वृषभ : तुमचं प्रेमजीवन ताजंतवानं राहण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करा. जोडीदारासोबत रोमँटिक कँडललाइट डिनर केल्यास संध्याकाळ उत्तम ठरेल. रिलेशनशिपमध्ये अति गुंतल्यास दीर्घकालीन समस्या निर्माण होऊ शकतात. प्रत्येकालाच आपल्या जीवनात काही तरी एक्साइटमेंट हवी असते. त्यामुळे आपल्या जोडीदाराच्या जीवनात खऱ्या प्रेमाचं थ्रिल भरण्याचा प्रयत्न करा.
मिथुन : घराजवळच्या नाट्यामुळे तुमचं काम आणि अन्य जबाबदाऱ्यांवर परिणाम होऊ शकतो. तुमचा जोडीदार भावनांच्या निचऱ्याची प्रक्रिया सुरू करील आणि तुमच्याकडून प्रतिसादाची अपेक्षा बाळगील. कोणत्याही परिस्थितीत अति प्रतिसाद देऊ नका, दुसऱ्याचं फ्रस्ट्रेशन आपल्याकडे ओढवून घेऊ नका. तसंच, दुसऱ्याच्या दुःखासाठी, घसरलेल्या आत्मविश्वासाला तुम्ही जबाबदार आहात, असं समजू नका.
advertisement
कर्क : आज तुम्ही दरवाजे खुले केले पाहिजेत. तुमच्या आमंत्रणाशिवाय खास प्रिय व्यक्ती तुमच्या जवळ येणार नाही. तुमच्या परवानगीने ती व्यक्ती येईल. तुम्ही त्या व्यक्तीचं स्वागत कराल किंवा नाकाराल यांपैकी काही गृहीत धरू नका. त्यांचं स्वागत कराल हे त्यांना कसं कळू द्यायचं हे तुमच्यावर आहे. काही जणांना हे विचित्र वाटेल. तुमचा इतरांना अॅक्सेस स्वागतार्ह असेल. ते तुमच्या हातात आहे.
सिंह : तुम्हाला अचानक प्रिय व्यक्तीबद्दल सुंदर अशी नवी भावना वाटेल. तुम्हाला या व्यक्तीशी भावनिकरीत्या जोडल्यासारखं वाटेल. त्या व्यक्तीलाही तुमच्याबद्दल असंच वाटतंय का, याबद्दलच्या संकेतांची तुम्ही वाट पाहत आहात. काळजी करू नका. चांगली बातमी ऐकू येईल. काही तरी वाईट गृहीत धरण्यापेक्षा तुमचं मन उत्तम गोष्टीसाठी खुलं ठेवा.
कन्या : आज तुम्ही कोणालाही किंवा कोणत्याही व्यक्तीला गृहीत धरणार नाही. तुम्हाला कृतज्ञ वाटेल. प्रेमाच्या लहरी पृष्ठभागावर येतील. तुमच्या प्रिय व्यक्तीमुळे डोळ्यांत अश्रू येतील. या व्यक्तीला तुम्हाला काही सांगायचं आहे. त्यासाठी वाट कसली पाहत आहात?
तूळ : आज तुम्ही जोडीदारासोबत कोणत्याही गोष्टीविषयी चर्चा कराल आणि सेन्सिबल उपाय शोधून काढाल. वाद घालण्यापेक्षा आकर्षक, विचारप्रवर्तक आणि शांत प्लॅन आखा. तुमचा दृष्टिकोन आणि अपेक्षा यांमध्ये बदल केल्यास नक्कीच चांगले रिझल्ट्स मिळतील.
आशा सोडलेली, पण दैव बलवत्तर! सुख-समृद्धीचा कारक या राशींना खुश करणार
वृश्चिक : रोमँटिक रिलेशनशिप विकसित करणं, जुन्यातून नव्या रिलेशनशिपमध्ये जाणं थोडं कठीण असू शकतं. ते पर्फेक्ट असू शकत नाही; मात्र तेच त्याचं अर्धं, अनपेक्षित सौंदर्य असू शकतं. त्या इश्यूजशिवाय तुम्हाला हरवल्यासारखं वाटेल. रोमँटिक जीवनाचा विचार करता आज समस्या आणि विजय यांचं प्रमाण समान असेल.
धनू : न संपणाऱ्या प्रेमामध्ये रोमान्सचं रूपांतर व्हावं अशा मूडमध्ये तुम्ही आहात. ते स्वप्न सत्यात उतरण्यासाठीचे सर्व घटक आजच्या दिवसात आहेत. चांगलं रियलाझेशन असताना वेळ वाया घालवू नका. जोडीदारासोबत वेळ व्यतीत करा. टीव्ही पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा पार्टीज अटेंड करा. संभाव्य कनेक्शनसाठी वातावरण अनुकूल आहे.
मकर : चित्त विचलित करणाऱ्या गोष्टी, पाहुणे किंवा अन्य अडथळे असले, तरी तुम्ही प्रिय व्यक्ती किंवा जवळच्या मित्राशी रोमान्स कराल. आज तुमच्या मनाच्या इच्छेपासून कोणीही तुम्हाला दूर ठेवू शकत नाही. ज्या व्यक्तीवर प्रेम करत आहात, त्या व्यक्तीसोबत बाहेर जाण्यासाठी तुम्ही कोणतीही कारणं शोधू शकता. त्यामुळे तुमची रास मनांवर अधिराज्य गाजवते.
उलटं-पालटं-कुशीवर! झोपण्याची सर्वात आवडती पोजिशन आपल्याविषयी अनेक गोष्टी सांगते
कुंभ : तुम्हाला जोडीदारावर वेगळ्या पद्धतीने प्रेम करायचं आहे. काहीही गृहीत धरू नका. अटॅचमेंट आणि कृतज्ञतेच्या मोठ्या लाटांचा अनुभव घ्याल. प्रिय व्यक्ती तुमच्यासोबत असल्याने तुम्हाला खूप चांगलं वाटत आहे. तुम्हाला या व्यक्तीला खूप काही सांगायचं आहे, स्वप्नं शेअर करायची आहेत आणि आठवणींमध्येही रमायचं आहे. आज तुम्ही प्रेमासाठी कशाचाही त्याग करायला तयार आहात.
मीन : आज तुमचा फोकस प्रॅक्टिकल गोष्टींवर असेल. रोमान्ससाठी खूप ऊर्जा राहिली नसेल. काही प्राधान्यक्रम आहेत. सध्या तुमच्या आशा किंवा स्वप्नं किंवा तुमच्या जोडीदाराच्या आशा किंवा स्वप्नं प्राधान्यक्रमावर आहेत. आज तुम्ही करू शकता अशी गोड गोष्ट म्हणजे जोडीदाराला काय हवं आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं.