श्रावणात जन्मलेल्या लोकांमधील मुख्य गुण
शिवशंकर हे खूप साधे-भोळे देवता असल्याचे मानले जातात. त्याचप्रमाणे, श्रावण महिन्यात जन्मलेली मुले देखील सहसा शांत, सौम्य आणि धीर धरणारे संयमी असतात. तडकाफडकी निर्णय घेत नाहीत, त्यांना सहज राग येत नाही. हे लोक कोणतीही परिस्थिती शांतपणे हाताळण्याचा प्रयत्न करतात. त्यांचा हा स्वभाव त्यांना जीवनातील अनेक अडचणींपासून वाचवतो. संयमानं काम करण्याची प्रेरणा देतो.
advertisement
सावणमध्ये जन्मलेले लोक प्रत्येक नाते पूर्ण प्रामाणिकपणे राखतात. ते खूप कमी लोकांशी संपर्कात येतात. परंतु, जर ते एखाद्याशी मैत्री करतात तर ते त्याच्याशी प्रामाणिकपणे नाते राखतात. ते प्रत्येक परिस्थितीत त्यांच्यासोबत उभे राहतात.
शिवशंकरांचा आवडता महिना सावन हा अध्यात्माशी संबंधित आहे. या महिन्यात जन्मलेल्या लोकांवर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. असे लोक धार्मिक वृत्तीचे, आध्यात्मिक असतात आणि देवावर त्यांची गाढ श्रद्धा असते. ते अनेकदा पूजा आणि धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी होतात.
जुलैचा पहिला आठवडा लकी! मेष, वृषभ, मिथुन, कर्क राशींचे साप्ताहिक राशीभविष्य
श्रावणामध्ये जन्मलेल्या मुलांमध्ये कलात्मक आणि सर्जनशील गुणही भरपूर प्रमाणात असतात. ते संगीत, नृत्य, लेखन, चित्रकला किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात त्यांची आवड दाखवू शकतात. त्यांची कल्पनाशक्ती प्रबळ असते आणि ते कलेच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करण्यात पारंगत असतात.
ज्योतिषशास्त्रानुसार, श्रावण महिन्यात जन्मलेले लोक खूप लवकर प्रेमात पडतात. त्यांच्यातील चांगल्या गुणांमुळे आणि स्वभावामुळे समोरची व्यक्ती देखील त्यांच्यावर सहज प्रभावित होते. परंतु, एकदा नातेसंबधात अडकल्यानंतर ते एकनिष्ठ राहून नातं वाढवतात, जपतात. श्रावणात जन्मलेल्या लोकांमध्ये अशा अनेक चांगल्या गोष्टी असतात.
धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे मासिक राशीभविष्य; जुलै महिना जबरदस्त लाभ देणार
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)