advertisement

गावचा सरपंच होण्यासाठी तिसऱ्या अपत्याची अडचण, बापाने पोटच्या मुलीचा केला खून

Last Updated:

मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. मयत मुलगी पांडुरंग कोंडामंगले याची असल्याचे कळले.

बापाने पोटच्या मुलीचा केला खून
बापाने पोटच्या मुलीचा केला खून
मुजीब शेख, प्रतिनिधी, नांदेड : राजकारणाच्या नादात एका बापाने आपल्या पोटच्या मुलीचा बळी घेतला. गावचा सरपंच होण्यासाठी तिसऱ्या अपत्याची अडचण येत असल्याने बापाने आपल्या सहा वर्षीय मुलीची हत्या केली. तेलंगणा पोलिसांच्या तपासात हे प्रकरण उघड झालं.
नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील केरुर येथील 32 वर्षीय पांडुरंग कोंडामंडले हा केस कर्तनालय चालवायचा. मुखेड येथे विराट मेन्स पार्लर नावाने तो दुकान चालवायचा. गेल्या सात वर्षांपासून तो कुटुंबासोबत मुखेड येथे भाड्याच्या घरात राहत होता. दोन जुळ्या मुली आणि एक मुलगा अशी त्याला तीन अपत्य होते. त्याच्या कटिंगच्या दुकानात कधीकधी राजकीय चर्चा रंगायच्या. अश्यात केरुर गावचे सरपंचपद ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित झालं. आणि पांडुरंग कोंडामंगले याला सरपंच व्हायची इच्छा झाली. मात्र त्याला तीन अपत्य असल्यामुळे निवडणुक लढता येणार नाही असा सल्ला कोणीतरी दिला.
advertisement
त्यानंतर त्याने एका मुलीला दत्तक देण्याचे ठरवले. त्यासाठी मुलींच्या जन्म प्रमाणपत्रावर नाव बदलण्याचा प्रयत्नही त्याने केला. पण त्याला तसे करता आले नाही. शेवटी एका अपत्याची हत्या करुन, ते बेपत्ता झाल्याचा बनाव करण्याचे पांडुरंग कोंडामंगले आणि विद्यमान सरपंच गणेश शिंदे यांनी ठरवले. 29 जानेवारी रोजी आपली सहा वर्षीय मुलगी प्राची हिला नांदेडला नेतो म्हणून त्याने दुचाकीवर बसवून नेले आणि तेलंगणा राज्यातील येडपल्ली येथील तलावात मुलीला मारून फेकून दिले.
advertisement
मृतदेह आढळल्यानंतर निझामाबाद पोलिसांनी तपास सुरू केला. बापानेच हत्या केल्याचे तपासात उघड झालं. 31 जानेवारी रोजी पांडुरंग कोंडामंगले आणि गणेश शिंदे या दोघांना तेलंगणा पोलिसांनी अटक केली. दरम्यान मागील सात वर्षापासून पांडुरंग कोंडामंडले गावात राहत नव्हता. त्यामुळे या घटनेबद्दल गावकऱ्यांना अधिकची माहिती नाही.

मुलीला का मारलं? पांडुरंग म्हणाला...

मुलीचा मृतदेह मिळाल्यानंतर तेलंगणा पोलिसांनी तपास सुरू केला. मयत मुलगी पांडुरंग कोंडामंगले याची असल्याचे कळले. पोलिसांच्या तपासात पांडुरंग कोंडामंगले याने हत्येची कबुली दिली . सरपंच पदासाठी तीसर अपत्य अडचण ठरत असल्याने मुलीची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. यासाठी त्याला सरपंच गणेश शिंदे याने सहकार्य केले. गणेश शिंदे यांच्या सांगण्यावरुन त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसानी सांगितले.
advertisement
पांडुरंग कोंडामंगले याला जुळ्या मुली आणि एक मुलगा आहे. मुली जुळ्या असल्याने तिसरे अपत्य ग्राह्य धरल्या जात नाही. मात्र याबाबतची माहिती न घेता, राजकारणाच्या हव्यासापोटी त्याने पोटच्या मुलीचा बळी घेतला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
गावचा सरपंच होण्यासाठी तिसऱ्या अपत्याची अडचण, बापाने पोटच्या मुलीचा केला खून
Next Article
advertisement
सोन्या, चांदीने खरे रंग दाखवले, ओव्हरसोल्डनंतर दिला सर्वात मोठा झटका; वर्ल्ड मार्केटमध्ये उलथापालथ, गुंतवणूकदारांची धडधड वाढली
सोन्या, चांदीने खरे रंग दाखवले; ओव्हरसोल्डनंतर दिला सर्वात मोठा झटका
  • सोनं-चांदीत ऐतिहासिक उसळी, गुंतवणूकदार थक्क

  • ग्लोबल मेटल मार्केटमध्ये खळबळ

  • 2008 नंतरचा सर्वात मोठा सोन्याचा झटका

View All
advertisement