TRENDING:

Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा; शुभ मुहूर्त, पूजा-विधी अशा पद्धतीनं करा

Last Updated:

Navratri 2025 Puja: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी दुर्गेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते. या देवीचे रूप शांत, सौम्य पण तरीही शक्तिशाली असे मानले जाते. तिच्या माथ्यावर अर्धचंद्राचा आकार असून ती वाघिणीवर स्वार झालेली असते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : शारदीय नवरात्र उत्सवाची सध्या सर्वत्र धूम चालू आहे. गणेशोत्सवानंतर पुन्हा सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 24 सप्टेंबर रोजी म्हणजे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी दुर्गेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते. या देवीचे रूप शांत, सौम्य पण तरीही शक्तिशाली असे मानले जाते. तिच्या माथ्यावर अर्धचंद्राचा आकार असून ती वाघिणीवर स्वार झालेली असते. तिच्या दहा हातांमध्ये विविध शस्त्रे आणि कमळ धारण केलेले आहे.
News18
News18
advertisement

चंद्रघंटा देवीची पूजा कशी करावी?

पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. पूजा सुरू करण्यापूर्वी हातात जल घेऊन चंद्रघंटा देवीच्या पूजेचा संकल्प करावा. देवीला लाल रंगाची फुले, विशेषतः जास्वंदीचे फूल अर्पण करावे. देवीला बेलपत्र आणि कमळ अर्पण करणे शुभ मानले जाते. देवीला दूध किंवा दुधापासून बनवलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. खिरीचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो. देवीच्या पूजेमध्ये खालील मंत्रांचा जप केल्याने विशेष फलप्राप्ती होते.

advertisement

मंत्र - 'पिण्डज प्रवरारूढा चण्डकोपास्त्रकैर्युता।

प्रसादं तनुते मह्यं चंद्रघण्टेति विश्रुता।।'

मंत्र जप केल्यानंतर देवीची आरती करावी आणि तिच्याकडे सुख, समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना करावी.

देवी दुर्गेची 9 रुपं आणि नऊ रंग..! नवरात्रीत कोणत्या दिवशी कोणत्या रंगाचे कपडे

धार्मिक महत्त्व -

या देवीच्या पूजेमुळे मन शांत होते आणि व्यक्तीला आंतरिक सामर्थ्य प्राप्त होते. तिच्या डोक्यावरील चंद्र शांतीचे प्रतीक आहे, तर तिच्या हातातील शस्त्रे वाईटाचा नाश करण्याची ताकद दर्शवतात. चंद्रघंटा देवीची पूजा केल्याने व्यक्तीच्या मनातील भीती आणि नकारात्मकता दूर होते. ती भक्तांना सर्व प्रकारच्या संकटांपासून वाचवते. या देवीच्या कृपेमुळे व्यक्तीमध्ये आत्मविश्वास आणि धैर्य वाढते, ज्यामुळे ती कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होऊ शकते. या देवीच्या पूजेने पूजा करणाऱ्यांना अलौकिक शक्ती आणि आध्यात्मिक अनुभव मिळतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. ही देवी भक्तांचे दुःख आणि कष्ट दूर करते असे मानले जाते.

advertisement

घटस्थापनेपासून सुरू होणारा आठवडा कोणासाठी लकी? सर्व 12 राशींचे साप्ताहिक राशीफळ

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शब्दांचा जादुगार! मराठी कविता 32 भाषांत अन् गुजराती अभ्यासक्रमात, कवी कोण?
सर्व पहा

(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या/राशीभविष्य/
Shardiya Navratri 2025: नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा देवीची पूजा; शुभ मुहूर्त, पूजा-विधी अशा पद्धतीनं करा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल