Cancer Astrology 2025 : कर्क राशीसाठी येणारं वर्ष अत्यंत शुभ आणि लाभदायी, सर्व कामं लागतील मार्गी
- Published by:Mohan Najan
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
नवीन वर्षाची सुरुवात व्हायला अगदी काहीच दिवस राहिले आहेत. नवीन वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी कसं असेल? नेमकं राशीभविष्य काय असणार? हे कोल्हापुरातील ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांच्याकडून जाणून घेऊ.
निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : नवीन वर्षाची सुरुवात व्हायला अगदी काहीच दिवस राहिले आहेत. यात प्रत्येकजण आपल्या वर्तमानासोबतच येणारं नववर्ष कसं जाईल हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. नवीन वर्षाबाबत सांगायचं झालं तर येणार नववर्ष प्रत्येक राशींसाठी कसं जाणार यासाठी लोकल 18 ने विशेष मालिका सुरू केली आहे. नवीन वर्ष कर्क राशीच्या लोकांसाठी कसं असेल? नेमकं राशीभविष्य काय असणार? हे कोल्हापुरातील ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
काय आहेत कर्क राशीचे स्वभाव वैशिष्ट्ये?
कर्क रास ही राशीचक्रातील चौथ्या क्रमांकाची राशी असून ही चंद्र या ग्रहाची राशी आहे. ही जलतत्त्वाची राशी असून चर स्वभावाचे आहे. चर स्वभाव असल्याकारणाने अस्थिर वृत्ती असलेली आणि कायम इकडे-तिकडे फिरणारी म्हणून ही रास ओळखले जाते. यांना प्रवासाची आणि पर्यटनाची फार आवड असते. तसेच जलाशयाच्या ठिकाणी आपला वेळ घालवणे यांना मनापासून आवडते. कलासक्त अशी ही राशी असून वेगवेगळ्या कलांची यांना आवड असते. कुटुंब वत्सल अशी ही रास असून कुटुंबातील प्रत्येक सदस्यावरती यांचे प्रेम असते.
advertisement
कुटुंबात रमणारी ही रास असून कुटुंबाबद्दल फार जिव्हाळा असणारी कुटुंबामध्ये रमणारी आप्त स्वकीयांबद्दल आपुलकी असणारी ही रास आहे. शक्यतो ही रास तुम्हाला स्वयंपाक घरात जास्त करून रमवणारी असून विविध खाद्यपदार्थ स्वतः खाण्यासोबतच इतरांना देखील करून खायला घालणे यांना फार आवडते. कर्क राशीचे पुरुष मंडळी देखील किचनमध्ये वेळ घालवायला मागेपुढे पाहत नाहीत. त्यांना देखील विविध पदार्थ करून स्वतः खाऊन दुसऱ्यांना घालायला आवडतात. त्यामुळे जर एखादा पुरुष तुम्हाला किचनमध्ये दिसला तर तो निश्चितच कर्क राशीचा आहे हे समजायला हरकत नाही, असे ज्योतिषशास्त्री सांगतात.
advertisement
या राशीचा स्वामी ग्रह चंद्र असल्याकारणाने अतिशय भावनाशील आणि संवेदनशील अशी ही माणसे असून कोणतीही छोटी छोटी गोष्ट आपल्या मनाला लावून घेतात. प्रेमाच्या बाबतीत मात्र अजिबात मागेपुढे न बघता सर्वांवरती आपला जीव ओवाळून टाकणारी ही रास आहे. माया ममता वात्सल्य या सगळ्या गोष्टी या राशीमध्ये असलेल्या आपणास दिसून येतात. अतिशय प्रेमळ स्वरूपाची ही रास असून दुसऱ्यांना आपलेसे करण्याची कला या राशीत असल्याचे आपणास दिसून येते.
advertisement
एका जागेवर स्थिर राहणे यांना जमत नाही कायम फिरतं राहणं यांना आवडतं. त्यामुळे एखाद्याला जर भेटचे ठिकाण यांनी दिले असेल तर त्या नक्की ठिकाणी ते भेटणार नाही तर त्यापासून आजूबाजूची ठिकाणी ते तुम्हाला भेटतील कारण एका जागेवरती स्थिर राहतच नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात आलेल्या चांगल्या संधी देखील हे लोक आपल्या धरसोडपणामुळे आणि थिरथिरेपणामुळे घालवतात. आपल्या स्वभावामुळे यांचा मित्र वर्ग फार मोठा असतो भिन्नलिंगी वर्गामध्ये देखील यांचा मित्र वर्ग पुष्कळ असतो. आपल्या स्वभावामुळे समोरच्याला आकर्षित करणे यांना जमते, असे ज्योतिषशास्त्री सांगतात.
advertisement
ग्रहमान बदलाचा काय होणार परिणाम?
