TRENDING:

प्रेमासाठी स्वत:ला सिद्ध करावं लागेल, तूळ राशीच्या लोकांना फेब्रुवारी कसा असेल? Video

Last Updated:

तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी फेब्रुवारी हा महिना काही बाबतीत खूप उत्तम असणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
advertisement

कोल्हापूर : नवीन वर्षाची सुरुवात होऊन पहिला महिना संपला देखील. मात्र येणारा पुढचा महिना हा आपल्या आयुष्यात कसा असणार आहे? प्रेमाचा महिना म्हणून ओळख असणाऱ्या फेब्रुवारी महिन्यात काही चांगल्या वाईट गोष्टी आपल्या बाबतीत घडणार आहेत का? हे जाणून घेण्यासाठी बरेच जण उत्सुक असतात. म्हणूनच बारा राशींपैकी तुला अर्थात तुळ राशीच्या व्यक्तींच्या मासिक राशिभविष्यात काय सांगितले आहे? याची माहिती ज्योतिष अभ्यासक तरुण शर्मा यांनी दिली आहे.

advertisement

तूळ राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी फेब्रुवारी हा महिना काही बाबतीत खूप उत्तम असणार आहे. तथापि, काही क्षेत्रात तूळ राशीच्या व्यक्तींना आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या खर्चांना घेऊन त्यांना सावधानता बाळगावी लागेल, अन्यथा आर्थिक स्थितीवर जोर पडण्याची शक्यता आहे, असे तरुण शर्मा यांनी सांगितले आहे.

आर्थिक परिस्थिती सुधारायला होईल मदत; कुंभ राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video

advertisement

विद्यार्थ्यांसाठी फेब्रुवारी कसा?

विद्यार्थ्यांची या महिन्याची सुरवात अनुशासित रूपात असेल. शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत उत्तम परिणामांची प्राप्ती होईल आणि केलेले प्रयत्न यशस्वी होतील. तुमची थांबलेली कामे होतील. तथापि, जर तुम्ही विदेशात जाण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, त्यात काही समस्या येऊ शकतात. काही कागदांमुळे तुम्हाला त्यात अडथळे येऊ शकतात. त्यासाठी आपल्याकडून पूर्णतः तपासूनच पुढे जावे. अन्यथा अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे ज्योतिषी सांगतात.

advertisement

नोकरी / व्यवसाय

फेब्रुवारी महिन्यात नोकरी आणि व्यवसायातील कार्यक्षेत्रात तुमची पकड मजबूत होईल. 5 तारखेला मंगळ आणि 12 तारखेला शुक्राच्या चतुर्थ भावात येऊन दशम भावाला पाहिल्याने तुम्ही अधिक मेहनत कराल आणि ऑफिसच्या काही विशेष व्यक्तींचे आकर्षणाचे केंद्र बनाल.

जमीन खरेदीची संधी, पण गुंतवणूक करताना.., पाहा कन्या राशीचे फेब्रुवारीतील मासिक भविष्य, Video

advertisement

आर्थिक स्थिती

जर तुमच्या आर्थिक स्थितीला पाहिले असता, राहू आणि केतूच्या द्वादश भावात प्रभाव असण्याच्या कारणाने खर्च कायम राहतील. शनीच्या पंचम भावात बसून एकादश आणि द्वितीय भावाला पाहण्याने तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. कमाईचा नवीन मार्ग तुम्हाला प्राप्त होईल, यामुळे तुमच्या कमाईमध्ये सतत वाढ होत राहील.

आरोग्याची काळजी

तूळ राशीच्या जातकांनी येणाऱ्या नवीन काळात आरोग्यविषयी काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक कोणताही त्रास उद्भवण्याची शक्यता असल्याने स्वास्थ्य संबंधित सावधानी ठेवणे अपेक्षित असेल.

प्रेमींसाठी अनुकूल काळ, करिअरमध्ये..., मीन राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video

प्रेमसंबंध

फेब्रुवारी महिना हा तुळ राशीच्या व्यक्तींसाठी प्रेमाच्या बाबतीत विशेष असेल. जर तूळ राशीच्या व्यक्ती प्रेमसंबंधात असतील, तर त्यांना या महिन्यात प्रेमासाठी स्वतःला सिद्ध करावे लागेल.

दरम्यान, तूळ राशीच्या जातकांनी थोडा संयम ठेवल्यास कुंडलीमधील बदलांनुसार थोडेफार कमीजास्त परिणाम पाहायला मिळू असतात. मात्र येणाऱ्या समस्यांवर उपाय म्हणून दर बुधवारी श्री गणपती अथर्वशीर्षचा पाठ करावा, असेही तरुण शर्मा यांनी सांगितले आहे.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
प्रेमासाठी स्वत:ला सिद्ध करावं लागेल, तूळ राशीच्या लोकांना फेब्रुवारी कसा असेल? Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल