मेष: आर्थिक प्रगती आणि कर्जमुक्ती
मेष राशीच्या जातकांसाठी शनीचा हा बदल भाग्योदय घेऊन आला आहे. या काळात तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळण्यास सुरुवात होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. जर तुम्ही कुठे पैसे गुंतवले असतील, तर त्यातून 'बक्कळ' नफा मिळण्याची शक्यता आहे. बऱ्याच काळापासून डोक्यावर असलेले कर्ज फेडण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. वैवाहिक आयुष्यातील तणाव कमी होऊन जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील.
advertisement
सिंह: करिअरमध्ये मोठे यश आणि आरोग्य सुधारणा
सिंह राशीवर सध्या शनीच्या ढैय्याचा प्रभाव आहे, परंतु 21 मार्चनंतर शनीची बदललेली चाल तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रासातून दिलासा देईल. जे लोक नवीन नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना मोठ्या पगाराची नोकरी मिळू शकते. व्यावसायिकांना नवीन डील मिळाल्यामुळे नफ्यात वाढ होईल. प्रदीर्घ आजाराने त्रस्त असलेल्या लोकांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होईल. तुमच्या नेतृत्व क्षमतेचे कामाच्या ठिकाणी कौतुक होईल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल.
धनु: अडकलेली कामे होतील पूर्ण
धनु राशीच्या जातकांसाठी 21 मार्चनंतरचा काळ अत्यंत शुभ आहे. शनीच्या आशीर्वादाने तुमच्या प्रगतीतील सर्व अडथळे दूर होतील. भाग्याची पूर्ण साथ मिळाल्यामुळे तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. परदेश प्रवासाचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील सदस्यांशी असलेले मतभेद मिटतील. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. मालमत्तेशी संबंधित वादात तुमचा विजय होण्याची दाट शक्यता आहे.
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
