Rashi Bhavishya, 15 Jan 2025: त्रास खूप सोसला! संकटांचे डोंगर आता दूर होणार; या राशींच्या नशिबी अनपेक्षित लाभ
- Published by:Ramesh Patil
- trending desk
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Daily Horoscope, Aajche Rashi Bhavishya, January 14, 2025 By Chirag Daruwalla: ग्रहांची गती आणि नक्षत्रांची स्थिती यांच्या आधारे सर्व राशींचं दैनिक राशिभविष्य सांगितलं जातं. ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून ते जाणून घेऊया.
मेष (Aries) : आज भवताली सकारात्मकता जाणवल्याने आत्मविश्वास जाणवेल. कामाच्या ठिकाणी नव्या कल्पना लागू करण्याची संधी मिळेल आणि भागीदारीत व्यवसाय करत असाल तर ही भागीदारी फलदायी ठरेल. कुटुंबियांबरोबर वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग, व्यायाम करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. गुंतवणुकीबाबतचा निर्णय विचारपूर्वक घ्या. आजचा दिवस संधी देणारा आहे त्या स्वीकारून ध्येयाच्या दिशेने वाटचाल करा.
Lucky Color : Pink
Lucky Number : 14
Lucky Color : Pink
Lucky Number : 14
advertisement
वृषभ (Taurus) : खासगी आयुष्य आणि करिअरमध्ये समतोल साधाल. तुमचे कष्ट फलदायी होण्याचा काळा आलाय धीर धरा. कुटुंबीय मदत करतील ती घ्यायला कचरू नका. नात्यांत स्पष्ट बोलायला घाबरू नका तसं केल्याने नाती दृढ होतील. व्यायाम करा आणि आहार सांभाळा. आर्थिक निर्णय घेताना सावध रहा. आजचा दिवस सकारात्मकता आणि संधींचा आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल करा.
Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 12
Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 12
advertisement
मिथुन (Gemini) : तुमचं बोलणं आणि बुद्धिचातुर्य आज मदत करेल. तुम्ही मांडलेल्या कल्पनांमुळे सार्वजनिक आयुष्य अधिक चांगलं जगता येईल. मित्रमैत्रिणींबरोबर वेळ घालवताना कल्पनांच्या आदान-प्रदानाचा उपयोग होईल. व्यवसायात नवी प्रोजेक्ट्स सुरू करायला योग्य वेळ आहे. तरीही वैचारिक भूमिका सांभाळून मांडा काहींचे मतभेद असू शकतात. त्यामुळे इतरांचं म्हणणं ऐकून घ्या. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. ध्यान करा. जीवनात समतोल राखा.
Lucky Color : Dark Green
Lucky Number : 1
Lucky Color : Dark Green
Lucky Number : 1
advertisement
कर्क (Cancer) : आज कुटुंबीय आणि मित्रांबाबत तुम्हाला आपुलकी वाटेल. नाती दृढ होतील. तुम्हाला एक विशेष आत्मविश्वास आल्याचं जाणवेल त्याच्या बळावर तुम्ही बरीच अवघड कामं सहज साध्य कराल. ऑफिसातल्या महत्त्वाच्या बैठकीत तुमच्या कल्पनांचं कौतुक होईल त्यामुळे तुमचा करिअरमधील पुढचा प्रवास सुकर व्हायला मदत होईल. मानसिक आरोग्यासाठी ध्यान, योग करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. आजचा दिवस तुमच्यासाठी समतोल आणि सकारात्मक अनुभव घेऊन येईल.
Lucky Color : Maroon
Lucky Number : 11
Lucky Color : Maroon
Lucky Number : 11
advertisement
सिंह (Leo) : तुमच्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. तुम्ही कामावर लक्ष केंद्रीत केल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. करिअरमध्ये नवी संधी मिळू शकते. वैयक्तिक आयुष्यात बदल संभवतात. जवळच्या व्यक्तींबरोबर वेळ व्यतीत करण्याची सुवर्णसंधी आज मिळू शकते. दैनंदिन व्यायाम आणि आहारावर लक्ष दिल्यास आरोग्य उत्तम राहील. आजचा आर्थिक निर्णय भविष्यासाठी उपयोगी ठरेल. हुशारीने गुंतवणूक करा आणि अनावश्यक खर्च टाळा. इतरांच्या कठीण काळात त्यांचं ऐकून घ्या. तुमच्या सकारात्मकतेमुळे नाती दृढ होतील.
Lucky Color : Blue
Lucky Number : 10
Lucky Color : Blue
Lucky Number : 10
advertisement
कन्या (Virgo) : नवी ऊर्जा आणि प्रेरणा या बळावर तुमचं नियोजन यशस्वी करून दाखवाल. मन स्थिर ठेवल्यास प्रश्नांची उत्तरं मिळतील. एखाद्या महत्त्वाच्या विषयाबद्दल आज कुटुंबाशी बोला जेणेकरून भविष्यात त्यांची समज वाढेल. जोडीदाराबरोबर वेळ घालवल्याने तुम्ही अधिक जवळ याल. आरोग्याची काळजी घ्या. विचारशक्ती वाढवणारी माहितीपर पुस्तकं वाचा. विचार स्पष्ट ठेवल्यास समोर येणाऱ्या आव्हानांत अधिक चांगलं काम करू शकाल. सर्वच बाबतींत समतोल राखा.
