advertisement

Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पत्रा कापून रिक्षातून बाहेर काढले 2 मृतदेह

Last Updated:

छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर रस्त्यावर रिक्षा अपघातात रईस हासिम शेख व रुक्मिणी येणगे यांचा मृत्यू, शितल मोरे व पायल वरदे गंभीर जखमी, शिवनेरी कॉलनीत शोक.

News18
News18
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर: सोमवारी मध्यरात्रीच वेळ अन् रस्ते सामसूम असताना छत्रपती संभाजनगर-अहिल्यानगरच्या दिशेनं जाणाऱ्या रस्त्यावर एका रिक्षानं अचानक ताबा सोडला आणि होत्याचं नव्हतं झालं. रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला असून, दोन तरुणी मृत्यूशी झुंज देत आहेत.
पत्रा कापून चालकाला काढले बाहेर
अपघाताची भीषणता इतकी भयानक होती की, रिक्षा उलटल्यानंतर चालक आतमध्येच अडकून पडला होता. घटनेची माहिती मिळताच पदमपुरा अग्निशमन केंद्राचे जवान देवदूतासारखे धावून आले. रिक्षामध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी जवानांना रेस्क्यू टूल्सच्या सहाय्याने रिक्षाचा पत्रा कापावा लागला. अत्यंत शर्थीच्या प्रयत्नांनंतर जखमींना बाहेर काढून तात्काळ घाटी रुग्णालयात हलवण्यात आले.
advertisement
दोघांचा जागीच मृत्यू, दोन तरुणी जखमी
घाटी रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासणी अंती दोघांना मृत घोषित केले. या भीषण अपघातात रईस हासिम शेख आणि रुक्मिणी येणगे या दोघांचा करुण अंत झाला. तर शितल मोरे आणि पायल वरदे या दोन तरुणी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
advertisement
हे सर्वजण रांजणगाव येथील शिवनेरी कॉलनीतील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. एकाच परिसरातील दोघांचा मृत्यू झाल्याने शिवनेरी कॉलनी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मध्यरात्रीच्या शांततेत झालेला हा थरार आणि त्यानंतर बसलेला हा धक्का मृतांच्या कुटुंबियांसाठी सुन्न करणारा आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Accident: छत्रपती संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, पत्रा कापून रिक्षातून बाहेर काढले 2 मृतदेह
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement