मंगळवारचा दिवस चांगला जाणार आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल. भावांसोबत कोणत्याही विषयावर चर्चा करताना संयमाने वागा आणि कठोर शब्दाचा वापर टाळा, अन्यथा तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. कामांना गती मिळेल.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
त्रास सोसावे लागेल, दिवस चिंता वाढवणारा आहे. पैशाच्या बाबतीत समस्या उद्भवणार नाही. बऱ्याच दिवसापासून अडकलेले पैसे अचानक मिळू शकतात. त्रास-रागामुळे रक्तदाब वाढू शकतो. थोडा संयम बाळगा म्हणजे सर्वकाही ठीक होईल. भगवान शंकराची उपासना केल्यास नशिबाची साथ मिळेल.
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मंगळवारचा दिवस बरा असेल. लोकांना कोणत्याही प्रकारचे सल्ले देऊ नका, अन्यथा तुमचा सल्ला चुकीचा ठरेल. तुमचे प्रतिस्पर्धी तुम्हाला त्रास देतील. यावर उपाय म्हणून पत्नीच्या हाताने हळदीचा टिळा लावला तर फायदा होईल.
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मंगळवारचा दिवस चिंतेत असेल. तुम्हाला अचानक दुखापत होऊ शकते. तुमचे मन विचलित राहील. विशेष किंवा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल तर तो पुढे ढकला. घरी एखादी पूजा आयोजित केली तर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मंगळवारी या मूलांकाला नशिबाची उत्तम साथ मिळेल. तुम्ही जो विचार कराल तो पूर्णत्वास जाईल. रागावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्यांसोबत दिवस आनंदात जाईल. जोडीदाराला अचानक शारीरिक समस्या जाणवू शकते.
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मंगळवारचा दिवस सामान्य आहे. व्यवसायाशी संबंधित चिंता जाणवू शकते. तुमचे सहकारी तुम्हाला चुकीच्या गोष्टीसाठी भडकावू शकतात. पण तुम्हाला संयम ठेवावा लागेल. जर तुम्ही बहीण किंवा मुलीला एखादी भेटवस्तू दिली तर तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे दोघंही आनंदी व्हाल.
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मंगळवार दिवस अडथळे वाढवणारा आहे. अचानक दुखापत होऊ शकते. त्यामुळे वाहन जपून चालवा. रक्ताशी संबंधित आजार होऊ शकतो. येणारे पैसे अचानक अडकून राहतील. जोडीदार काही मुद्द्यांवरून तुमच्याशी वाद घालू शकतो. पण कुटुंबातील एकूण वातावरण प्रेमळ असेल.
मोबाईल नंबरच्या शेवटी हा क्रमांक असणं चंचलतेचं कारण? प्रगती साधतात पण...
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
कामात आज अडथळ्यांचा सामना करावा लागेल. दिवसाची सुरुवात चांगली होईल. पण दिवस जसजसा पुढे जाईल तशी चिंता वाढेल. आळस दूर करण्यासाठी सकाळी पाणी किंवा दूधात मध मिसळून प्या. त्यामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. वातावरण निराशाजनक असेल. त्यामुळे कुटुंबातील सदस्य तुमच्यावर नाराज होतील. अलर्ट रहा.
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
मंगळवारचा दिवस चांगला आहे. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून मनात असलेल्या चांगल्या कामाचा विचार करू शकता. काम होण्यासाठी प्रयत्न करा. घरातील वातावरण आनंददायी असेल. समस्यांवर उपाय म्हणून श्री हनुमानाला गोड सुपारी अर्पण करा. यामुळे चांगले लाभ होऊ शकतात.