पापांकुशा एकादशी - वैदिक कॅलेंडरनुसार, आश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:11 वाजता सुरू होते. ती 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6:31 वाजता संपेल. पापांकुशा एकादशीचं व्रत 3 ऑक्टोबर रोजी पाळलं जाईल. पापांकुशा एकादशीला सर्वार्थ सिद्धी आणि रवि योग तयार होत आहेत. या योगांमध्ये पूजा केल्याने दुप्पट लाभ होतो. विष्णू कृपा मिळते.
advertisement
पापांकुशा एकादशीचं महत्त्व - पापांकुशा एकादशीला भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा केल्यानं भक्ताला सर्व पापांपासून मुक्ती मिळते. त्यामुळे जीवनात सुख आणि शांती देखील मिळते. या व्रतामुळे मृत्यूंच भय आणि नरक लोक मिळण्याच्या भीतीपासूनही मुक्ती मिळते आणि भाविकांना मोक्ष मिळतो.
रमा एकादशी कधी?
ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 10:34 वाजता सुरू होईल. दुसऱ्या दिवशी, 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11:11 वाजता ती संपेल. दिनदर्शिकेनुसार, रमा एकादशीचं व्रत 17 ऑक्टोबर रोजी पाळलं जाईल.
रमा एकादशी शुभ मुहूर्त 2025 - रमा एकादशीला अभिजित मुहूर्त सकाळी 11:43 वाजता सुरू होईल आणि दुपारी 12:29 पर्यंत असेल. याकाळात तुम्ही भगवान विष्णूची पूजा करू शकता.
रमा एकादशीचं महत्त्व - रमा एकादशीला विशेष धार्मिक महत्त्व आहे. हे व्रत केल्यानं सर्व पापांचा नाश होतो, घरात सुख-समृद्धी येते आणि धन-धान्याचा अभाव दूर होतो. हे व्रत केल्यानं व्यक्तीच्या जीवनात आनंद येतो आणि आध्यात्मिक प्रगती होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
घटस्थापनेपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीफळ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)