लहान मुलांना चांदीचे दागिने घालण्याचे धार्मिक आणि ज्योतिषीय फायदे: दृष्ट लागणं किंवा वाईट नजर मुलांना लवकर लागते किंवा त्यांना नकारात्मक शक्तींचा प्रभाव होतो, अशी एक सामान्य समजूत आहे. चांदीला शुद्ध धातू मानलं जातं आणि असं मानले जातंय की, चांदीचे दागिने लहान मुलांना वाईट नजर आणि नकारात्मक वातावरणापासून सुरक्षित ठेवतात. ते एका संरक्षक कवचासारखे काम करतात जे मुलापर्यंत नकारात्मक ऊर्जा पोहोचू देत नाहीत. चांदीला एक पवित्र धातू मानले जाते आणि ती शुभ ऊर्जा आकर्षित करते असे म्हणतात. त्यामुळे घरात सकारात्मक वातावरण राहण्यास मदत होते.
advertisement
चंद्राचा प्रभाव: ज्योतिषशास्त्रानुसार, चांदीचा संबंध थेट चंद्र ग्रहाशी आहे. चंद्र हा मन, भावना आणि शांततेचा कारक मानला जातो. लहान मुलांना चांदीचे दागिने घातल्याने त्यांचा मानसिक विकास चांगला होतो, त्यांची एकाग्रता वाढते आणि मन शांत राहते. त्यांना चिडचिड किंवा अस्वस्थता होत नाही. चंद्राच्या प्रभावामुळे मुलांचे मन स्थिर राहते आणि त्यांना मानसिकदृष्ट्या बळ मिळते, असे मानले जाते.
शुभ-समृद्धीचे प्रतीक: चांदीला समृद्धी, शुद्धता आणि नशीबाचे प्रतीक मानले जाते. लहान मुलांना चांदीचे दागिने घालणे हे त्यांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि चांगुलपणा आणते अशी धारणा आहे. लहान मुलांना चांदीचे दागिने घालण्याचे आरोग्य फायदे आहेत. चांदीला शीतलता देणारा धातू म्हटले जाते. ती शरीरातील उष्णता शोषून घेते आणि शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यास याचा विशेष फायदा होतो.
जिवाणू प्रतिबंधक गुणधर्म :
चांदीमध्ये नैसर्गिकरित्या अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म असतात. चांदीच्या संपर्कात आल्यास हानिकारक जिवाणूंची वाढ थांबते. लहान मुलांना चांदीचे दागिने घातल्याने त्वचेवरील जंतुसंसर्ग टाळता येतो आणि त्वचेचे आरोग्य सुधारते. त्यामुळे त्वचेची सूज किंवा लालसरपणाची समस्या कमी होण्यास मदत होते. चांदीच्या धातूमध्ये असलेले घटक शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात असे मानले जाते. यामुळे लहान मुले आजारांपासून दूर राहतात. विज्ञानानुसार, चांदी हा धातू शरीरातून बाहेर पडणारी ऊर्जा शरीराला परत मिळवून देतो, ज्यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते असे मानले जाते.
रक्तदाब आणि रक्त परिसंचलन:
काही मतांनुसार, चांदीचे दागिने परिधान केल्याने रक्त परिसंचलन सुधारते आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. पूर्वीच्या काळी, चांदीचा उपयोग विषारी पदार्थांचा शोध घेण्यासाठीही केला जात असे. चांदीवर विषारी घटक आदळल्यास तिचा रंग बदलतो असे म्हटले जाते. यामुळे लहान मुलांना बाहेरील विषारी घटकांपासून काही प्रमाणात संरक्षण मिळते असे मानले जाते.
शनी 13 जुलैपासून वक्री चाल करणार; या 4 राशींना सलग नोव्हेंबरपर्यंत सुखाचे दिवस
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)