Raksha Bandhan 2025: श्रावण पौर्णिमा दुपारी दीड वाजेपर्यंतच! राखी नेमकी कधी बांधणं शुभ? सायंकाळच्या पर्यंत...
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Raksha Bandhan 2025: भारतीय सामाजिक व्यवस्थेचं वेगळंपण हे आपल्या विविध सणांमुळे अधोरेखित होतं. महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेला रक्षाबंधन सण खास मानला जातो, रक्षाबंधन हा सण..
मुंबई : हिंदू धर्मातील सण-उत्सवांना विशेष महत्त्व आहे. सण-उत्सव हा भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. भारतीय सामाजिक व्यवस्थेचं वेगळंपण हे या विविध सणांमुळे अधोरेखित होतं. महत्त्वाच्या सणांपैकी एक असलेल्या रक्षाबंधन सण खास मानला जातो, रक्षाबंधन हा सण भाऊ-बहिणीच्या नात्यातील प्रेम, आदर आणि विश्वासाचा सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते, तर भाऊ बहिणीच्या रक्षणाचे वचन देतो.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त २०२५ - या वर्षी ९ ऑगस्ट २०२५ (शनिवार) रोजी रक्षाबंधन आहे. राखी बांधण्यासाठी कोणताही अशुभ काळ (भद्रा) नसल्यानं आपण संपूर्ण दिवसभर कधीही राखी बांधू शकता. पण, त्यातही सकाळी ५:३५ ते दुपारी १:२४ पर्यंत राखी बांधण्यासाठी उत्तम वेळ आहे. विशेषतः ज्यांना शक्य आहे, त्यांनी ब्रह्म मुहूर्तामध्ये (पहाटे ४:२२ ते ५:०४) राखी बांधली तर ते अत्यंत शुभ मानले जाते.
advertisement
राखी कशी बांधावी: विधी आणि साहित्य - राखी बांधणे हा या सणातील महत्त्वाचा भाग असतो. राखी बांधण्याचा विधी पारंपरिक पद्धतीनं विधीनुसार केल्यास त्याचे महत्त्व अधिक वाढते. यासाठी खालील गोष्टींची तयारी करावी:
ओवाळणीच्या ताटात लागणारे साहित्य (पूजा ताट):
राखी
कुंकू आणि अक्षता
निरंजन (दिवा)
पाणी
मिठाई (लाडू, पेढे किंवा अन्य गोड पदार्थ)
advertisement
राखी बांधण्याचा विधी कसा करावा: भाऊ-बहिणीनं सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. पूजा ताटात सर्व साहित्य नीट मांडून ठेवावे. राखी बांधण्याच्या वेळी भावाने डोक्यावर रुमाल घालून पाटावर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे.
औक्षण करताना बहिणीनं भावाच्या कपाळाला कुंकवाचा टिळा लावावा आणि त्यावर अक्षता लावाव्यात. त्यानंतर निरांजन लावून भावाचे औक्षण करावे. ओवाळून झाल्यावर बहिणीने भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधताना तुम्ही मनात भावासाठी प्रार्थना करू शकता, काही मंत्र म्हणू शकता. राखी बांधल्यावर बहिणीने भावाला मिठाई भरवावी. त्यानंतर भावाने बहिणीला आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देऊन तिला भेटवस्तू किंवा ताटात पैसे ठेवावेत.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 06, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Raksha Bandhan 2025: श्रावण पौर्णिमा दुपारी दीड वाजेपर्यंतच! राखी नेमकी कधी बांधणं शुभ? सायंकाळच्या पर्यंत...