advertisement

Pune Fraud: ती लग्नासाठी जोडीदार शोधत होती अन् 'तो' भेटला; आदर्शनं 14 महिने पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं, शेवटी घडलं धक्कादायक

Last Updated:

त्याने पीडित महिलेला आयसीआयसीआय बँकेतून 'प्री-अप्रूव्हड' लोन, ओव्हरड्राफ्ट सॅलरी लोन आणि अन्य ऑनलाइन ॲप्सद्वारे कर्ज घेण्यास भाग पाडले

पुण्याच्या महिलेची मोठी फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
पुण्याच्या महिलेची मोठी फसवणूक (प्रतिकात्मक फोटो)
पिंपरी-चिंचवड: लग्नासाठी आपल्याला चांगला आणि प्रामाणिक जोडीदार मिळावा, अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. अनेक लोक ऑनलाईन साईट्सवरून आपला जोडीदार शोधतात. मात्र, या प्रक्रियेत नवी ओळख झालेल्या व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवणं कधीकधी घातक ठरू शकतं. याचाच प्रत्यय देणारी एक घटना समोर आली आहे. यात मॅट्रिमोनिअल ॲपवर जोडीदार शोधणं एका महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. 'शादी डॉट कॉम'वर (Shaadi.com) ओळख झालेल्या एका भामट्याने लग्नाचं खोटं आमिष दाखवून महिलेची तब्बल ३१ लाख २० हजार २५७ रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकाराने सायबर क्राईमच्या विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
आधी ओळख, मग लूट
पीडित महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ही घटना २३ डिसेंबर २०२४ ते २१ फेब्रुवारी २०२६ या काळात चिंचवड येथे घडली. आरोपी जयेश पाटील ऊर्फ आदर्श प्रशांत म्हात्रे (रा. लोअर परेल, मुंबई व अलिबाग) याने मॅट्रिमोनिअल ॲपवर महिलेशी मैत्री केली. लग्नाचे स्वप्न दाखवून हळूहळू तिचा विश्वास संपादन केला.
advertisement
आरोपीने अत्यंत धूर्तपणे महिलेला वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे मागण्यास सुरुवात केली. इतकेच नाही, तर त्याने पीडित महिलेला आयसीआयसीआय बँकेतून 'प्री-अप्रूव्हड' लोन, ओव्हरड्राफ्ट सॅलरी लोन आणि अन्य ऑनलाइन ॲप्सद्वारे कर्ज घेण्यास भाग पाडले. ही सर्व रक्कम त्याने स्वतःच्या फायद्यासाठी उकळली आणि त्यानंतर महिलेला वाऱ्यावर सोडून दिले.
advertisement
जेव्हा महिलेला आपली मोठी फसवणूक झाल्याचे लक्षात आले, तेव्हा तिने चिंचवड पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी आरोपी म्हात्रेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या तो मुंबई व रायगड परिसरात फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. ऑनलाइन मैत्री करताना अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवणे किती घातक ठरू शकते, याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune Fraud: ती लग्नासाठी जोडीदार शोधत होती अन् 'तो' भेटला; आदर्शनं 14 महिने पुण्याच्या महिलेसोबत नको ते केलं, शेवटी घडलं धक्कादायक
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement