मयूर आणि मृणाल यांनी सांगितलं की, त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण निगडीतील विद्यानंद भवन शाळेत झालं. त्यानंतर बी.एम.सी.सी. महाविद्यालयातून बारावीपर्यंत वाणिज्य शाखेचं शिक्षण पूर्ण केलं. बारावीला प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील एम.एम.सी.सी. महाविद्यालयात बी.कॉमसाठी प्रवेश घेतला. सीए परीक्षेत यश मिळवण्यासाठी दोघांनी नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण अभ्यास केला.
टाकाऊ प्लास्टिकपासून पैशाची निर्मिती, वर्षाला दीड कोटींची कमाई, नंदन यांचा बिझनेस फॅार्म्युला!
advertisement
मयूर आणि मृणाल यांचे वडील अनिल सावंत हे पुण्यातील फिनोलेक्स कंपनीत जॉब करत असून आई गृहिणी आहेत. अभ्यासाच्या प्रवासात पालकांनी आम्हाला नेहमी प्रोत्साहन दिलं, आत्मविश्वास वाढवला आणि अडचणीच्या काळात मानसिक आधार दिला. तसेच घरात नेहमी सकारात्मक वातावरण राखल्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करणं सोपं झालं, त्यामुळे आम्ही CA परीक्षेत यश मिळवलं, असं मयूर आणि मृणाल यांनी सांगितलं.





