मघा नक्षत्रातील पाऊस म्हणजे सासूचा पाऊस - मघा नक्षत्रातील पावसाला 'सासूचा पाऊस' असेही म्हणतात. या म्हणीचा अर्थ असा आहे की, सासू जशी काहीवेळा खूप प्रेमळ असते आणि काहीवेळा कडक होते, त्याचप्रमाणे या नक्षत्रात पाऊस काही भागात खूप मुसळधार पडतो, तर काही ठिकाणी हुलकावणी देतो.
अचानक जोरदार पाऊस - काही ठिकाणी असाही समज आहे की, मघा नक्षत्रात अचानक जोरदार पाऊस येतो आणि तो थोड्याच वेळात थांबतो. या नक्षत्रात पाऊस इतका सातत्याने किंवा अचानक पडतो की, माणूस घराबाहेर पडू शकत नाही आणि चुलीच्या उबेजवळ बसून राहतो. मघा नक्षत्राचे वाहन बेडूक असल्यानं या नक्षत्रात पाऊस चांगला पडेल, अशी अपेक्षा केली जाते. पण, हा पाऊस सर्वत्र सारखा नसतो, तो काही ठिकाणी मुसळधार असतो तर काही ठिकाणी खंडित स्वरूपाचा असतो. म्हणूनच या नक्षत्रातील पाऊस हा अनपेक्षित आणि कधीकधी जोरदार असतो.
advertisement
भारतीय ज्योतिषशास्त्र आणि कृषी परंपरेनुसार, पावसाचे नऊ प्रमुख नक्षत्रे आहेत आणि त्यापैकी प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे. काही नक्षत्रात जास्त पाऊस पडतो, काही नक्षत्रे जोरदार पावसासाठी विशेषतः ओळखली जातात.
मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; सुख कमी अन् टेन्शन जादा?
पावसाची नक्षत्रे -
आर्द्रा नक्षत्र : हे नक्षत्र पावसाच्या निश्चित आगमनासाठी ओळखले जाते. आर्द्रा नक्षत्रात पाऊस पडला तरच पेरणी योग्य होते, असे मानले जाते. या नक्षत्रात अनेकदा मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे शेतीसाठी आवश्यक ओलावा निर्माण होतो.
पुनर्वसू नक्षत्र : या नक्षत्राला तरणा पाऊस असेही म्हणतात. पुनर्वसू नक्षत्रात पाऊस चांगला आणि सातत्यपूर्ण पडतो, ज्यामुळे पिकांना योग्य वाढीसाठी मदत होते.
मघा नक्षत्र: या नक्षत्राला सासवांचा पाऊस असे म्हणतात, कारण तो अचानक आणि जोरदारपणे येतो. काही ठिकाणी या नक्षत्रात मुसळधार पाऊस पडतो, तर काही ठिकाणी तो कमी असतो. मात्र, जेव्हा हा पाऊस पडतो, तेव्हा तो खूप जोरदार असतो.
हस्त नक्षत्र : हे नक्षत्र परतीच्या पावसासाठी ओळखले जाते. या पावसाला 'हस्ताचा पाऊस' असे म्हणतात. रब्बी पिकांसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. "पडेल हस्त तर कुणबी होईल मस्त" अशी एक प्रसिद्ध म्हण या नक्षत्राबद्दल आहे.
शनिचा फेरा कधी, कसा छळणार? मेष, वृषभ, मिथुन राशींचा टाईम फिक्स; कर्मफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)