आगामी वर्षातील पहिला ग्रह बदल आहे तो म्हणजे शनिदेवांचा. शनिदेव 29 मार्चला आपल्या कुंभ राशी मधून मीन राशिमध्ये गोचरीने प्रवेश करत असून मीन राशीतील प्रवेशानंतर कर्क राशीची ढैय्या पनोती संपत आहे. त्यामुळे येणारा काळ हा शुभकारक आणि लाभक कारक असाच असेल. 29 मार्चनंतर येणारा काळ हा कर्क राशीच्या दृष्टीने आपली रखडलेली कामे पूर्णत्वाला जाणारा आहे. त्यामुळे गेले अडीच वर्ष जो काही त्रास आपल्याला सोसावा लागला असेल तो काही अंशी आता संपेल. तुमची जी काही अडकलेली कामे असतील ती मार्गी लागेल. आपल्या पराक्रम स्थानावरती गोचरीच्या शनीची दृष्टी असल्याने आतापर्यंतचे आपले झाकोळे गेलेले कर्तुत्व उजळून निघेल. आपल्या कामाची दखल घेतली जाईल. नवीन जबाबदारी देखील आपल्या वरती पडेल आणि ती चांगल्या पद्धतीने आपण पार पाडाल.
advertisement
14 मे ला होणारा गुरु बदल हा आपणासाठी थोडासा चिंताजनक असेल कारण 14 मे पर्यंत असलेला अकरावा गुरु हा 14 मे नंतर बारावा होईल. जो आपल्याला अनिष्ट असा असेल. त्यामुळे जे विवाहेच्छूक लोक आहेत त्यांनी आपल्या विवाहासाठी 14 मे पूर्वी प्रयत्न करणे अपेक्षित आहे. 14 मे पूर्वी केलेले प्रयत्न त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक ठरतील. त्याच पद्धतीने ज्यांना संतती बद्दल नियोजन करायचे आहे. त्यांनी संततीसाठी 14 मे पूर्वी चान्स घ्यायला हरकत नाही. जो त्यांना सुदृढ आणि चांगली संसती मिळवून देऊ शकतो, असे ज्योतिषशास्त्री सांगतात.
बारावा गुरू हा तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये ताण तणाव निर्माण करणारा असून त्यामुळे आपल्या जोडीदाराबरोबर आपले संबंध थोडेसे तणावपूर्ण राहतील. अशावेळी आपण योग्य संयमाने जर परिस्थिती हाताळली तर त्याचा फारसा त्रास भोगावा लागणार नाही. तशीही कर्क रास ही थोडीशी वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने कमनशिबीच समजली गेलेली आहे. त्यामुळे वैवाहिक जीवनातील तणाव आपण वाढवू न देणे हे आपल्या हातात आहे. त्याकरता आपल्या जोडीदाराबरोबर आपले संबंध हे संवाद पूर्ण असावेत याची काळजी घ्यावी. नोकरीच्या ठिकाणी मात्र नवनवीन जबाबदाऱ्या आपल्यावरती पडतील आणि नवीन संधी देखील उपलब्ध होतील. विद्यार्थी वर्गासाठी मात्र येणारा काळ हा शुभ फलक आहे असून स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती सारख्या परीक्षा यामध्ये विद्यार्थ्यांना चांगले यश प्राप्त होईल आणि त्यामध्ये पुरस्कार देखील मिळतील.
गुरुच्या गोचर भ्रमणानंतर जो राशिबद्दल होणार आहे तो राहू आणि केतूचा. 29 मेला राहू हा मीन राशीतून कुंभ राशीत तर केतू हा कन्या राशी तून सिंह राशीमध्ये प्रवेश करीत आहे. या काळामध्ये आपली आर्थिक ओढाताण जरी होत असली तरी राहू हा अचानक धनलाभ प्राप्त करून देईल. शेअर मार्केट लॉटरी वारसा हक्क किंवा विम्याच्या माध्यमातून धनलाभ होत राहतील. या काळामध्ये पाळीव प्राण्यांपासून थोडंसं सावध राहावं. पाळीव प्राण्यांची फार लाड करण्याच्या भानगडीत पडू नये. त्यांच्यापासून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डोळ्या संबंधित काही आजार उद्भवू शकतात. त्यामुळे डोळ्यांची काळजी घ्यावी. जर असं काही शंका वाटली तर आपल्या जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन वेळीच उपचार करून घ्यावेत, असे ज्योतिषशास्त्री सांगतात.
कोणती उपासना कराल?
आगामी येणाऱ्या काळात होणारा त्रास कमी करायचा असेल तर आपण आपल्या उपासनेचे बळ वाढवणे गरजेचे आहे. उपासनेपासून पळ काढणे आपल्यासाठी फारसे फायदेशीर ठरणार नाही. त्यामुळे आपले इष्ट दैवत आणि कुलदैवत यांची उपासना आपण नित्यनेमाने करावी. गुरुची उपासना तसेच महादेवाची उपासना देखील आपणास उपकारक ठरेल.
ओम नमः शिवाय जप करणे आपणास फायदेशीर ठरत तसेच दर गुरुवारी दत्त महाराजांची किंवा गुरू स्वरूप व्यक्तींचे दर्शन घ्यावे. पूर्ण श्रद्धेने आपल्या उपासना कराव्यात या आपल्याला निश्चित फलदायी ठरतील. प्रेम प्रकरणाचा विचार करता गोचरणी बदलणारा राहू हा प्रेमी युगुलमध्ये गैरसमज निर्माण करेल आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होऊ शकते. मित्रांमध्ये आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. नात्यांमध्ये आर्थिक व्यवहार करणे टाळावे नाहीतर आर्थिक गोष्टींमुळे आपल्या नात्यांमध्ये दुरावा निर्माण होईल, असं देखील ज्योतिषी कदम यांनी सांगितलं.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 26, 2024 7:00 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Cancer Astrology 2025 : कर्क राशीसाठी येणारं वर्ष अत्यंत शुभ आणि लाभदायी, सर्व कामं लागतील मार्गी

