advertisement

'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ आली', बारामतीच्या सुनेनं शूट केला VIDEO, 70 लाख लोकांनी पाहिला

Last Updated:

Ajit Pawar Plane Crash News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. आता अपघात स्थळावरचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

News18
News18
Ajit Pawar Plane Crash News: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. बुधवार २८ जानेवारीचा दिवस संपूर्ण राज्यासाठी काळा दिवस ठरला आहे. याच दिवशी अजित पवार मुंबईहून विमानाने बारामतीला येत होते. मात्र विमानजवळ त्यांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवारांच्या मृत्यूची बातमी वाऱ्याच्या वेगाने संपूर्ण देशात पसरली.
अजित पवार यांच्या विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात हा अपघात किती भीषण होता, याची प्रचिती येत आहे. बारामती विमानतळाच्या बाजुला जळत पडलेला विमानाचा सांगाडा, जळून खाक झालेले मृतदेह हे दृश्य पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले. आता सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यात अजित पवारांची शेवटची आठवण म्हणून एक जळलेला कागद उडत आल्याचं दिसत आहे.
advertisement
हा व्हिडीओ कल्याणी पारखे नरुटे नावाच्या एका तरुणीने शूट केला आहे. इन्स्टाग्रामवरील बायोनुसार, कल्याणी ही मुळची नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. पण तिचं सासर बारामती आहे. बारामतीच्या या सुनेनं अपघात स्थळावर जाऊन हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओत अपघातातला एक जळलेला कागद उडत उडत धावपट्टीपर्यंत आल्याचं दिसत आहे. संबंधित कागदावर विमानाच्या चेकींगबद्दल माहिती लिहिली आहे. तसेच त्यावर या विमानाच्या को-पायलट शांभवी पाठक यांची सही देखील दिसत आहे.
advertisement
advertisement
अजूनही विश्वास बसत नाही, असं कॅप्शन लिहून कल्याणीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ६६ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तिने व्हिडीओत लिहिलं की, "हीच ती जागा जिथे दादा सोडून गेले... दादांची आठवण उडत उडत पायाजवळ आली आणि मन एकदम गहिवरून आलं. एवढं सर्व दिसतंय, तरी विश्वास बसत नाहीये, की दादा आता आपल्यात नाही राहिले..." कल्याणीने शेअर केलेला हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'दादांची आठवण उडत उडत पायाजवळ आली', बारामतीच्या सुनेनं शूट केला VIDEO, 70 लाख लोकांनी पाहिला
Next Article
advertisement
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; सातवीतल्या मुलाची चटक महागात पडली, कपाट उघडताच पायाखालची जमीन सरकली
मोमो स्टॉलवर झाला सौदा, एका चुकीने कुटुंब रस्त्यावर; मुलाची चटक महागात पडली
  • पालकांनो सावधान!

  • तुमच्या मुलाच्या 'खाण्याच्या सवयी' तर घराला कंगाल करत नाहीत ना?

  • 'फ्री मोमोज' आणि 85 लाखांचे दागिने

View All
advertisement