सोमवारचा दिवस चांगला असेल, खूप सकारात्मक आणि ऊर्जावान वाटेल. वागण्या-बोलण्यात आज कणखरपणा असेल. त्यामुळे इतर लोक फिके वाटतील. शक्यतो गरज असेल तेव्हाच बोला. अन्यथा विनाकारण वाद उद्भवतील. रागावर नियंत्रण ठेवा. सूर्याला अर्घ्य देऊन दिवस सुरू करा.
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
advertisement
आज सोमवारी उत्साह वाटेल. कारण आज अपेक्षित आदर आणि पैसे मिळतील. सरकारी विभागाकडून काही प्रकारचे पैसे मिळवण्यासाठी नियोजन केलं जाईल. आईचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल, विकास होईल. पोटाशी निगडित समस्या उद्भवू शकतील. आरोग्याची पूर्ण काळजी घ्या.
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज सोमवारचा दिवस चांगला असेल. घरात काही धार्मिक कार्याचं नियोजन कराल. कोणतंही काम खूप चर्चा करूनच कराल. संशोधनात सहभागी व्हायचं असल्यास आज संधी मिळेल. आज सरकारी कामासाठी अर्ज केल्यास इच्छा पूर्ण होऊ शकेल.
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारी कार्यक्षेत्रात प्रगती होईल. आठवड्याच्या सुरुवातीला चांगले परिणाम मिळतील. परस्परांबद्दलचं प्रेम रिलेशनशिपमध्ये वाढेल. लव्ह लाइफमध्ये रोमँटिक वेळ व्यतीत कराल. आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती तयार केली जात आहे. आर्थिक लाभाच्या चांगल्या शक्यता आहेत. अंतःप्रेरणेचं ऐकून गुंतवणूक केलीत, तर आर्थिक लाभ मिळतील.
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारचा दिवस चांगला असेल. कोणी अनपेक्षित व्यक्ती बिझनेसमध्ये मदत करील. बुद्धिमत्तेतल्या तीव्रतेमुळे तुम्ही सर्वसामान्य व्यक्तींपेक्षा वेगळे ठरता. पैसे मिळवण्याच्या खूप प्रभावी मार्गांचा आज विचार करू शकता. नशिबावर पूर्ण विश्वास असेल; पण तुम्ही तुमच्या पूर्ण शक्तीने काम कराल. स्टॉक मार्केटमध्येही गुंतवणूक करू शकाल.
भाग्योदय दूर नाही! दसऱ्यापासून पालटणार या राशींचे नशीब; डिप्रेशन झटक्यात जाणार
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
खाण्या-पिण्याची काळजी घ्यावी अन्यथा दिवसभर पोटाची समस्या उद्भवेल. खासकरून ती एखाद्या सरकारी खात्याशी निगडित असली, तर अशा व्यक्तीशी आज वाद घालू नये. पार्टनरशिपमध्ये काही काम करायचं असेल, तर आज सुरू करणं फायद्याचं ठरेल. दीर्घ काळ काही अडथळे येणार नाहीत.
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
आज सोमवारचा दिवस काहीसा चिंतेचा असेल. दिवसभर कोणत्या तरी समस्येमुळे चिंतेत राहाल. आज वडिलांच्या शब्दांमुळे दुखावले जाऊ शकाल. त्यामुळे निराश वाटू शकेल. कामात अडचणी येतील. आईच्या प्रकृतीची समस्या उद्भवेल. त्यामुळे मानसिक ताण आणखी वाढेल.
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
विविध कामांसाठी सोमवारचा दिवस लकी नाही, त्यामुळे आज महत्त्वाच्या कामांबद्दलचे निर्णय घेणं टाळा. आज भौतिक सुखांमध्ये स्थैर्य मिळेल. आज मानसिक ताण खूप असेल. एखाद्या सरकारी समस्येत अडकाल. त्यामुळे प्रत्येक निर्णय काळजीपूर्वक घ्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ विनाकारण समस्या निर्माण करू शकतात.
सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; आनंदी-आनंद, लॉस भरणार?
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)
सोमवारी कामात विघ्न येऊ शकते. रागावर पूर्ण नियंत्रण असायला हवं. आज आर्थिक व्यवस्थापन चांगलं असेल. भावांशी वाद होऊ शकतात. त्यांच्याशी बोलल्यास शांतपणे बोला. अन्यथा नात्यांवर परिणाम होऊ शकतो. आज प्रॉपर्टीबद्दल चर्चा होऊ शकते. आज घाईत कोणतंही काम करू नका. कोणतंही काम विचारपूर्वकच करा.