कोल्हापूर : पुढे आपल्या आयुष्यात नेमकं काय घडण्याची शक्यता आहे, हे जाणून घेण्यासाठी बरेच जण आपले राशी भविष्य पाहत असतात. पुढच्या महिनाभरात कधी आपल्या बाबतीत चांगल्या गोष्टी ऐकायला मिळणार आहेत, कोणता काळ हा चिंताजनक ठरू शकतो या गोष्टींचा अंदाज मासिक राशिभविष्याच्या माध्यमातून येऊ शकतो. म्हणूनच बारा राशींपैकी तूला अर्थात तूळ राशीच्या व्यक्तींच्या मासिक राशिभविष्यात मार्च महिन्याबाबतीत नेमके काय सांगितले आहे, याची माहिती कोल्हापूरच्या ज्योतिष अभ्यासक श्रद्धा राठोड यांनी दिली आहे.
advertisement
तूळ रास ही नेहमी आयुष्यात बॅलेन्स ठेवून चालणारी रास म्हणून ओळखली जाते. तूळ राशीच्या जातकांसाठी मार्च हा महिना परिश्रमातून लाभ, शुभ संकेतांचा ठरणारा आहे. येणारा महिना हा प्रगतिकारक आणि लाभदायक ठरणारा असेल. मात्र वाणीवर आणि धन खर्चावर नियंत्रण ठेवणे तूळ राशीच्या व्यक्तींसाठी आवश्यक आहे,असे श्रद्धा राठोड यांनी सांगितले आहे.
मेहनतीचे मिळेल पूर्ण फळ; पाहा कन्या राशीचे मार्च महिन्यातील भविष्य, Video
1) विद्यार्थ्यांसाठी : येणारा मार्च महिना हा विद्यार्थ्यांसाठी उत्तम तर कलाकार मंडळींसाठी चांगला ठरणार आहे. या महिन्याची सुरुवात तुमच्यासाठी अनुकूल रूपाची असेल. शिक्षण आणि करिअरच्या बाबतीत विचार केल्यास तंत्रशिक्षण क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी येत्या काळात सजग राहण्याची आवश्यकता आहे.
2) नोकरी / व्यवसाय : येणारा काळ हा तूळ राशीच्या व्यापारी वर्गासाठी अत्यंत चांगला असणार आहे. त्याचबरोबर नोकरदार वर्गासाठी देखील अनेकानेक सुवर्णसंधी भरलेला असा हा मार्च महिना असणार आहे. मात्र व्यवसायामध्ये मेहनत आणि एकाग्रता आवश्यक आहे. असे केल्यानंतरच मिळणारे फलस्वरूप हे उत्तम असणार आहे.
3) आर्थिक : जर शेअर मार्केट तत्सम क्षेत्रामध्ये तूळ राशीच्या व्यक्ती गुंतवणुकीचा विचार करत असतील, तर स्वतःचे मत विचारात घेणे गरजेचे आहे. इतरांकडून मिळालेल्या सल्ल्यांचा विचार करून स्वतःचा निर्णय स्वतः घेणे कधीही योग्य ठरेल. वाणी आणि धन यांचा विचार करून वापर करावा.
Feng Shui Tips: फेंगशुईच्या मदतीने घरात सुख-समृद्धी येते आणि होतात वास्तुदोष दूर
4) आरोग्य : तूळ राशीच्या जातकांच्या आरोग्य दृष्ट्या पाहिल्यास येणाऱ्या नवीन काळात आरोग्यविषयी काळजी घेणे गरजेचे आहे. येत्या काळात त्वचासंबंधी तक्रारी किंवा ॲलर्जी सारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे याबाबतीत काळजी घेण्याची गरज आहे.
5) गृहस्थ जीवन : तूळ राशीच्या व्यक्तींनी गृहस्थ जीवनात सामंजस्याला महत्त्व देऊन आपले वागणे ठेवावे. तर तूळ राशीच्या व्यक्तींनी वडिलधाऱ्यांशी वैचारिक मतभेद टाळणे कधीही योग्य ठरणार आहे.
एकंदरीत तूळ राशीच्या व्यक्तींना येणारा मार्च महिना हा पहिल्या आठवड्यात जास्त लाभदायक तर उर्वरित दिवसात कमी लाभदायक ठरणार आहे. त्यानुसार खास सावधानता बाळगत तूळ राशीच्या जातकांनी भौतिक सुखाच्या गोष्टींमध्ये अडकून न राहता अर्थात दिखव्याच्या गोष्टींचा जास्त विचार आणि वापर न करता, वाणीवर लक्ष देणे योग्य ठरेल. दरम्यान तूळ राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या काळात उपाय म्हणून पांढऱ्या रंगाच्या वस्त्रांचा वापर जास्त करावा तसेच सूर्यनमस्कार नियमित करावेत असेही श्रद्धा राठोड यांनी स्पष्ट केले आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)