Tabu: वडिलांसोबत आयुष्यभराचं वैर, बापाचं नावही लावत नाही अन्...; तब्बूने सांगितलं हैराण करणारं कारण
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल महत्त्वाचं भाष्य केलं आहे. तिच्या नावामध्ये वडीलांच्या नावाचा आणि त्यांच्या आडनावाचा का वापर करत नाही? याबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री तब्बू हिने अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तब्बूने आपल्या सौंदर्याच्या आणि दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. तब्बू त्याकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायची आणि आता देखील चाहत्यांच्या मनावर राज्य करतेय. तब्बू आज वयाच्या 54 व्या वर्षी देखील एकटीच आयुष्य जगत आहे. तब्बू हिच्या आयुष्यात प्रेमाची एन्ट्री तर झाली, पण कोणासोबतच अभिनेत्रीचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. इतकंच नाही तर, तब्बूला केव्हा वडिलांची सुद्धा साथ मिळाली नाही. तब्बू हिने केव्हाच तिच्या वडिलांचं नाव सुद्धा लावलं नाही. इतकंच नाही, तिने केव्हा वडिलांना भेटण्याची इच्छाही व्यक्त केली नाही.
तिने एका कार्यक्रमात तिच्या आडनावाबद्दल आणि वडिलांविषयी भाष्य केलं आहे. कार्यक्रमामध्ये तब्बू म्हणाली की, "माझं बालपण अगदी व्यवस्थित गेलं, मी हैद्राबादमध्ये राहिलेय. लहान असतानाच माझ्या आई- वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे मी माझ्या बालपणी आईच्या आई- वडिलांकडेच राहिले. त्यामुळे आजी- आजोबांकडे खूप व्यवस्थित बालपण गेलं आणि माझी आई शिक्षिका होती. त्यामुळे सर्वात जास्त मी माझा वेळ त्यांच्यासोबतच घालवला. माझी आजी प्रार्थना करायची, पुस्तकं वाचायची, हे सर्व सततत कानावर पडूनच लहानाची मोठी झालीये. त्यांचा सहवास माझ्यासाठी फार महत्त्वाचा ठरला."
advertisement
मुलाखतीमध्ये पुढे तब्बू म्हणालीये की, " मी खूप लाजाळू होते. अभिनेत्री झाल्यानंतरही मी तशीच होते. या मुलाखतीमध्ये तबूने वडीलांबद्दलही भाष्य केलं आहे. तिच्या वडीलांचं आडनाव 'हाश्मी' होतं. त्यांचं आडनाव सुद्धा का नाही वापरलं, याबद्दलही तिने भाष्य केलंय. "मी केव्हाच माझ्या वडिलांच्या आडनावाचा वापर केला नाही. कारण, मला ते केव्हाच वापरणं महत्त्वाचं वाटलं नाही. माझं पूर्ण नाव तबस्सुम फातिमा असं होतं. शाळेत ‘फातिमा’ हेच माझं आडनाव म्हणून वापरत होते.", असं तबू मुलाखती दरम्यान म्हणालीये.
advertisement
वडिलांपासून असलेल्या भावनिक अंतराबद्दल तबू म्हणाली की, "माझ्याकडे वडिलांच्या कोणत्याही आठवणी नाहीत. माझी बहीण त्यांना केव्हातरी भेटली आहे, पण मला केव्हाच त्यांना भेटावंसं वाटलं नाही. मला त्यांच्याबद्दल कोणत्या गोष्टी जाणून घेण्याचीही इच्छा नाही. मी जशी मोठी झाले, ज्या ज्या गोष्टी मला आयुष्यात मिळाल्या आहेत. त्यात मी समाधानी आहे." तबू तीन वर्षांची असताना तिच्या आई- वडिलांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तबू आणि तिची आई आजी- आजोबांकडे शिफ्ट झाले आणि तिच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं.
advertisement
दरम्यान, तब्बूचं खरं नाव तबस्सुम फातिमा आहे. देव आनंद यांनी तिला तब्बू हे नाव दिले. देव आनंद एका वाढदिवसाच्या पार्टीत तब्बूला भेटले होते, तेव्हा तिला त्याच्या 'हम नौजवान' चित्रपटात कास्ट केले होते. या चित्रपटात तब्बूने देव आनंदच्या मुलीची भूमिका साकारली होती. चित्रपटात तिला तब्बू म्हणून श्रेय देण्यात आले. खरंतर, तब्बूने 11 व्या वर्षीच 'बाजार' चित्रपटातून छोटीशी भूमिका साकारत अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले. त्यानंतर तिने 'काला पानी', 'इरुवर', 'द नेमसेक', 'हैदर', 'मकबूल', 'जीत' यांसारख्या चित्रपटातील तिच्या धाडसी भूमिकांमुळे प्रसिद्ध झाली. तिला 'माचिस' आणि 'चांदनी बार' या चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 6:11 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Tabu: वडिलांसोबत आयुष्यभराचं वैर, बापाचं नावही लावत नाही अन्...; तब्बूने सांगितलं हैराण करणारं कारण










