रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करते. या प्रार्थनेच्या बदल्यात, भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो आणि प्रेमाचे प्रतीक म्हणून तिला भेटवस्तू देतो. ही भेटवस्तू केवळ एक वस्तू नसून, ते भाऊ-बहिणीच्या अतूट नात्याचे आणि भावाने दिलेल्या वचनाचे प्रतीक असते.
advertisement
रक्षाबंधन हा एक पारंपारिक सण असल्यानं त्यादिवशी भेटवस्तू म्हणून दिल्या जाणाऱ्या साडीसाठी काही रंग खूप शुभ मानले जातात.
फिकट हिरवा (Mint Green): हा रंग सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे आणि तो खूप आकर्षक दिसतो.
लाल - लाल रंग उत्साह, प्रेम आणि मांगल्याचे प्रतीक आहे. सण-समारंभासाठी हा रंग नेहमीच उत्तम मानला जातो.
पिवळा - पिवळा रंग आनंद, ऊर्जा आणि सौभाग्याचे प्रतीक आहे. हा रंग सकारात्मकता दर्शवतो आणि तो सणाच्या दिवसासाठी खूप छान दिसतो.
केशरी आणि गुलाबी: हे दोन्ही रंग आनंद आणि उत्साहाचे प्रतीक आहेत. हे रंग पारंपरिक असूनही आधुनिक वाटतात.
जर तुमची बहीण नवीन रंगांच्या साड्या पसंत करत असेल, तर तुम्ही हे रंग विचारात घेऊ शकता:
फिकट निळा - हा रंग डोळ्यांना शांत वाटतो आणि साडीवर खूप सुंदर दिसतो.
फिकट जांभळा (Lavender/Lilac): हा रंगही सणांमध्ये खास आणि सध्या खूप लोकप्रिय आहे.
पीच : हा रंग साधेपणा आणि सौम्य सौंदर्य दर्शवतो, शिवाय साडी दिवसभर घालण्यासाठी आरामदायक असतो.
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या बहिणीला कोणता रंग आवडतो किंवा तिच्याकडे कोणत्या रंगाच्या साड्या नाहीत, हेही लक्षात घ्या. तिच्या आवडीचा रंग निवडल्यास ती साडी तिच्यासाठी अजून खास ठरेल. तिच्या आवडीचा रंग, तिचे व्यक्तिमत्त्व आणि ती सहसा कोणते रंग घालते याचा विचार करून तुम्ही योग्य निवड करू शकता.
बहिणीसाठी भेटवस्तूंच्या काही आयडिया -
दागिने: भेट म्हणून सोन्या-चांदीचे दागिने किंवा आधुनिक डिझाइनचे फॅन्सी दागिने हा देखील चांगला पर्याय आहे.
रोख रक्कम: अनेक बहिणींना त्यांच्या आवडीनुसार वस्तू खरेदी करण्यासाठी रोख रक्कम देणे अनेकांना योग्य वाटतं.
श्रावण पौर्णिमा दुपारी दीड वाजेपर्यंतच! राखी नेमकी कधी बांधणं शुभ? सायंकाळी जर..
आधुनिक आणि उपयुक्त भेटवस्तू:
गॅजेट्स: आजच्या युगाची गरज बनलेल्या गोष्टी म्हणजे स्मार्टफोन, स्मार्टवॉच, हेडफोन्स किंवा पॉवर बँक यांसारखे गॅजेट्स तुम्ही भेट देऊ शकता.
लेदर बॅग किंवा वॉलेट: स्टायलिश आणि उपयुक्त असलेली हँडबॅग किंवा वॉलेट हा एक चांगला पर्याय आहे.
मेकअप किंवा स्किनकेअर किट: जर तुमच्या बहिणीला मेकअप किंवा स्किनकेअरची आवड असेल, तर चांगल्या ब्रँडचे प्रॉडक्ट्स असलेले किट तुम्ही देऊ शकता.
स्पा किंवा शॉपिंगचे वाउचर: तिला तिच्या आवडत्या स्पा सेंटर किंवा कपड्यांच्या दुकानाचे गिफ्ट वाउचर देऊन तुम्ही तिला एक आनंददायी अनुभव देऊ शकता.
पुस्तकं: जर तुमच्या बहिणीला वाचनाची आवड असेल, तर तिच्या आवडत्या लेखकाची पुस्तके किंवा एखादे ई-रीडर (Kindle) देऊ शकता.
