देवगण, मनुष्य गण आणि राक्षस गण हे 3 गण आहेत. राक्षस गण आहे म्हटल्यावर अनेकाच्या मनात भीती येते, किंवा राक्षसी प्रतिमा निर्माण होते. पण तसं असतंच असं नाही, देव गण हा तीन गणांमध्ये श्रेष्ठ मानला जातो, पण तिन्ही गणांचे स्वतःची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. गणानुसार व्यक्तीमध्ये कोणते गुण-दोष आढळतात.
गण प्रकार आणि वैशिष्ट्य -
advertisement
देव गण : ज्योतिषांच्या मते देव गणाचे लोक सर्वोत्तम मानले जातात. या लोकांमध्ये देवांच्या प्रती गुण असतात. हे लोक चांगले वागणारे, प्रामाणिक, चारित्र्यसंपन्न, सुसंस्कृत, कोमल मनाचे, दयाळू, बुद्धिमान आणि अतिशय सकारात्मक विचारसरणीचे असतात. हे लोकं धर्माकडे खूप लक्ष देतात आणि परोपकारावरही विश्वास ठेवतात. हे लोकं नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे असतात.
मनुष्य गण : ज्योतिषशास्त्रानुसार, मानव गणाची लोकं मेहनती मानली जातात. ते त्यांच्या मेहनतीच्या जोरावर प्रगती करतात आणि भरपूर पैसा कमावतात. जीवनात सन्मान मिळवतात. हे लोकं अतिशय काळजीपूर्वक कार्य करतात.
साध्या गोष्टीवरही एकमत होणं मुश्कील! या जन्मतारखांची जोडी सहजीवनात 'जेमतेम'
राक्षस गण : राक्षस गणाचे लोक नकारात्मक विचारांचे असू शकतात. पण त्यांनी प्रयत्न केल्यास ते स्वतःला सकारात्मक बनवू शकतात. राक्षस गणाच्या लोकांचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यांना नकारात्मक गोष्टी आणि घटना लवकर कळतात. निर्भय आणि धैर्यवान असल्याने ते प्रत्येक प्रसंगाला धैर्याने सामोरे जातात. हे लोकं स्पष्ट आणि कडवट बोलतात.
ज्योतिषांच्या मते, देव आणि राक्षस गणाच्या लोकांनी एकमेकांशी लग्न करू नये. कारण या दोघांच्या स्वभावात खूप फरक आहे. त्यामुळे त्यांच्या सहजीवनात स्थिरता येत नाही. देव गणाच्या लोकांसाठी मनुष्य गणाचा जीवनसाथी सर्वोत्तम असतो. तर मानव गणाचे लोकं देव आणि राक्षस या दोघांशी विवाह करू शकतात.
त्रास खूप सोसला! संकटांचे डोंगर आता दूर होणार; या राशींच्या नशिबी अनपेक्षित लाभ
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)