कायदे, नियम तोडू नका, अन्यथा धोका! 8, 17 किंवा 26 जन्मतारीख असणाऱ्यांना कसं असेल नवं वर्ष?

Last Updated:

Numerology 2025: लकवरच नव्या वर्षाला सुरुवात होणार आहे. हे वर्ष 8, 17 किंवा 26 जन्मतारीख असणाऱ्यांना कसे असेल? याबाबत जाणून घेऊ.

+
कायदे,

कायदे, नियम तोडू नका, अन्यथा धोका! 8, 17 आणि 26 जन्मतारीख असणाऱ्यांना कसं असेल नवं वर्ष?

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : नवा दिवस, महिना किंवा वर्ष सुरू होणार असलं की अनेकजण आवर्जून आपलं राशीभविष्य पाहतात. ज्योतिष शास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. लवकरच 2025 हे नवीन वर्ष सुरू होत आहे. हे वर्ष 8, 17, 26 या जन्मतारीख असणाऱ्यांना किंवा 8 मूलांक असणाऱ्यांना कसे जाणार? याबाबत कोल्हापुरातील अंक ज्योतिष शास्त्री राहुल कदम यांनी माहिती दिलीये.
advertisement
8 मूलांक कोणाचा?
ज्या व्यक्तींचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झालेला असतो, अशा सर्व व्यक्तींचा जन्मांक किंवा मूलांक हा 8 येतो. अंकशास्त्रानुसार 8 या अंकावरती शनि या ग्रहाची सत्ता असते. त्यामुळे 8 मूलांक असणाऱ्यांवर शनि ग्रहाचा अंमल असतो.
advertisement
8 मूलांकाची स्वभाव वैशिष्ट्ये
शनी हा ग्रह कायद्याचा, कर्तव्याचा आणि कर्माचा कारक म्हणून मानला गेलेला आहे. 8 मूलांक असणारे लोक निश्चय आणि कर्तव्य तत्पर असल्याचे दिसून येतात. यांना शांतता, एकांत प्रियता आवडते. तसेच गंभीर प्रकारचे संगीत यांना ऐकायला आवडते. निसर्गातील शांत ठिकाणी आपला वेळ घालवणे हे यांचे आवडीचे काम असते. शनि हा ग्रह मंदगतीत असल्याने यांच्या प्रत्येक कार्यात धीमेपणा असल्याचे दिसून येते. काही प्रमाणात यांच्यात निराशावाद दिसतो. ज्यामुळे हे समाजाशी किंवा लोकांशी फार मिळून मिसळून राहत नाहीत, असे ज्योतिषी सांगतात.
advertisement
संशयी प्रवृत्ती
मूलांक 8 असणाऱ्यांच्यात काही गोष्टींबद्दल खिन्नता असल्याचे दिसून येते. शंकेखोर व संशयी प्रवृत्ती असते. त्यामुळे यांच्याबद्दल आजूबाजूच्या लोकांमध्ये गैरसमज पसरतात. कुणावरही चटकन विश्वास ठेवत नाहीत. मात्र एकदा विश्वास ठेवला तर तो परत गमावत नाहीत. समाजातील गरीब लोकांबद्दल यांना आस्था असते. यांना मॅनेजमेंट करणे फार चांगले जमते. काही प्रमाणात यांच्यामध्ये आळशीपणा असल्यामुळे विशेष काही न करता आयुष्य उपभोगण्याकडे कल दिसून येतो, असेही ज्योतिषी सांगतात.
advertisement
मनाने संवेदनशील पण...
गणित, खाणकाम, लोखंड व्यवसाय, कोळसा उद्योग किंवा व्यवस्थापन क्षेत्रामध्ये या व्यक्ती यशस्वी झालेले पााहायला मिळतात. आतिशय संवेदनशील असलेली ही माणसे आपल्या मनातील चाललेला गोंधळ आपल्या चेहऱ्यावरती दिसू देत नाहीत. संसारिक जीवनाबद्दल यांना फारसे आकर्षण नसते. यांचा कल नियमानुसार वागण्याकडे असतो. त्यामुळे जर कोणी वावगे वागले तर त्याचं ऐकून घेत नाहीत. त्याला सुनवायला मागेपुढे पाहत नाहीत.
advertisement
निर्णय घेताना 10 वेळा विचार
मूलांक 8 असमाऱ्यांच्या मनात काय चालले आहे हे समोरच्याला चटकन समजत नाही. आपल्या मनातील गोष्टी बाहेर न सांगण्याच्या वृत्तीमुळे ते मानसिक तणावात कायम राहत असतात. काही प्रमाणात भित्रा स्वभाव असल्यामुळे एखादा निर्णय घेताना 10 वेळा विचार करतात. कौटुंबिक सौख्य बऱ्यापैकी मिळते. चिकाटीने काम करण्याची प्रवृत्ती असल्यामुळे दीर्घ चालणारे कार्य ही अतिशय उत्तम पद्धतीने करू शकतात.
advertisement
नववर्षात काय करावं?
शनीच्या अंमलाखाली हा अंक असल्याने कायद्याने व नियमाने वागणाऱ्या व्यक्तींना त्रास होत नाही. या व्यक्तींनी शक्यतो कोणतेही कायदे नियम मोडू नयेत. शनी हा न्यायप्रिय असल्याने साधा कायदा मोडणंही त्रासदायक ठरू शकतं. नो पार्किंग मध्ये जर गाडी लावत असाल किंवा वनवेतून जात असाल तरी देखील शनि त्या गोष्टीची नोंद ठेवत असतो. त्याचे फळ तुम्हाला कालांतराने मिळून जाते. पण लोकांना समजत नाही की आपण काय नेमके चुकलो व त्याचा त्रास आपल्याला झाला.
ज्या व्यक्तींचा मूलांक 8 आहे त्यांनी शक्यतो कोणताही कायदा किंवा नियम मोडण्याचा प्रयत्न करू नये. शक्यतो जेवढे कायद्याने व नियमाने राहता येईल तेवढा राहण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून शनि महाराजांची कृपा आपल्यावरती सदैव राहील आणि आपणास आयुष्यात जे काही प्राप्त होणार आहे ते कायमस्वरूपी प्राप्त होईल. ते दीर्घकाळ चिरंतन टिकून राहील यात शंका नाही, असेही ज्योतिषी कदम सांगतात.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
मराठी बातम्या/राशीभविष्य/
कायदे, नियम तोडू नका, अन्यथा धोका! 8, 17 किंवा 26 जन्मतारीख असणाऱ्यांना कसं असेल नवं वर्ष?
Next Article
advertisement
OTT Movie: धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने ओटीटीवर उडवलीय खळबळ
धाकटीशी लग्न, मोठीसोबत सुहागरात, 1 तास 19 मिनिटांच्या सिनेमाने OTTवर उडवलीय खळबळ
    View All
    advertisement