अजित पवारांनी केलेल्या मदतीची आठवण सांगत आहे. कठीण काळात अजित पवारांनी केलेल्या एका सहीमुळे आपलं आयुष्य कसं बदललं, याची माहिती ही महिला देत आहे. अजित पवारांच्या एका सहीवर आपण मागील १६ वर्षांपासून काम करत आहे. यामुळे माझ्या मुलाचं शिक्षण पूर्ण झालं. मुलगा आयटी इंजिनिअर झाला, अशी माहितीही ही महिला देताना दिसत आहे.
advertisement
व्हायरल व्हिडीओत महिला काय म्हणाली?
व्हायरल व्हिडीओत महिलेनं १६ वर्षांपूर्वी घडलेला प्रसंग सांगितला आहे. त्या म्हणाल्या की, "तेव्हा माझा मुलगा छोटा होता. मी सहयोग सोसायटीत अजितदादांना भेटायला गेली होती. मी त्यांना म्हटलं माझे मिस्टर वारले आहेत. दादा मला काम द्या. तेव्हा दादा म्हणाले, मी तुला आता व्हीपी कॉलेजवर काम देऊ शकत नाही. पण आपली टेक्स्टाईल पार्क उघडली आहे. तू तिथे जा. तेव्हा दादांनी मला एक सही करून कागद दिला. या सहीवर तू कुठेपण कामाला जा, असं त्यांनी सांगितलं."
advertisement
"आज १५-१६ वर्षे झाली, मी दादांच्या त्या एका सहीवर काम करत आहे. दादांच्या याच व्हिपी कॉलेजमध्ये शिकून माझा मुलगा मोठा झाला. आज तो मुंबईतील कंपनीत आयटी इंजिनिअर आहे. त्याला आज पहिलंच सहा लाखाचं पॅकेज मिळालं आहे. ज्यावेळी दादांनी मला कामाला लावलं तेव्हा माझा मुलगा केवळ तीन वर्षांचा होता. आज तो आयटी इंजिनिअर आहे. हे सगळं केवळ दादांमुळे झालं. मला ना घरचा... ना माहेरचा... कसलाच आधार नव्हता. सगळा आधार हा दादांचा आधार आहे. आमच्या जीवात जीव असेपर्यंत आम्ही दादाला विसरू शकत नाही" असंही या व्हिडीओत म्हणत आहेत.
advertisement
advertisement
दुसरीकडे, बारामतीच्या एका सुनेनं दादांचा जिथे अपघात झाला होता. तिथला एक व्हिडीओ शूट केला आहे. ज्यात तिच्या पायाजवळ दादांची एक आठवण अर्थात जळालेला कागद उडत उडत आला आहे. याचा व्हिडीओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा...
Location :
Baramati,Pune,Maharashtra
First Published :
Feb 03, 2026 3:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
नवरा गेला, पदरात 3 वर्षांचा मुलगा, 16 वर्षांपूर्वी दादांच्या सहीने बदललं आयुष्य, बारामतीची माऊली ढसाढसा रडली








