TRENDING:

Pradosh Vrat 2026: हर-हर महादेव! मार्च महिन्याची सुरुवात शंकराच्या खास पूजेने होणार; रविप्रदोषाचा शुभ संयोग

Last Updated:

Pradosh Vrat 2026: प्रत्येक महिन्यातील दोन्ही पक्षांतील त्रयोदशीला आपण प्रदोष म्हणतो. या दिवशी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी महादेवाची पूजा करण्याची पद्धत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : हिंदू धर्म आणि पुराणांमध्ये प्रदोष व्रताचं खूप मोठं महत्त्व सांगितलं आहे. आपल्याकडे महाराष्ट्रात महादेवाच्या भक्तांसाठी प्रदोष पाळणं हे खूप भाग्याचं मानलं जातं. असं म्हणतात की, हे व्रत केल्याने आरोग्य चांगलं राहतं आणि आयुष्य वाढतं. प्रत्येक महिन्यातील दोन्ही पक्षांतील त्रयोदशीला आपण प्रदोष म्हणतो. या दिवशी प्रदोष काळात म्हणजे संध्याकाळी महादेवाची पूजा करण्याची पद्धत आहे.
News18
News18
advertisement

प्रदोष व्रत 2026 तारीख आणि मुहूर्त -

प्रदोष व्रत - 1 मार्च 2026, रविवार (रवि प्रदोष)

प्रदोष पूजा मुहूर्त - संध्याकाळी 06:21 ते रात्री 07:09 पर्यंत

त्रयोदशी तिथी सुरू - 28 फेब्रुवारी 2026, रात्री 08:43 वाजता

त्रयोदशी तिथी समाप्त - 1 मार्च 2026, रात्री 07:09 वाजता

प्रदोष व्रताचे महत्त्व - धार्मिक मान्यतेनुसार, प्रदोषाचा उपवास केल्याने समाजात मान-सन्मान मिळतो आणि शरीराला व्याधींपासून मुक्ती मिळते. रविवारी प्रदोष आल्यामुळे याला रवि प्रदोष म्हणतात, जो आरोग्यासाठी आणि आत्मविश्वासासाठी खूप गुणकारी मानला जातो. ज्यांना मनासारखी नोकरी हवी आहे किंवा ज्यांचा आत्मविश्वास थोडा कमी आहे, त्यांच्यासाठी हे व्रत खूप लाभदायक ठरतं.

advertisement

होळी-धूलिवंदनला नशीब जोमात! शुभ राजयोग या 4 राशींना आनंदाची बातमी देणार

पूजा विधी महाराष्ट्रातील पद्धतीनुसार - प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. त्यानंतर घरातील महादेवाच्या फोटोची किंवा शिवलिंगाची मनोभावे पूजा करावी. पूजेमध्ये बेलपत्र, धतूरा, पांढरी फुलं, अक्षता, चंदन आणि भस्म आवर्जून वापरा. महादेवाला अभिषेक करण्यासाठी पंचामृत किंवा नुसतं गंगाजल वापरलं तरी चालतं. पूजेच्या वेळी ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा आणि शिवलीलामृत पोथीतील अकरावा अध्याय वाचल्यास उत्तम फळ मिळतं. शेवटी शिवाची आरती करून नैवेद्य दाखवावा. या दिवशी गरिबांना किंवा गरजूला शक्य असेल तर अन्नदान करा, त्याने पुण्याची प्राप्ती होते.

advertisement

होळीनंतर उरलेली राख फेकू नका; इतक्या कामांसाठी केलेला वापर शुभफळदायी

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
नोकरी सोडली अन् ‘मायमराठी’च्या सेवेत हजर, पुणेकराचं काम पाहाल, तर सलाम कराल, Vid
सर्व पहा

महादेवाच्या उपासनेसाठी सर्वात प्रभावी आणि लोकप्रिय मंत्र म्हणजे ॐ नमः शिवाय हा पंचक्षरी मंत्र आहे, ज्याचा जप केल्याने मनाला शांती लाभते. यासोबतच मृत्यूवर विजय मिळवून देणारा आणि संकटातून रक्षण करणारा महामृत्युंजय मंत्र म्हणजे ॐ त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनान्मृत्योर्मुक्षीय माऽमृतात् हा अतिशय शक्तिशाली मानला जातो. जर तुम्हाला भीती वाटत असेल तर ॐ नमो भगवते रुद्राय या रुद्र मंत्राचा उच्चार करावा. तसेच ध्यानधारणेसाठी ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्रः प्रचोदयात् हा शिव गायत्री मंत्र उत्तम आहे. हे सर्व मंत्र पूर्ण श्रद्धेने म्हटल्यास महादेवाची कृपा प्राप्त होते आणि घरातील नकारात्मकता दूर होते.

advertisement

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Pradosh Vrat 2026: हर-हर महादेव! मार्च महिन्याची सुरुवात शंकराच्या खास पूजेने होणार; रविप्रदोषाचा शुभ संयोग
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल