कोल्हापूर : लवकरच नवीन वर्ष सुरु होणार आहे. या वर्षात ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही होणार आहे. त्यामुळं येणारं नवीन वर्ष 2025 हे ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोणातून खूप खास मानल गेलंय. लोकल 18 ने यासाठी खास राशीचक्राची मालिका सुरू केली आहे. या पहिल्या मालिकेत आपण येणारं नवीन वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी कसं असेल? नेमकं राशीभविष्य काय असणार? हे कोल्हापुरातील ज्योतिषशास्त्री राहुल कदम यांच्याकडून जाणून घेऊ.
advertisement
मेष राशीची स्वभाव वैशिष्ट्ये
मेष ही मंगळ ग्रहाची, अग्नी तत्वांची, चर स्वभाव असलेली राशी असून आकाशात ही राशी आपणास मेंढ्यांच्या आकारात असलेली दिसून येते. त्यामुळे राशीचक्रात या राशीचे चिन्ह देखील मेंढा हे दिलेले आहे. मेंढ्यांच्या अंगी असलेली ऊर्जा व ताकत या राशीच्या लोकांमध्ये असलेली आपणास दिसून येते. चर स्वभावाची राशी असल्याने या व्यक्ती एका जागेवर स्थिर असलेल्या दिसत नाहीत. कायम कोणत्या ना कोणत्या कामात व्यस्त असतात. काम करण्याची ऊर्जा भरपूर असल्याने कार्य तत्पर असून दिरंगाई चालत नाही. अग्नी तत्वांची असल्याने रागट व तापट स्वभाव असतो, चटकन राग येतो. अतिउत्साही असल्याने कोणतेही काम करताना फार विचार करत नाहीत. त्यामुळे बऱ्याच वेळा पश्चात्ताप करण्याची वेळ येते. अतिउत्साह व अति धाडस हे काही वेळा नुकसानकारक ठरतात. संयमाने काम करायची सवय लावून घेणे गरजेचे असते.
Numerology 2025: तुमची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 आहे? नव्या वर्षात हवे ते मिळणार, पण...
शनीचा मीन राशीत प्रवेश, मेष राशीला फलदायी?
29 मार्चला शनी महाराजांचा मीन राशीत होणारा राशी प्रवेश हा मेष राशीला साडेसातीला आरंभ करीत आहे. त्यामुळे इथून पुढे साडेसात वर्षे साडेसाती राहणार आहे. शनी हा नियम, कायदा व कर्माचा कारक असल्याने या काळात आपल्याकडून कायदा व नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी. 12 वा शनी अचानक खर्च वाढवणारा असून आर्थिक नियोजन कोलमडू शकते. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. कायदेशीर बाबी त्रासदायक ठरतील. या काळात अतिउत्साहीपणा टाळावा रागावर नियंत्रण मिळवावे. हाताखालील लोक दगा देतील त्यांच्यावर फार भरवसा ठेवू नये, असे ज्योतिषशास्त्री सांगतात.
गुरुचा मिथुन राशीत होणार प्रवेश
14 मेला गुरुचे वृषभ राशीतून मिथुन राशीत गोचर प्रवेश होत आहे. जे लोक विवाह इच्छूक आहेत त्यांनी आपल्या विवाहासाठी 14 मेपर्यंत प्रयत्न करावेत. ते लाभदायक ठरतील. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होतील. त्यावेळी संयमाने परिस्थिती हाताळावी. मकर संक्रांतीनंतर स्थावर गोष्टींमध्ये लाभ प्राप्त होतील. 30 मार्च पूर्वी महत्वाच्या गोष्टींना आरंभ करावा.
कायदे, नियम तोडू नका, अन्यथा धोका! 8, 17 किंवा 26 जन्मतारीख असणाऱ्यांना कसं असेल नवं वर्ष?
राहू केतूचे गोचर कसं असेल?
29 मे ला होणारे राहू केतूचे गोचर भ्रमण मित्र वर्गात गैरसमज निर्माण करणारे ठरेल. मित्रांसोबत आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्यावी. नात्यांमध्ये दूरावा निर्माण होऊ शकतो. सिंह राशीमध्ये होणारे केतूची गोचर भ्रमण हे संतती बद्दल काळजी निर्माण करणारे राहील. त्यामुळे संततीच्या आरोग्याबाबत अती घाई करू नये. प्रेम संबंधांमध्ये विशिष्टता येऊन प्रेम संबंधात देखील तणाव निर्माण होतील. त्याकरिता अशा गोष्टींमध्ये संयमाने परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न करावा. जेणेकरून त्याचा फार त्रास होणार नाही, आपल्या रागावरती आपण जेवढे नियंत्रण ठेवाल तेवढे हे वर्ष आपणास सुखकारक जाईल. कोणताही निर्णय घेताना घाई गडबड करू नये. चार लोकांचा सल्ला घेऊनच निर्णय घ्यावा. व्यावसायिक लोकांसाठी येणारे वर्ष हे फारसे आर्थिक दृष्ट्या सुखकारक नसल्याने, व्यवसायामधील गुंतवणूक ही जेमतेम करावी. फार मोठी गुंतवणूक करणार असाल तर ती मार्चच्या पूर्वी करावी. मार्चनंतर फार मोठे आर्थिक निर्णय घेऊ नयेत. कारण, त्यामुळे आपणास अपेक्षित परतावा मिळण्याची शक्यता कमी राहील.
ही चूक करू नका, अन्यथा बसेल फटका! 7, 16 आणि 25 जन्म तारीख असणाऱ्यांना नवं वर्ष कसं असणार?
शैक्षणिक, आरोग्य परिस्थिती कशी असेल?
विद्यार्थी वर्गाने आपल्या अभ्यासाकडे लक्ष दिले पाहिजे, नाहीतर या शैक्षणिक वर्षात आपले नुकसान होऊ शकते. मी अभ्यास करतोय मला सगळे येते अशा भ्रमात राहू नये. ऐन परीक्षेच्या वेळेला आपणास काही गोष्टी आठवणार नाहीत. त्यामुळे केलेल्या अभ्यासाचे परिणाम अपेक्षित रित्या दिसणार नाहीत. त्यामुळे अभ्यासावरती आपले लक्ष केंद्रित करावे. येणारा काळ खेळाडूंसाठी चांगला आहे, महिला वर्गासाठी येणारे वर्ष थोडेसे आरोग्याच्या दृष्टीने काळजी करणारे असल्याने आपल्या आरोग्याबाबत आपण वेळीच योग्य ती काळजी घ्यावी. स्वयंपाक घरात वावरत असताना चाकू, सुरी तसेच ज्वलनशील पदार्थ (गॅस) काळजीपूर्वक हाताळाव्यात. त्यांच्यापासून इजा दुखापत होण्याची शक्यता अधिक आहे.
मेष राशीला येणारे वर्ष हे साडेसातीची सुरुवात करणार असल्याकारणाने साडेसाती पासून होणाऱ्या त्रासापासून वाचण्यासाठी या वर्षाच्या आरंभापासूनच काही उपाययोजना केलेल्या त्यांना फायदेशीर ठरतील. शनि हा मुळात कर्मफल असल्याकारणाने आपली कर्म दुसऱ्यांना त्रास होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कायदे व नियम यांचे उल्लंघन कोठेही होणार नाही याची देखील काळजी घ्यावी. छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे, वनवेमधून गाडी नेणे, नो पार्किंग मध्ये गाडी उभी करणे, विना तिकीट प्रवास करणे, या गोष्टी आपल्याला फारशा महत्त्वाच्या वाटत नाहीत. मात्र शनी या गोष्टींचा हिशोब ठेवतो व त्याचे फळ निश्चित स्वरूपात देतो. त्यामुळे या काळात आपल्याला होणाऱ्या त्रासाबद्दल इतरांना जबाबदार धरू नये. आपल्याच कर्माची फळे आहेत हे जाणून घ्यावे. आपल्याकडून चुका होऊ नयेत, झालेल्या चुकांचे मिळणाऱ्या फलाची तीव्रता कमी असावी.
मेष राशीच्या व्यक्तींनी कोणती उपासना करावी ?
मेष राशीच्या व्यक्तींनी दररोज सायंकाळी रामरक्षा स्तोत्र पठण करावे. दर मंगळवारी व शनिवारी मारुतीचे दर्शन घ्यावे, रुईच्या पानांचा हार व्हावा. रोज हनुमान चालीसा पठण करावे. मंगळवार, शनिवार मांसाहार व मद्यपान करणे टाळावे. नकारात्मक गोष्टींपासून लांब राहण्याचा प्रयत्न करावा. मग नकारात्मक लोक असतील किंवा नकारात्मक ठिकाणे असतील. आपल्यावर नकारात्मक गोष्टींचा प्रभाव पडू देऊ नये, ही काळजी जर आपण घेतली तर निश्चित स्वरूपात येणारे आगामी वर्ष आपणास फारसे त्रासदायक न जाता लाभदायक जाईल.
साडेसातीच्या काळात काय करावं?
मेष राशीच्या व्यक्तींना साडेसाती सुरू होणार आहे. दरम्यान साडेसातीच्या काळामध्ये अन्नदानाचा उपाय आपल्यासाठी जास्त परिणामकारक ठरेल. त्याकरता गोरगरिबांना व मुख्या जीवांना अन्नदान करावे. शक्यतो वडीलधाऱ्या व्यक्तींचा अपमान करू नये व नोकर वर्गाचा देखील अपमान करू नये. शनि हा सेवक आहे. सेवकाचा जर तुम्ही अपमान केलात तर त्याचा त्रास आपणास होऊ शकतो. मुक्या प्राण्यांना विनाकारण त्रास देऊ नये. आपण एखाद्याला मदत करत असताना त्याची प्रसिद्धी होणार नाही याची काळजी घ्यावी.
देवाचे फोटो मोबाईलमध्ये नको
एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण जर कुठे मंदिरात देवस्थान ठिकाणी जात असाल तर कृपया देवाचे फोटो आपल्या मोबाईल मध्ये ठेवू नयेत. कारण आपण आपले मोबाईल आपल्या खाजगी जीवनात कुठेही हाताळत असतो. त्यामुळे त्या देवतांची विटंबना होते व त्याचा त्रास आपल्याला आपल्या जीवनात बघावा लागतो. शिल्लक गोष्टी आहेत त्या गोष्टींचा आपण आपल्या दैनंदिन जीवनात विचार करीत नाही. मात्र त्याचा त्रास भोगावा लागतो. त्याकरता इतरांना जबाबदार ठरवणं योग्य ठरत नाही, असं देखील ज्योतिषी कदम यांनी सांगितलं.