Astro: उलटं-पालटं-कुशीवर! झोपण्याची सर्वात आवडती पोजिशन आपल्याविषयी अनेक गोष्टी सांगते

Last Updated:

Sleeping position Astro: व्यक्तीची झोपण्याची स्थिती (पोजिशन) त्याच्याबद्दल बरेच काही सांगून जाते, असं सांगितलं तर अनेकांना खरं वाटणार नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आपली झोपण्याची पद्धत

News18
News18
मुंबई : एखाद्या व्यक्तीची झोपण्याची स्थिती (पोजिशन) त्याच्याबद्दल बरेच काही सांगून जाते, असं सांगितलं तर अनेकांना खरं वाटणार नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आपली झोपण्याची पद्धत आपल्याबद्दल अनेक गोष्टी सांगू शकते. जगभरातील मानसशास्त्रज्ञ आणि तज्ज्ञांनी झोपण्याच्या स्थितीबद्दल अभ्यास केला आहे आणि असे आढळले आहे की, आपल्या झोपण्याच्या पद्धतीमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरीच माहिती मिळते.
पोटावर (पालथं) झोपणारे -
काही लोकांना पालथं झोपण्याची सवय असते. त्याशिवाय त्यांना शांत झोपू शकत नाहीत. पालथं झोपणं ही एक सामान्य पोजिशन मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक पोटावर झोपतात ते सोशल आणि अतिशय मनमिळावू असतात. कामाच्या ताणामुळे हे लोक थोडे हतबल होतात. त्यांना स्वतःची टीका ऐकणे आणि इतरांवर टीका करणे आवडत नाही. हे लोक स्वतःला आतून असुरक्षित समजतात. पोटावर झोपण्याचे वैज्ञानिक कारण असे आहे की ते मानेच्या दुखापतींना प्रोत्साहन देते आणि गर्भवती महिलांसाठी हानिकारक असू शकते.
advertisement
डोक्याखाली हात ठेवून झोपणे -
अनेकांना हाताची उशी बनवून झोपायला आवडते. अशा लोकांच्या मैत्रीवर विश्वास ठेवायला हरकत नाही. या लोकांचे व्यक्तिमत्त्व खूप आकर्षक असते. बहुतेक लोक यांच्या स्वभावाने आणि शब्दांनी खूप लवकर आकर्षित होतात.
उशी घेऊन झोपणे -
उशी घेऊन झोपण्याची सवय महिलांमध्ये जास्त असते. जर त्यांच्याकडे उशी नसेल तर त्या त्यांच्या मानेखाली टेडी बेअर घेऊन झोपतील. अशा महिला आनंदी स्वभावाच्या असतात. त्या त्यांच्या नात्याला खूप महत्त्व देतात. त्या सर्व कामे स्वतः करतात. जोडीदार त्यांच्या सर्व गरजा हळूहळू पूर्ण करतो. त्या इतरांसाठीदेखील उपयुक्त आहेत. अशा लोकांना त्या ज्यांच्यावर प्रेम करतात त्यांची चांगली काळजी कशी घ्यावी हेदेखील माहिती असते. हे गुण स्त्री आणि पुरुष दोघांनाही सारखेच लागू होतात.
advertisement
पाय मुरगळुन झोपणे (गर्भाच्या स्थितीत) -
काही लोकांना पाय लोकांना गर्भासारखे झोपायला आवडते. असे मानले जाते की, जो या स्थितीत झोपतो तो आपल्या जीवनात आराम आणि सुरक्षितता शोधत राहतो. जर एखादी व्यक्ती या स्थितीत झोपत असेल तर तो एक अतिविचारी व्यक्ती आहे, जो खरोखर खूप संवेदनशील असू शकतो.
advertisement
सरळ वरती तोंड करून झोपणे -
जे लोक सरळ झोपतात ते आदर्शवादी असतात आणि शिस्तीचे पालन करतात. सैनिकाप्रमाणे सरळ मुद्रेत झोपणारे बरेच लोक आहेत. हे लोक अतिशय कठोर आणि सावध व्यक्तिमत्त्वाचे आहेत. झोपेत अशा प्रकारे झोपणे हे लष्करी जवानासारखे मानले जाते. याचा अर्थ तुम्ही तुमचे जीवन गांभीर्याने घेत आहात आणि तुमचे जीवन योग्य दिशेने जगण्यासाठी खूप अपेक्षा आहेत.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Astro: उलटं-पालटं-कुशीवर! झोपण्याची सर्वात आवडती पोजिशन आपल्याविषयी अनेक गोष्टी सांगते
Next Article
advertisement
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला; पाहा कधीही न पाहिलेले फोटो
Dhurandharची Real स्टोरी, SSP चौधरी असलम कोण होता? 9 वेळा मृत्यूला चकवा दिला
  • ज्याच्यावरून धुरंधर साकारला गेला तो चौधरी असलम कोण होता?

  • सिगारेट, पिस्तूल आणि ‘हवा-हवा’ – धुरंधरमागची खरी कहाणी थरकाप उडवणारी

  • एक माणूस, एक शहर आणि अखेरचा स्फोट – धुरंधरमागची खरी स्टोरी

View All
advertisement