18 वर्षांनंतर शतभिषा नक्षत्रात राहूचे स्पष्ट संक्रमण
पंचांगानुसार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी राहूचा शतभिषा नक्षत्रात प्रवेश झाला. मात्र त्याचे स्पष्ट संक्रमण 2 डिसेंबर रोजी रात्री 2:11 वाजता घडत आहे. राहू हा या नक्षत्राचा स्वामी असल्याने या संक्रमणाची परिणामकारकता अधिक शक्तिशाली मानली जाते. राहू साधारण 8 महिने एका नक्षत्रात थांबतो. त्यामुळे राहू 2 ऑगस्ट 2026 पर्यंत शतभिषा नक्षत्रात राहील. ज्योतिष गणनेनुसार, या काळात सात राशींच्या जीवनात मोठे आणि सकारात्मक बदल घडण्याची चिन्हे दिसत आहेत.
advertisement
मेष
या संक्रमणाचा मेष राशीला मोठा लाभ मिळणार आहे. आर्थिक स्थितीत वाढ होईल. कामात वेग आणि जोश वाढेल. नवे प्रकल्प यशस्वी होतील. करिअरमध्ये अडलेले काम पुढे सरकेल. नवी व्यावसायिक संधी मिळू शकते. अचानक प्रवास होऊन फायदा होण्याचीही शक्यता आहे. समाजात प्रतिष्ठा वाढेल.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रगतीचा आणि मानसिक शक्ती वाढविण्याचा आहे. जुन्या योजनांना गती मिळेल. सर्जनशील क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा अत्यंत शुभ काळ ठरेल. अभ्यास, लेखन, मीडिया, कला अशा क्षेत्रातील लोकांना विशेष यश मिळेल. प्रभावशाली लोकांशी नवे संपर्क होतील.
सिंह
सिंह राशीसाठी राहूचे संक्रमण भाग्योदय घडवणारे आहे. करिअरमध्ये मोठे बदल घडू शकतात. नवी नोकरी किंवा पदोन्नती मिळण्याची शक्यता. आर्थिक लाभ वाढतील. परदेशात संधी मिळू शकते. कुटुंबात मान-सन्मान वाढेल. समाजात तुमचे महत्त्व अधिक जाणवेल.
कन्या
कन्या राशीसाठी हा काळ निर्णयक्षमता वाढवणारा. चांगल्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. नोकरीतील अडथळे दूर होतील. जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडता येतील. नवे प्रकल्प सुरू करण्यासाठी योग्य काळ. आरोग्य सुधारेल आणि मानसिक स्थैर्य मिळेल.
धनु
धनु राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो. अचानक पैसा मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये मोठे बदल घडतील. मोठ्या प्रकल्पांना गती मिळेल. व्यावसायिकांना नवे व्यवहार मिळतील. लोकप्रियता वाढेल. तुमचे निर्णय योग्य ठरतील.
मकर
मकर राशीसाठी हे राहू संक्रमण प्रगती आणि प्रतिष्ठा वाढवणारे आहे. कार्यस्थळी तुमचे प्रभाव वाढेल. नेतृत्वाची संधी मिळेल. व्यावसायिकांसाठी नवे करार आणि भागीदाऱ्या फायदेशीर ठरतील. घरातील वातावरणही सकारात्मक राहील.
मीन
मीन राशीसाठी राहूचा प्रभाव सर्वात सौम्य आणि अत्यंत अनुकूल मानला जातो. अनेक जुन्या अडचणी संपतील. प्रलंबित कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभाच्या संधी निर्माण होतील. प्रवास, शिक्षण, स्पर्धा परीक्षा या क्षेत्रात यश मिळेल. नातेसंबंध अधिक सुसंवादी राहतील.
(सदर बातमी फक्त माहितीकरिता असून न्यूज 18 मराठी कुठलाही दावा करत नाही)
