Numerology 2025: तुमची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 आहे? नव्या वर्षात हवे ते मिळणार, पण...

Last Updated:

Numerology 2025: लवकरच नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. हे वर्ष 9, 18 आणि 27 जन्मतारीख असणाऱ्यांना कसं असेल? जाणून घेऊ.

+
Numerology

Numerology 2025: तुमची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 आहे? नव्या वर्षात हवे ते मिळणार, पण...

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : अंकशास्त्र ही ज्योतिषशास्त्राची एक दुसरी बाजू मानली जाते. ज्याप्रमाणे ज्योतिषी तुमच्या कुंडलीतील ग्रह आणि नक्षत्रांची स्थिती पाहून येणार्‍या काळाबद्दल कथन करतात, अगदी तसच अंकशास्त्रामध्ये भविष्य आणि व्यक्तीच्या स्वभावाचे वर्णन केले जाते. लवकरच नव्या वर्षाला सुरुवात होत आहे. हे नव वर्ष 9, 18 किंवा 27 तारखेला जन्मलेल्यांना कसं असणार? हे कोल्हापुरातील अंक ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
9 मूलांक कोणाचा?
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 या तारखेला झालेला असतो, अशा सर्व व्यक्तींचा मूलांक किंवा जन्मांक हा 9 येतो. आगामी वर्ष हे देखील 9 या अंकाचा प्रभाव असणारे असून हा अंक ज्योतिष शास्त्र किंवा अंकशास्त्र यानुसार मंगळ या ग्रहाच्या अधिपत्याखाली असल्याचे मानले गेलेले आहे.
advertisement
काय आहेत स्वभाव वैशिष्ट्ये?
मंगळ हा ग्रह धाडस व आत्मविश्वास यांचा कारक मानलेला आहे. मंगळ हा नवग्रहांमध्ये सेनापती ग्रह आहे. सेनापती म्हणजेच सर्व ठिकाणी पुढे असलेला, कोणतीही गोष्ट स्वतःवरती घेणारा, जबाबदार व्यक्तिमत्व असलेला असा मानला जातो. धाडसाने कोणत्याही गोष्टीत पुढाकार घेऊन ती गोष्ट कशी पूर्णत्वाला जाईल, याचा विचार हा अंक करतो. आक्रमकता प्रतिकार व धाडस या सर्व गोष्टी या अंकांमध्ये असल्याच्या आपणास दिसून येतात.
advertisement
प्रतिकूल परिस्थितीत देखील ती परिस्थिती अनुकूल कशी करता येईल याकडे यांचा कल असतो. पराभव चटकन पचवू शकत नाहीत, गोष्टी मिळवण्याच्या ध्येयाने कार्य करीत असतात. कुणाच्याही अंमलाखाली राहणे शक्यतो यांना जमत नाही. विरुद्ध लिंगी व्यक्तींकडे चटकन आकर्षित होतात. मित्रांबद्दल संवेदनशील असून मित्रांसाठी भांडणे करण्यात मागेपुढे पाहत नाहीत. इच्छाशक्ती जबरदस्त असते, आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावरती बऱ्याच अशक्य गोष्टी पूर्ण करण्याची ताकद हा अंक राखतो. गोरगरीब व दुबळ्या लोकांवरती दया करायला यांना आवडते. त्यातून त्यांना एक सुप्त प्रकारचा आनंद प्राप्त होतो, असे ज्योतिषी सांगतात.
advertisement
9 मूलांक असणाऱ्यांना नवीन वर्ष कसं?
9 मूलांक असणाऱ्या व्यक्तींसाठी आर्थिक व्यवहार करताना मात्र फार जपून आर्थिक व्यवहार करणे गरजेचे आहे. नात्यांमध्ये आर्थिक व्यवहारांमुळे दुरावा निर्माण होत राहतो. आगामी वर्ष आपलेच वर्ष असल्याने हे वर्ष आपल्याला पूर्णपणे लाभदायी ठरेल. आर्थिक बाबतीत आपण यावर्षी नशीबवान ठराल, तसेच गरजेपेक्षा अधिक पैसा तुम्हाला या काळात मिळू शकतो. पैशामुळे जी सुखं उपभोगता येतात ती सर्व सुखं उपभोगायला तुम्हाला यावर्षी निश्चितपणे मिळतील.
advertisement
आरोग्याची काळजी घ्यावी लागेल
यंदा थोडीशी आरोग्याच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे. उष्णतेशी संबंधित विकार आपणास या वर्षी त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे जागरण व बाहेरील खाण्यापिण्यावरती नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आगामी वर्षात आपला आत्मविश्वास हा प्रखर असला तरी आपण अति आत्मविश्वासाने कामे करणे टाळावे. वाहनांच्या गती वरती नियंत्रण ठेवावे, विद्युत उपकरणांशी संबंधित गोष्टींपासून सावध राहावे. आगामी वर्ष आपली स्वप्नपूर्ती करणारे वर्ष असून, आपण ज्या काही योजना योजल्या असतील त्या पूर्णत्वाला जातील. मात्र त्याकरिता आपण थोडे संयमाने व सहनशीलतेने काम करणे आवश्यक आहे. कोणत्याही कार्यात घाई गडबड तुम्हाला नुकसान करेल, असे ज्योतिषी कदम सांगतात.
advertisement
कोणती उपासना ठरेल फलदायी?
उपासनेचा जर विचार केला तर आपण रोज हनुमान चालीसा वाचावी. जर मंगळवारी गणपती व मारुती यांचे दर्शन न चुकता घ्यावे. शक्यतो मंगळवार व शनिवार मांसाहार करणे टाळावे. मांसाहार सोबतच मद्यपान देखील टाळणे आवश्यक आहे. आपल्या महत्त्वाकांक्षा व आत्मविश्वास आपण जर नियंत्रणात ठेवला तर आगामी वर्ष आपणास भरपूर फायदेशीर ठरेल यात शंकाच नाही, असेही ज्योतिषी सांगतात.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology 2025: तुमची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 आहे? नव्या वर्षात हवे ते मिळणार, पण...
Next Article
advertisement
OTT Trending: ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन, 2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने, ओटीटीवर वर 4 कपलची कहाणी हिट
ना अ‍ॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
    View All
    advertisement