छत्रपती संभाजीनगर : दिवस, महिना किंवा वर्ष बदलले की प्रत्येक व्यक्तीला आपल्या राशीमध्ये काय चालू आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. आपले ग्रहतारे कसे आहेत. त्या सोबतच आपल्याला काय लाभ होतील किंवा आपल्या आरोग्याची काळजी आपण कशी घ्यावी हे जाणून घेण्याची प्रत्येक जणांना आवड असते. त्यामुळे वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी फेब्रुवारी महिना कसा जाणार आहे? याची माहिती छत्रपती संभाजीनगरमधील ज्योतिषाचार्य श्रीरामजी धानोरकर सांगितली आहे.
advertisement
कसा असेल फेब्रुवारी महिना?
वृश्चिक राशीच्या मंडळींसाठी फेब्रुवारी महिना अतिशय चांगला जाणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांनी ज्या गुंतवणूक केलेल्या आहेत त्याचा विशेष परतावा या लोकांना भेटणार आहे. गुरु आणि मंगल यांचा प्रतियोग असल्यामुळे आपले जे गेलेले स्थान आहे ते परत भेटण्याची शक्यता आहे. जो नोकरदार वर्ग आहे यांनी जे काम केले आहे यामुळे त्यांना प्रमोशन हे भेटू शकते. जो व्यापारी वर्ग आहे यांनी जी गुंतवणूक केलेली आहे त्याचा विशेष लाभ हा महिन्यांमध्ये होऊ शकतो, असं श्रीरामजी धानोरकर सांगतात.
आर्थिक परिस्थिती सुधारायला होईल मदत; कुंभ राशीसाठी कसा असेल फेब्रुवारी महिना? Video
जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांना या महिन्यांमध्ये अभ्यास करण्यामध्ये थोडासा अडथळा हा येऊ शकतो. पण या विद्यार्थ्यांनी भगवान शंकरांची आराधना करावी. मेहनतीने आणि परिश्रमाने अभ्यास करून यश प्राप्त करावे. या महिन्यामध्ये शनि हा लाभस्थानी असल्यामुळे धार्मिक कार्य आणि यात्रा ही घडू शकते. शनि हा केंद्रस्थानी असल्यामुळे तुम्ही ज्या गुंतवणूक कराल आणि जे कष्ट घ्याल यामुळे तुम्हाला फळ भेटेल, असं श्रीरामजी धानोरकर सांगतात.
प्रेमासाठी स्वत:ला सिद्ध करावं लागेल, तूळ राशीच्या लोकांना फेब्रुवारी कसा असेल? Video
सर्वांनी या महिन्यांमध्ये भगवान शंकरांची आराधना करावी. त्यासोबत श्रीरामांचा मंत्रांचा जप करावा. आणि शक्य असेल तर आपल्या कुलदेवतेला जाऊन दर्शन घ्यावं. तिथे जाऊन अभिषेक हा करावा. यामुळे देखील तुम्हाला लाभ होतील. महिन्याच्या शेवटी म्हणजे समाप्तीला आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. योगासने करावेत, बाहेरचं खाणं टाळावं आणि आपण आपल्या आरोग्याची चांगली काळजी घ्यावी. तर अतिशय चांगला महिना हा वृश्चिक राशीचा मंडळींना जाणार आहे, असंही श्रीरामजी धानोरकर गुरुजी यांनी सांगितलं आहे.
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)