Gemini Astrology 2025: धरसोड करू नका, अन्यथा धोका! मिथुन राशीसाठी ज्योतिषींचा महत्त्वाचा सल्ला

Last Updated:

Mithun Rashi Bhavishya: लवकरच नवीन वर्ष 2025 सुरू होत आहे. हे वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी कसं राहील? हे ज्योतिष अभ्यासकांकडून जाणून घेऊ.

+
Astrology

Astrology 2025: काळजीपूर्वक व्यवहार करा, अन्यथा...; मिथुन राशीबाबत ज्योतिषींचा महत्त्वाचा सल्ला...!

निरंजन कामत, प्रतिनिधी
कोल्हापूर : सध्या नवीन वर्षाची चाहूल सर्वांनाच लागली आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांना नवीन वर्ष कसे जाणार? याबद्दल उत्सुकता आहे. म्हणून लोकल18 ने 12 राशींसाठी विशेष मालिका सुरू केली आहे. या मालिकेत आपण राशीचक्रातील तिसऱ्या म्हणजेच मिथुन राशीबद्दल जाणून घेणार आहोत. मिथुन राशीच्या लोकांना करिअर, व्यवसाय, नातेसंबंध, आरोग्य आणि धर्म अशा सर्वच दृष्टिकोनातून येणारं नवीन वर्ष कसं असेल? याबाबत कोल्हापूर येथील ज्योतिष अभ्यासक राहुल कदम यांनी माहिती दिलीये.
advertisement
मिथुन राशीची स्वभाव वैशिष्ट्ये
राशीचक्रातील तिसरी रास म्हणून मिथुन रास ओळखली जाते. मिथुन ही बुध या ग्रहाची राशी असून ती वायु तत्वाची व द्विसभाव अशी आहे. बुध हा ज्योतिष शास्त्रात बुद्धी व वाणीचा कारक मानलेला आहे. रवी राजा, मंगळ सेनापती तर बुध युवराज म्हणून नवग्रहांमध्ये ओळखला जातो. युवराजप्रमाणेच मानसिकता असलेल्या या व्यक्ती असतात. खिलाडू वृत्ती, हसत खेळत राहणे, कोणत्याही गोष्टीचे गांभीर्य न ठेवणे, आयुष्याकडे गंभीरपणे न पाहणे असे गुणधर्म या राशीमध्ये दिसून येतात.
advertisement
कायम हसतमुख, खोडकर प्रवृत्ती लहानांपासून मोठ्यांपर्यंत वावर असलेली ही असून यांचा मित्र वर्ग फार मोठा असतो. प्रत्येकाला मदत करण्यास कायम तत्पर असणे व कोणालाही नाही म्हणता न येणे हे या राशीचे वैशिष्ट्य म्हणून ओळखता येते. स्वभावामध्ये धर सोड वृत्ती दिसून येते. कुठल्याही गोष्टीबद्दल ठामपणे निर्णय घेता येत नाही. त्यामुळे आयुष्यातील बऱ्याच संधी गमावून बसतात. हसरे व्यक्तिमत्व व आपल्या वयापेक्षा कमी दिसणारे हे व्यक्तिमत्व असल्यामुळे समोरच्या व्यक्ती वरती कायम यांचा प्रभाव पडतो. वायू तत्वाची रास असल्याकारणाने सतत फिरत राहायला आवडते, असं ज्योतिषी सांगतात.
advertisement
धरसोड वृत्तीमुळे नुकसान
ज्योतिष शास्त्रात वायू तत्वाची राशी या बौद्धिक राशी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे बौद्धिक क्षेत्रात हे लोक कार्यरत असलेली दिसून येतात. व्यवहारांमध्ये चतुरपणा असतो. मात्र शैक्षणिक दृष्ट्या ही रास फारशी चतुर नसते. कारण एका जागी स्थिर नसते. धर सोडपणाच्या वृत्तीमुळे शैक्षणिक नुकसान देखील बऱ्याच वेळा होते, अशी माहिती ज्योतिषी देतात.
advertisement
येणारं वर्ष कसं असेल?
आगामी 2025 हे वर्ष हे सर्वार्थाने लाभदायक असे असणार आहे. या वर्षात होणारे ग्रह बदल हे वर्षाच्या मध्यंतरानंतर बदलणार आहेत. त्यामुळे शुभ ग्रहांची फले ही दीर्घकाळ या राशीला प्राप्त होणार आहेत. 2025 मध्ये 29 मार्चला शनिदेव आपली राशी बदलणारा असून ते आपल्या कुंभ राशीतून मीन राशी मध्ये गोचरीने भ्रमण करणार आहेत. गोचरीने होणारा शनीचा बदल हा आपल्या व्यवसायात व नोकरीमध्ये चांगला बदल करणारा असा असणार आहे.
advertisement