Lucky Color : White
Lucky Number : 8
Lucky Color : White
Lucky Number : 8
advertisement
तूळ (Libra) : सार्वजनिक आयुष्यात नवा उत्साह जाणवेल त्यामुळे तुमची क्रिएटिव्हिटी अधिक प्रमोट कराल. लोकांनी भेटण्याची संधी नव्या दिशेने मार्ग दाखवेल तयार रहा. तुमचं नेतृत्वकौशल्य तपासणारं प्रोजेक्ट मिळेल. तुमची समज वाढवा त्याने यश मिळेल. खासगी आयुष्यातील अल्पसंवाद अडचणी निर्माण करू शकतो. जोडीदाराशी मोकळेपणाने संवादाची गरज आहे. प्रामाणिकपणे भावना मांडायची ही वेळ आहे. मानसिक आरोग्य सांभाळा. आयुष्यातील नवी सकारात्मक वाट सुरू होणार आहे सज्ज रहा.
Lucky Color : Black
Lucky Number : 7
Lucky Color : Black
Lucky Number : 7
advertisement
वृश्चिक (Scorpio) : तुमच्या वागण्यातला ठेहराव आणि संवेदनशीलता यामुळे तुम्ही नवी उत्तम नाती निर्माण करणार आहात. तुमच्याकडे आंतरिक बळ आहे त्यामुळे तुम्ही आव्हानांचा सामना करू शकता. करिअरमध्ये नव्या प्रकल्पावर काम करत असाल तर सावधगिरी बाळगा. सहकाऱ्यांशी स्पष्ट संवाद राखणं हिताचं ठरेल. अचानक खर्च उद्भवतील त्यामुळे आर्थिक बाबीत सांभाळून रहा. अंतर्मनात खोलवर असलेल्या विचारांवर विश्वास ठेवून नव्या दिशेने पाऊल टाका. आज विश्रांती घेणं गरजेचं आहे. योग, प्राणायामामुळे मानसिक शांतता आणि ऊर्जेचं पुनर्भरण होईल. स्वत: ला जाणून घेऊन नव्या दिशेने जाण्याचा दिवस आहे.
Lucky Color : Orange
Lucky Number : 6
Lucky Color : Orange
Lucky Number : 6
advertisement
धनू (Sagittarius) : विचारांतील स्पष्टता मांडण्याची आज संधी मिळेल तिचा फायदा घेऊन ध्येयाच्या दिशेने मार्गक्रमण करा. कुटुंबियांबरोबर वेळ घालवायला प्राधान्य द्या. उद्योगात तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल. नवा प्रकल्प सुरू करायला योग्य वेळ आहे. मानसिक शारीरिक आरोग्याचा तोल सांभाळण्यासाठी योग, ध्यान करा. खर्चावर नियंत्रण ठेवा. आर्थिक निर्णय जपून घ्या. एखाद्या विशेष व्यक्तीशी संवाद साधून मनावरचा भार हलका झाल्यासारखं वाटेल. सकारात्मकतेच्या दिशेने जाऊन तुमची ध्येय साध्य करा.
Lucky Color : Purple
Lucky Number : 3
Lucky Color : Purple
Lucky Number : 3
advertisement
मकर (Capricorn) : कष्टांची फळं हळूहळू मिळायला लागल्याने आत्मविश्वास वाढेल. ऑफिसातल्या सहकाऱ्यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरेल. खासगी आयुष्यातील काही बदलांमुळे घरातील आनंद भरून राहील. आरोग्याची काळजी घ्या. सध्या अंतर्ज्ञान आणि निर्णय क्षमता यांची परीक्षा आहे त्यामुळे मनाच्या आवाजावर विश्वास ठेवा. संध्याकाळ कुटुंबियांबरोबर घालवल्यास नाती दृढ होतील. ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट करा त्यातून समाधान आणि प्रगती दोन्ही मिळू शकेल.
Lucky Color : Red
Lucky Number : 9
Lucky Color : Red
Lucky Number : 9
advertisement
कुंभ (Aquarius) : अनेक अचंबित करणाऱ्या शक्यता तुमची वाट पाहत आहेत. प्रेरित होऊन आपले विचार मांडाल. मित्रमंडळी आणि जवळच्या व्यक्तींशी संवाद वाढवा. आज क्रिएटिव्हीटी उच्चीवर असेल. तणावापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. स्वत: साठी वेळ काढा. आर्थिक बाबीत जागरूक रहा. अनपेक्षित खर्च उद्भवतील सांभाळून खर्च करा. कष्टाची फळं मिळतील धीर धरा. प्रेमिका किंवा जोडीदाराशी संवाद साधा नातं दृढं होईल.
Lucky Color : Dark Blue
Lucky Number : 10
Lucky Color : Dark Blue
Lucky Number : 10
advertisement
मीन (Pisces) : मित्र आणि कुटुंबियांबरोबर वेळ घालवावासा वाटेल. नाती दृढ करण्याचा काळ आहे. तुमच्या संवेदनशील स्वभावामुळे इतरांच्या गरजा तुम्हाला कळतील आणि तुम्ही अधिक चांगला पाठिंबा देऊ शकाल. एखाद्या विशेष व्यक्तीबद्दल ओढ वाटेल ज्यातून आनंद आणि समाधान मिळेल. करिअरमध्ये आव्हानांचा सामना करावा लागेल पण तुमची क्रिएटिव्हिटी आणि कल्पनाशक्ती त्यातून मार्ग काढतील. तुमचं मोलाचं अंतर्ज्ञान तुम्हाला प्रचंड मोठ्या संधी मिळवून देऊ शकतं हे विसरू नका. ध्यान करा.
Lucky Color : Yellow
Lucky Number : 16
Lucky Color : Yellow
Lucky Number : 16