Numerology: कोणालाही सल्ला देताना जरा जपून! 5,14 आणि 23 तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींसाठी कसं असेल नवं वर्ष

Last Updated:

आपल्या आयुष्यात अंकांना फार मोठे महत्त्व दिले गेले आहे. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं.

+
पाच

पाच मूलांक असणाऱ्या व्यक्तींना कसं जाणार नववर्ष 

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : आपल्या आयुष्यात अंकांना फार मोठे महत्त्व दिले गेले आहे. अंकशास्त्रात तुमच्या जन्मतारखेवरून तुमचं भविष्य वर्तवलं जातं. आता अनेकांना येणारं नवीन वर्ष 2025 हे आपल्या मूलांकासाठी कसं असणार हे जाणून घ्यायचं असतं. ज्या व्यक्तींची जन्मतारीख 5, 14 आणि 23 असते त्या व्यक्तींचा मुलांक हा 5 असतो. बुधाचा विशेष प्रभाव असणाऱ्या अंकासाठी येणार नव वर्ष कसं जाणार? याविषयीच कोल्हापूर येथील ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
5 मुलांक कोणाचा?
ज्या व्यक्तींची जन्मतारीख 5, 14 आणि 23 ही असते अशा सर्व व्यक्तींचा मुलांक किंवा जन्मांक 5 हा असतो. 5 अंकावरती बुध या ग्रहाचा अंमल असून, ज्योतिष शास्त्रात बुध या ग्रहाला वाणीचा कारक ग्रह मानलेले आहे.
काय आहेत स्वभाव वैशिष्ट्ये?
5 या अंकाचा अंमल असणारे व्यक्ती बोलक्या स्वभावाच्या मिळून मिसळून राहणाऱ्या असतात. मोठा मित्र परिवार असणाऱ्या, वाणी वरती प्रभुत्व असणाऱ्या, हसतमुख आणि कोणतीही समस्या हे बोलून सोडवणाऱ्या असतात. या व्यक्ती अडचणीत असणाऱ्या व्यक्तींना उत्तम मार्गदर्शन करू शकतात. तसेच गुढ विद्येचे देखील यांना आवड असते. वाणी चांगली असल्याने आपल्या मित्र परिवारात तसेच समाजात बऱ्यापैकी लोकप्रिय असतात. यांचे शब्द भांडार चांगले असते, असे असले तरी यांची नकारात्मक बाजू जर पाहिली तर यांच्याकडे चिकाटीचा अभाव असतो. कोणत्याही गोष्टीवरती शंका घेत असतात. तसेच प्रवृत्ती असल्यामुळे दिलेली वेळ पाळता येत नाही. त्यामुळे बे भरवशी व्यक्ती म्हणून देखील यांची ओळख निर्माण होते, असं ज्योतिषशास्त्री राहुल कदम सांगतात.
advertisement
नव वर्षात काळजी कशी घ्याल? 
आगामी वर्ष हे मंगळाचे वर्ष म्हणून ओळखले गेलेल आहे. कारण या वर्षाचा अंक 9 आहे आणि 9 या अंकावर मंगळाचे प्रभुत्व आहे. मंगळाचे आणि बुधाचे जर संबंध पाहायला गेले तर ते तटस्थ प्रवृत्तीचे असलेली दिसून येतात. त्यामुळे यावर्षी 5 या मुलांक व्यक्तीच्या लोकांनी कोणालाही सल्ला देताना जरा जपून सल्ला द्यावा, कारण आपण दिलेल्या सल्ल्याचा समोरचा व्यक्ती कसा अर्थ काढेल हे सांगता येणार नाही. समोरच्या व्यक्तीने चुकीचा अर्थ काढला तर आपल्याबद्दल गैरसमज पसरायला वेळ लागणार नाही.
advertisement
एखाद्या व्यक्तिमत्वाकडे ज्यावेळी आपण आकर्षित व्हाल, त्यावेळी त्याच्या बुद्धी चातुर्यावरती आपण आकर्षित व्हाल. मात्र यावर्षी नवीन व्यक्तींबरोबर संबंध जुळवत असताना आपण काळजी घेणे फार आवश्यक आहे. कारण आपण केलेली निवड चुकण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे आपणास मानसिक त्रास होऊ शकतो. मानसिकदृष्ट्या संवेदनशील असल्याकारणाने मानसिक त्रास कसा कमी होईल ? याकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे. आपणास निद्रानाश किंवा चक्कर येणे, अशा गोष्टींचा त्रास ह्या वर्षी अधिक प्रमाणात जाणवू शकतो. तसेच पित्ताशी संबंधित आजार देखील यावर्षी वाढू शकतात. त्या कारणाने अति विचार करणे आणि अति जागरण करणे टाळावे. यासोबतच चटपटीत पदार्थ तेलकट आणि मसालेदार पदार्थ खाण्यावर देखील नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त ज्या व्यक्ती वारंवार सह्या करतात किंवा ज्या व्यक्तींकडे सह्या करण्याचा अधिकार आहे अशा व्यक्तींनी यावर्षी फार जपून राहिले पाहिजे कारण आपल्या सहीचा दुरुपयोग होऊन आपल्यासाठी ते त्रासदाय होऊ शकते. त्यामुळे सही करीत असताना कोणते कागदपत्र व्यवस्थित पाहिल्याशिवाय त्या कागदपत्रांवरती सही करू नये, असं ज्योतिषशास्त्री राहुल कदम सांगतात.
advertisement
कोणती उपासना करावी?
येणाऱ्या आगामी वर्षातील अडचणींपासून दूर राहण्यासाठी तसेच त्या अडचणीत त्रास होणे याकरिता 5 या अंकाच्या व्यक्तींनी विष्णूची उपासना करणे त्यांना लाभदायी ठरेल. याकरिता वेंकटेश स्तोत्र किंवा विष्णू सहस्त्रनाम अशी स्तोत्रे वाचायला हरकत नाही तसेच 9 हा अंक मारुती आणि गणपती यांचा असल्याकारणाने व्यंकटेश स्तोत्र किंवा विष्णू उपासने सोबतच तुम्हाला मारुती किंवा गणपतीची उपासना देखील लाभदायक ठरेल, असंही ज्योतिषशास्त्री राहुल कदम सांगतात.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Numerology: कोणालाही सल्ला देताना जरा जपून! 5,14 आणि 23 तारखेला जन्माला आलेल्या व्यक्तींसाठी कसं असेल नवं वर्ष
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement