कोल्हापूर : नववर्षाचे स्वागत मोठ्या धुमधडाक्यात झालं. हाच आनंद साजरा करत असताना दुसऱ्या बाजूला माणसांना हे नवीन वर्ष आपल्याला कसं जाणार याचा प्रश्न भेडसावत असतो. यासाठी खास लोकल 18 ने राशिभविष्यबाबत विशेष मालिका सुरू केलीय. या मालिकेत आपण कुंभ राशीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. या संदर्भात ज्योतिष शास्त्री राहुल कदम यांनी कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी हे नववर्ष कसे जाणार याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
advertisement
काय आहेत या राशीचे स्वभाव वैशिष्ट्ये?
कुंभ ही राशीचक्रातील अकराव्या क्रमांकाची राशी असून जन्मकुंडलीमध्ये ही रास अकरावी अंकाने दर्शविली जाते. शनीची मकर नंतरची ही दुसरी रास आहे. शनी हा स्वामी ग्रहातून ही रास वायू तत्वाची म्हणजेच बौद्धिक राशी असून स्थिर स्वभावाची राशी म्हणून ओळखली जाते. आकाशात ही रास एका मातीच्या मडक्यात म्हणजे कुंभाच्या स्वरूपात आपल्याला असलेली दिसून येते. हा जो मातीचा कुंभ आहे तो मातीचा कुंभ ज्ञानाचा कुंभ म्हणून ओळखला जातो. तशाही वायू तत्वाच्या राशी या बौद्धिक राशी म्हणूनच शास्त्रात ओळखल्या जातात.
Gemini Astrology 2025: धरसोड करू नका, अन्यथा धोका! मिथुन राशीसाठी ज्योतिषींचा महत्त्वाचा सल्ला
बौद्धिक रास असल्याकारणाने व्यवहार कुशल, उत्तम वक्तृत्व तसेच ज्ञान अर्जन करण्याची प्रवृत्ती या राशीमध्ये अधिक असलेले दिसून येते. त्यामुळे चिकित्सक, ज्ञानपीपासून ते वेगवेगळ्या ठिकाणचा ज्ञान अर्जित करणं हे या लोकांना फार आवडतं. त्यामुळे प्राध्यापक, संशोधक, विविध गोष्टींचा शोध घेणारे लेखक, साहित्यिक असे लोक कुंभ राशीवरती जन्माला आलेल्या आपणास दिसून येतात. कुंभ राशीचा स्वभाव हा ज्ञान देणारा असल्याकारणाने लोकांना उत्तम प्रकारे हे मार्गदर्शन करू शकतात. दुसऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समोरच्याची वाट पाहत नाही ते स्वतःहूनच इतरांना मार्गदर्शन करतात, असं ज्योतिषी सांगतात.
ग्रहमान बदलाचा काय परिणाम होईल
वर्षाच्या आरंभी आपल्याच राशीमध्ये असलेला शनी हा आपल्या व्यक्तिमत्त्वावरती बराच परिणाम करणारा असा ठरलेला असून मागील दोन वर्षे आपल्या व्यक्तिमत्त्वाला कुठेच उभारी आलेली नाही. आपल्या व्यवसाय आणि नोकरीच्या ठिकाणी आपल्या बाबतीत बरीच गैरसमज निर्माण होऊन आपल्या प्रगतीला बाधा निर्माण झालेली आहे. मात्र ही बाधा 29 मार्च नंतर शनीचा बदल झाला की ती निश्चित स्वरूपात आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. 29 मार्चला शनिदेव कुंभ राशीमधून मीन राशीत प्रवेश करीत आहे. त्यामुळे आपल्या साडेसातीचे दोन टप्पे संपून शेवटच्या टप्प्याची सुरुवात होत आहे.
मध्या टप्प्यामध्ये शनिदेव आपल्याच राशीत असल्याकारणाने जो काही आपल्या व्यक्तिमत्त्वावरती परिणाम झालेला आहे तो आता निघून जाईल. आपली व्यक्तिमत्व आणखीन उजळून निघेल. आपण जे कष्ट घेतले आहेत त्या कष्टाचे आता चीज होण्याची वेळ आलेली आहे. आपल्यासाठी हा काळ आता प्रगतीचा असेल. शनिदेव आपल्या धनस्थानात असले तरी हा बदल आपल्यासाठी अनपेक्षित धनलाभ करणारा ठरू शकतो. शेअर्स मार्केट किंवा विम्याच्या माध्यमातून आपणास बरेच लाभ होत असलेले दिसतील, असं ज्योतिषी सांगतात.
शनी देवानंतर जो ग्रह बदल होणार आहे तो आहे गुरूचा. 14 मे रोजी गुरु आपल्या चतुर्थस्थानामधून पंचम स्थानात येत आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींचे विवाह रखडलेले आहेत किंवा ज्यांना संतान प्राप्तीची आस आहे त्या लोकांनी 14 मे नंतर या गोष्टींसाठी प्रयत्न करावे. ते प्रयत्न त्यांच्यासाठी लाभदायक ठरतील. तसेच स्थावर मालमत्तेच्या बाबतीत जर विचार करायला गेले तर स्थावर आणि वाहन या दोन गोष्टी घेत असताना काळजी घेणे गरजेचे आहे. कागदपत्रांच्या दृष्टीने आपल्यासाठी फसवणूक होणे वगैरे या गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे कागदपत्रांची योग्य ती पडताळणी केल्याशिवाय कोणतीही व्यवहार करू नये. हा काळ विद्यार्थी वर्गासाठी मात्र अतिशय चांगला असून संशोधनात्मक कार्य करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळामध्ये उत्तम उत्कर्ष आणि गुणवत्ता प्राप्त करून घेता येईल. मित्रवर्ग हा आर्थिक आणि मानसिक आधार देणारा असा राहील. त्यामुळे मित्रांकडून आपण आशा करायला काही हरकत नाही.
Cancer Astrology 2025 : कर्क राशीसाठी येणारं वर्ष अत्यंत शुभ आणि लाभदायी, सर्व कामं लागतील मार्गी
गुरु बदलानंतर 29 मे ला राहू आणि केतू हे आपल्या राशी बदलत असून राहू हा ग्रह आपल्या राशीत येत आहे. केतू हा सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंता निर्माण होतील. जोडीदाराचा आरोग्य संभाळणं आपल्या हातात आहे. जोडीदाराच्या आरोग्याबाबत आपण हेडसाळ करू नका कारण ही हेडसाळ पुढे जाऊन आपल्यासाठी त्रासदायक ठेवू शकते. तसेच आपल्या जीवनातील जे काही साथीदार असतील, व्यवसायातील किंवा नोकरीतील जे काही सगळे सोयरे किंवा सवंगडी असतील त्यांच्याकडून आपल्याला उत्तम प्रकारे लाभ प्राप्त करून घेता येईल, असं ज्योतिषी सांगतात.
कोणती उपासना कराल?
राशीसाठीची जी उपासना आहे ती सध्या साडेसाती चालू असल्यामुळे मारुतीची उपासना तर महत्त्वाचे आहेच पण सोबत गणपतीची जर उपासना केली तर ती आपल्यासाठी फायदेशीर ठरेल. दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर ओम गं गणपतये नमः हा जप करावा. मंगळवारी गणपतीचे दर्शन न चुकता घ्यावे. दर्शन घेतल्यानंतरच आपल्या दिवसाच्या कोणत्याही कार्याची सुरुवात करावी. गणपतीला जात असताना एक लाल जास्वंदीचे फुल, गुळाचा एक खडा तसेच दुर्वांची जुडी घेऊन जावे आणि गणपतीला 21 प्रदक्षिणा घालाव्यात. रोज सायंकाळी आपण जर भटक्या प्राण्यांना जर अन्नदान केले तर ते आपल्यासाठी आणखीन चांगलं होऊ शकेल. या गोष्टीमुळे आपल्या वैवाहिक जीवनामधील ताणतणाव दूर व्हायला मदत होईल, असं देखील ज्योतिषी कदम यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.