वर्षाच्या मध्यंतरानंतर स्थान बदलाचे देखील योग दिसून येतात. नोकरी व्यवसायात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील. त्या तुम्ही चांगल्या पद्धतीने पार पाडू शकाल. अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी आपल्यात असलेला धरसोडपणा मात्र थोडा आपणास कमी करावा लागेल. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला प्रसिद्धी नावलौकिक प्राप्त होईल. आपण आपल्या धरसोडपणावरती जर नियंत्रण मिळवू शकलात तर आगामी वर्षात आपण आपल्या यशाच्या शिखरावरती निश्चितच पोहोचू शकाल, असंही ज्योतिषी सांगतात.
advertisement
ग्रहमान बदलाचा काय फरक पडेल? 
येणाऱ्या नववर्षात 14 मे 2025 रोजी गुरु हा ग्रह वृषभ राशीतून मिथुन राशीत प्रवेश करतोय. म्हणजेच आपल्या राशीत प्रवेश करतोय. त्यामुळे 14 मे पूर्वी आपणास नसलेले गुरुबल 14 मे नंतर आपणास प्राप्त होईल. त्यामुळे जे लोक विवाह इच्छुक आहेत व ज्यांचे विवाह रखडलेले आहेत, अशा व्यक्तींनी 14 मे नंतर आपल्या विवाहासाठी प्रयत्न करावेत. ते निश्चितच लाभदायक ठरतील. आपल्या जोडीदारासमवेत यावर्षी आपणास दूरच्या प्रवासाचे योग घडतील. वर्षाच्या अखेरीस आपल्या घरामध्ये एखादे शुभ कार्य घडून येईल.
गुरु बदलानंतर मे महिन्याच्या अखेरीस राहू व केतू यांचे गोचरणी भ्रमण घडत असून राहू हा ग्रह कुंभ राशी तर केतू हा ग्रह सिंह राशीत प्रवेश करीत आहे. राहू हा आपल्याला नव्या भाग्यस्थानात येत असून केतू हा सिंह राशीत पराक्रमात येत आहे. त्यामुळे भावंडांसमवेत मतभेद होऊ शकतात. तसेच आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याबद्दल गैरसमज पसरून गालबोट देखील लागू शकते. त्यामुळे या गोष्टींबद्दल थोडीशी काळजी घ्यावी, असंही ज्योतिषी कदम सांगतात.
मतभेदाच्या ठिकाणी संयमाने वागल्यास फार त्रास होणार नाही. या वर्षामध्ये आपली आर्थिक येणी बऱ्यापैकी वसूल होतील किंवा कुठे केलेली तुमची गुंतवणूक तुम्हाला चांगला परतावा मिळवून देईल. महिला वर्गाला हे येणारे वर्ष लाभदायक ठरणार असून त्यांना त्यांच्या सार्वजनिक जीवनामध्ये प्रसिद्धी व विविध प्रकारचे लाभ प्राप्त करून देईल. यावर्षी आपल्याकडून काही धार्मिक यात्रा देखील घडून येतील. कागदपत्रांच्या बाबतीत मात्र आपण काळजीपूर्वक व्यवहार करावे. महत्त्वाची कागदपत्रे गहाळ होण्याची शक्यता यावर्षी राहील. त्यामुळे कागदपत्रांच्या बाबतीत काळजी घ्यावी, असे ज्योतिषी सांगतात.
कोणती उपासना कराल?
आगामी वर्षात येणाऱ्या अडचणींपासून दूर राहण्यासाठी व अडचणी कमी करण्यासाठी राशीची म्हणून विष्णूची उपासना करणे आपणास लाभदायी ठरेल. वेंकटेश स्तोत्र, विष्णुसहस्त्रनाम किंवा पुरुष सूक्त यापैकी कोणतेही स्तोत्र आपण रोज पठण केले तर ते आपणास फलदायी ठरेल. तसेच दर बुधवारी विष्णूचे दर्शन घ्यावे. रोज सायंकाळी रामरक्षाचे पठण देखील फायदेशीर ठरते. आपल्या सोबत हिरव्या रंगाची छटा असलेले हात रुमाल किंवा कापड बाळगणे देखील आपल्या आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरेल.
सूचना : इथं दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज18 मराठी त्याची हमी देत नाही.
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Gemini Astrology 2025: धरसोड करू नका, अन्यथा धोका! मिथुन राशीसाठी ज्योतिषींचा महत्त्वाचा सल्ला
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement